शिवजयंती मराठी भाषण | Shivjanti marathi bhashan
आज आपण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भाषण कसे असावे हे पाहाणार आहोत .
या भारत भूमीवर शिवयुग पुन्हा अवतरो शिवजयंती हा केवळ सण नाही तर ती एक विचारधारा आहे हिंदवी स्वराज्य या भारत भुमी वर स्थापन करुन संपूर्ण जगात किर्तिमान स्थापन करणाऱ्या युग पुरुषाची गाथा आहे . वर्षानुवर्ष होणाऱ्या अत्याचार अन्याया विरुद्ध उभा ठाकलेला एक बुलंद आवाज आहे.
विश्चाची शान आहे
सत्याची आण आहे
न्यायाचा मान आहे
विश्चाची शान आहे
सत्याची आण आहे
न्यायाचा मान आहे
आपल्या सर्वांचा आभिमान आहे .
सर्वांना शिवजयंती च्या हार्दिक शुभेच्छा
शिवजयंती |
छत्रपती शिवाजी महाराज - घोषणा
'' प्रौढ प्रताप पुरंदर ''
'' महापराक्रमी रणधुरंदर''
''क्षत्रिय कुलवंत,सिंहासनाधिश्वर,
महाराजाधिराज'' महाराज श्रीमंत श्री. श्री.श्री. छत्रपती शिवाजी महाराज की जय ।
आमचे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा.
'' महापराक्रमी रणधुरंदर''
''क्षत्रिय कुलवंत,सिंहासनाधिश्वर,
महाराजाधिराज'' महाराज श्रीमंत श्री. श्री.श्री. छत्रपती शिवाजी महाराज की जय ।
आमचे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा.
शिवजयंती मराठी भाषण Shivjanti marathi bhashan
स्वदेश स्वतंत्र व्हावा हि माता-पित्याची ईच्छा शिवाजींनी पूर्ण केली. हिंदू धर्माचा पाडाव करून सर्व हिंदुस्थान मुसलमानमय करून टाकावा या म्ह्त्वाकांक्षेने झपाटलेला औरंगजेब हा दिल्लीच्या तख्तावर होता.विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही अस्या वेढ्यात सापडलेला पुणे-सुपे परिसर या तिन्ही मुस्लिम राज्यांवर औरंगजेबांची हुकुमत होती. तो दिल्लीवरून सतत त्यांना पैसा व सैन्य पाठवत होता. माता जिजाउ न्नि शिवाजी राजे यांच्या मनात या अन्यायकारी वृत्तींचा विरोध आणि चीड निर्माण करून स्वातंत्र्य आणि स्वराज्य या विषयीच्या निष्ठा निर्माण केल्या. शिवाजी राज्यांच्या अंगभूत गुणांचा विकास केला. आणि हळूहळू शिवाजी राजे प्रयत्न करू लागले. मराठी माणसाच्या मनातील रागाला नेमकी दिशा दाखविण्यासाठी ‘मराठा तितुका मेळवावा’ हे सूत्रे धरून स्वातंत्र्य प्रेमी, व पराक्रमी, माणसांना एकत्रित केले. यावेळी त्यांच्या लक्षात आले कि काही मराठी माणसे सरदारकी-जहागिरी आणखी मोठ्या हुद्यासाठी परक्या सत्ता धीश्यांच्या चाकरीत धन्यता मानून शिवाजी राज्याच्या स्वातंत्र्य लढ्याला विरोध करत आहेत.
औरंगजेब हा जबरजस्त लष्करी सामर्थ्याचा पराक्रमी, कट्टर मुसलमानपंथीय व दक्षिणेतील राजकारणी माहिती असलेला बादशहा हता. पण शिवाजीने अफझलखाना सारख्या पराक्रमी मुसलमान सरदाराला यमसदनी पाठविल्या नंतर तो जिवंत असे पर्यंत महाराष्ट्रात येण्याची त्याची छाती झाली नाही. औरंगजेबाने शिवाजीरायांना पकडून आग्रा येथे ठेवले. पण तेथुही ते शिताफीने निसटले. तेव्हा औरंगजेबाने धसकाच घेतला.
शिवाजीला लढाईचे राज्य कारभाराचे शिक्षण दादोजी कोंडदेव यांनी दिले.दहा-बारा वर्षाचा असतानाच शिवाजींच्या मनात स्वातंत्र्याचे वारे खेळू लागले. माझा देश मोगलांच्या आणि मुसलमानांच्या गुलामीतून मुक्त करायचा. माझ्या बांधवांना गुलामीतून व छळातून मुक्त करायचेच! हाच उद्देश ठेवून त्यांनी सह्यांन्द्रिच्या कडेकपारीत भटकून सवंगडी एकत्र केले. तानाजी, नेताजी, सूर्याजी, बाजी, येसाजी आणि एकांपेक्षा ऐक जिवाला जीव देणारे मित्र गोळा केले.
