Type Here to Get Search Results !

पाठ. 3. शाल | Shal | Maharashtra state Board

 पाठ. 3. शाल | Shal 

पाठ :  शाल (toc)

पाठ.३. शाल. लेखक : रा. ग . जाधव.

पाठाचा परिचय  -  शाल हे अंगावर पांघरण्यासाठी असलेले वस्त्र आहे ते एक सन्मानचिन्ह ही आहे लेखकांना मिळालेल्या वापर त्यांनी कसा केला व त्यातून त्यांना कोणते अनुभव आले याची माहिती या पाठात दिलेली आहे.

पाठाचा सारांश 

या पाठा मध्ये शाली भोवती असलेले लेखकाच्या आठवणी या पाटातून व्यक्त झाल्या आहेत शाल ही प्रतीकात्मक आहे शाली मुळे येणारा शालीन तेचा संदर्भ यामध्ये अंतर्मुख करणारा आहे पाठातील काही उदा किंवा घटना या  माणसाची संवेदनशीलता हे मूल्य ची जाणीव करून देणारी असतात . या सर्व घटनांचा ठेवा जतन ठेवणे गरजेचे आहे. या सर्व घटना व  आठवणींचा उजाळा महत्त्वाचा आहे त्यामुळे  त्याचे मानवी जीवनामध्ये महत्व खूप असते असा चा पाठ आहे या पाठांमध्ये वरील प्रमाणे शाली चे महत्व सांगितले आहे.

लेखक लेखक वाईला विश्वकोशा चे अध्यक्ष म्हणून गेले होते त्या ठिकाणी नदीकाठच्या पार्ट शाळेच्या खोलीत ते राहत असे खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर होत्या थंडीच्या दिवसात एक बाई माझ्या खिडकीखाली घाटाच्या छोट्या तटावर एक लहान मुल टोपली घेऊन मासे पकडण्याचे काम करत होती त्या बाईचे बाळ थंडीने कुडकुडत जोराने रडत होते पण त्याकडे तिचे लक्ष नव्हते हे दृश्य पाहून मला रहावले नाही मी माझ्या सुटकेस मध्ये एक शाल काढली तसेच काही पैसेही देण्यासाठी वर काढले व त्या स्त्रीला हाक मारून ती शाल व पैसे तिला दिले.

कठीण शब्द 

गौरव -  सन्मान 
चिंचोळा प्रवाह - बारीक ओघ
तट - किनारा, काठ ,तीर
गुंडाळ - लेपटून घे.
शालीन - सालस 
क्षीण - कमजोर
तत्कालीन - त्या काळातील
गाठोडे - बोचके.
म्या - मी 
चिरगुटे - चिंध्या.
लगबगीने - भरभर.
अभागी - दुर्दैवी
अशक्त - दुबळा


कृती स्वाध्याय व उत्तरे

प्रश्न .१) उत्तरे लिहा:

1) पु. ल. व सुनीताबाई यांनी दिलेल्या शालीचा लेखकाने केलेला उल्लेख.

उत्तर : पुलकित शाल

2)पाठात उताऱ्यात उल्लेख असणारी नदी.

उत्तर : कृष्णा नदी

3) सभा, संमेलने गाजवणारे कवी.

उत्तर : नारायण सुर्वे

४) 2004 च्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष.

उत्तर : लेखक रा .ग .जाधव

प्रश्न.२. शालीचे पाठात आलेले विविध उपयोग लिहा.

शाली चे उपयोग : अंगावर मिरवणे ,सन्मान करणे,गरजवंताला देणे, भिक्षेकऱ्याला देणे ,अभागी लोकांना देणे.

प्रश्न.३. खालील प्रसंगी लेखकाने केलेली कृती लिहा.

१) एका बाईचे बाळ कडाक्‍याच्या थंडीने कुडकुडत होते

उत्तर : लेखकांनी सूटकेस मधील शाल काढली. आईला हाक मारली व खिडकीतून तिला शाल आणि पाच पन्नास रुपयांच्या नोटा दिल्या.

२) म्हातारा अशक्त भिक्षेकरी कट्ट्याला लागूनच चिरगुटे टाकून व पांघरून कुडकुडत बसल्याचे पाहिले.

उत्तर : दोन शाली कट्ट्यावर घेऊन आलो व कुडकुडणाऱ्या म्हाताऱ्या भिकाऱ्याला दोन्ही शाली दिल्या.

४) कारणे शोधून लिहा.

१) एका बाईच्या बाळासाठी शाल दिल्याच्या घटनेची ऊब पुलकित शालीच्या उबेपेक्षा जास्त होती; 

कारण या घटनेतून लेखकांना परोपकार केल्याचे सुख मिळाले.

२) शालीच्या वर्षावामुळे नारायण सुर्वे यांची शालीनता हरवली नाही; कारण सुर्वे मुळातच शालीन होते.

3) लेखकांच्या मते, शालीमुळे शालीनता जाते; 

कारण सन्मान करण्याच्या रूपाने आपण एक शालीन जग गमावून बसण्याचा धोकाच मोठा आहे.

४) बाळ रडत होते; कारण ते थंडीने कुडकुडत होते.

५) लेखकाने सुटकेसमधील 'पुलकित' शाल काढली;

 कारण थंडीने कुडकुडणाऱ्या बाळाला त्यांना ती दयायची होती.