शिवाजी कोण ? Shivaji kon
मला कोणी तरी विचारले की शिवाजी म्हणजे कोण?
त्यांना मी असे सांगितले की...ते आयुष्य भर विसरणार नाहीत..
जे २००० सैन्याशी एकटे झुंजतात त्यांचे नाव बाजी,
जे हात तुटले तरी शत्रूशी लढत राहतात त्यांचे नाव तानाजी,
जे ८तासात घोडा दिल्ली वरून पुण्याला घेऊन येतात ते संताजी
शत्रूच्या छावणीत घुसुन, छावणी चा कळस कापून आणतात त्यांचे नाव धनाजी.
जे ढाण्या वाघाला एकटे सामोरे जातात व त्याला उभे फाडतात त्यांचे नाव संभाजी.
या सर्वांना घेऊन जे नंदनवन स्वराज बनवतात ते शिवाजी..”
स्वराजासाठी लढाई
श्री रोहिडेश्वराच्या साक्षीने स्वराज्याची शपथ घेतली. आणि एका स्वरांत घोषणा दिली. ” हर हर महादेव” महाराष्ट्रातल्या मावळखोर्यानपासून त्यांनी आपल्या प्रयत्नांना आरंभ केला.
स्वराज्यावर मिर्झाराजा आणि दिलेरखान चालून आले.राज्य धोक्यात आले.आणि शिवरायांसमोर शरणागती शिवाय दूसरा मार्गच उरला नाही.शेवटी मोगलांना मोठी संपत्ती आणि नविन स्वराज्याचे "२३किल्ले" द्यावे लागले.उरले फक्त "१२" किल्ले.म्हणजे ७०% स्वराज्य मोगलांना द्यावे लागले.आत्ता पर्यत जे बलिदानाने,घामाने जे कष्टाने मिळवले. ते सर्व मोगलांच्या घशात गेले.
माझ्या राज्या वर छोटीशी कविता...
विजेसारखी तलवार चालवुन गेला,
निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला,
वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला,
मुठभर मावळ्याना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला!
स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला असा एक
स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला असा एक
“मर्द मराठा शिवबा”होऊन गेला.”……
आता काय करायचे ?
सगळे संपले.
सर्व वाया गेले.
आपली संपत्ती दुसऱ्याची झाली.
स्वराज्याचे स्वप्नं भंगले.
पुरंदरचा तह झाला.
आता सारे संपले.
स्वराज्य संपले असेच सर्वांना वाटले.
हा प्रसंग घडला १३ जून १६६५ ला काही दिवस गेले,महिने गेले,वर्षे गेली. आणि...९ वर्षे ६ दिवसांनी तो दिवस उजाडला.६ जून १६७४
""शिवराज्याभिषेकाचा दिवस."" आणि या दिवशी स्वराज्यात किल्ले होते "३६१"किती ??? "३६१"
कुठे १२ गड शिल्लक राहिलेले स्वराज्य?? आणि कुठे ३६१ किल्ल्यांचे स्वराज्य..??
""लक्षात येतय का हे शिवतंत्र""
एखाद्या संकटाने खचायच नाही.
पराभवाने मार्ग सोडायचा नाही.
अपमानाने धेय्य सोडायच नाही.
बदनामीने भरकटायच नाही.
पाय खेचले म्हणून थांबायच नाही.
संधी गेली म्हणून रडायच नाही.
यश नाही आले म्हणून कार्य बदलायच नाही.
लोक म्हणतात म्हणून मागे फिरायच नाही.
जे माझ्या शिवरायांच्या बाबत घडले
ते तुमच्या माझ्याही बाबत घडेल.
सर्वस्व जाईल.
बरबाद होताल.
होत्याच नव्हते होईल.
सगळे संपेल.
सांगायचा उद्देश हाच आहे की अनुकूल परिस्थितीत सगळे मोठे होतात पायवाटेने सगळेच जातात दुसऱ्याच्या कष्टाने सगळे मोठे होतात दुसऱ्याच्या मदतीने सगळेच यश मिळवतात.पण खरे मर्द तेच असतात जे लढून विजयी होतात,बापाच्या जीवावर कुणीही उड्या मारेल त्या झाल्या माकडउड्या.पण स्वतःच्या जीवावर उड्या मारणारे खरे नरसिंह असतात प्रवाहा बरोबर तर दगड पण वाहतात पण प्रवाहाच्या विरोधात वाहणारे खरे हीरे आणि हिरोच असतात.
मी त्या शिवरायांचा छावा आहे.
मी लढणार, शेवट पर्यत लढणार, हरलो तरी लढणार,पडलो तरी लढणार, तो पर्यत लढणार,जो पर्यत विजयी होत नाही.
आणि मी जिंकणार,जिंकणार म्हणजे जिंकणारच।।।
शिवजयंतीच्या शुभेच्छा.
हे नक्की वाचा ⬇️