प्रश्न .५) आकृती पूर्ण करा.

लेखकांनी भूषवलेली पदे : विश्वकोशाचे अध्यक्षपद, 

साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद .

प्रश्न .६) खालील वाक्यातील कृतीतून किंवा विचारातून करणारे लेखकाचे गुण शोधा.

१) बाईला हाक मारून खिडकीतून शाल व नोटा दिल्या. 

उत्तर : संवेदनशीलता

२) खरेतर, खरीखुरी शालीनता शाली विनाश शोभते !

उत्तर : वास्तवाचे भान.

३) हळूहळू मी सगळ्या शाली वाटून टाकल्या .

उत्तर : उदारपणा.

प्रश्न.७. पुलकित हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.

उत्तर : १)सन्मानाची प्रतीके शाल व श्रीफळ होते.

२)थंडीत कुडकुडणाऱ्या बाळाला ऊब मिळावी म्हणून पाचपन्नास रुपयांच्या नोटा लेखकाने मासे पकडणाऱ्या बाईला दिल्या.

प्रश्न.८. स्वमत लिहा.

१)शाल व शालीनता' यांचा पाठाच्या आधारे तुम्हांला कळलेला अर्थ स्पष्ट करा.

उत्तर : 'शाल' हे सन्मानचिन्ह आहे. 'शालीनता' हा सज्जन माणसाचा स्वभावधर्म आहे. जी व्यक्ती मूलतः शालीन किंवा सालस असते, तिला शाल अधिक शोभा देते. किंबहुना शालीन माणसाला शालीची गरजही नसते. त्याचा शालीनता हा स्वभावच सन्मानाला सन्मान देणारा ठरतो. जो दुर्जन माणूस असतो, त्याला शालीने किती नटवले, तरी त्याच्यात शालीनता येणे कठीण आहे.

२) भिक्षेकऱ्याने केलेला शालीचा उपयोग' याविषयी तुमचे मत लिहा.

उत्तर : लेखकाने एक म्हातारा भिक्षेकरी ओंकारेश्वराच्या पुलावर थंडीने कुडकुडताना पाहिला, लेखकांच्या मनात करुणा जागृत झाली. त्यांनी त्या भिक्षेकऱ्याला आपल्याकडील दोन शाली दिल्या. आपण परोपकार केल्याच्या भावनेत लेखक तृप्त होते. परंतु आणखी चार-पाच दिवसांनी लेखकांनी पाहिले की तो म्हातारा भिक्षेकरी अंगावर चिरगुटे घेऊन पूर्वीसारखाच बसला आहे. कुतूहलाने लेखकांनी त्याला शालीबद्दल विचारले असता भिक्षेकऱ्याने सांगितले की त्याने त्या शाली विकल्या व दोन दिवस पोटभर खाल्ले. 'शालीच्या शोभेपेक्षा पोटाची आग फार वाईट' या त्याच्या म्हणण्यात तथ्य होते.

३) लेखकाच्या भावना जशा 'शाल' या वस्तूशी निगडित आहेत, तशा तुमच्या आवडीच्या वस्तूशी निगडित असलेल्या भावना, तुमच्या शब्दांत लिहा.

 उत्तर : मी पाचवीत असताना शाळेमध्ये एका वक्तृत्व स्पर्धेत चिमुकले भाषण दिले होते. त्या स्पर्धेत माझा पहिला नंबर आला होता. मला खूप आनंद झाला. मला बक्षीस म्हणून छोटा चांदीचा पेला मिळाला. माझ्या आयुष्यातील ते पहिले पारितोषिक असल्यामुळे मला त्या पेल्याविषयी भारी प्रेम आहे. त्या दिवसापासून आजतागायत त्या पेल्यातूनच पाणी पितो. तो पेला मीच वापरतो. नीट स्वच्छ धुवून मी तो विशिष्ट जागेवर ठेवतो. त्याला कुणालाही हात लावू देत नाही. नेहमी त्यातून पाणी पिताना मला पाचवीचे ते दृश्य स्मरते आणि मला प्रेरणा मिळते.


 पाठावर आधारित SSC परीक्षेत येणारे  महत्वपूर्ण प्रश्न 

एस. एस. सी. परीक्षेत या पाठवर  आकलन कृती चे खालील प्रकारे प्रश्न विचारले जातात.

1)लेखकाने भूषवलेली पदे:  साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद व विश्वकोशाच्या अध्यक्ष पद . गुण : 02

2)2004 च्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते : लेखक: रा. ग. जाधव.

3) निकटवर्ती मित्राला दिलेले : शालींचे गोठोडे 

4) सगळ्या शाली यांना वाटल्या : गरीब श्रमिकांना 

5) भिक्षेकऱ्याच्या अंगावर असलेली : चिरगुटे.

6)कविवर्य नारायण  सुर्वे गाजवत असे  : सभा, संमेलन .

7)लेखकाने गरीब बाईला दिले: पुलकित शाल, पाच पाचपन्नास 

8) बाळ का रडत होते त्याचे कारण काय : कडाक्याच्या थंडीने कुडकुडत रडत होते

9) लेखकाने सुटकेस मधील पुलकित शाल काढली  व दिली कारण: कडाक्याच्या थंडीने कुडकुडत रडत होते पण आई तिकडे बघतच नव्हती.

सराव पेपर 






Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad