संतवाणी अ) अंकिला मी दास तुझा - अभंग | sant ani ankila mi das tuza abhang
संतवाणी अ) अंकिला मी दास तुझा - अभंग
वारकरी संप्रदायातील थोर संत कवी संत नामदेवांचे अभंग रचना अतिशय उत्कृष्ट असून त्यांच्या अभंगाची भाषा सुबोध सरळ साधी आहे त्यांनी हिन्दी की रचना केलेले आहे पंजाबात जाऊन त्यांनी भागवत धर्माची पताका फडकवली आहे शिक्षकांच्या गुरुग्रंथसाहेब या ग्रंथात त्यांची एकसष्ट कवणे समाविष्ट असून भक्त नामदेव जी की मूक बानी या नावाने ती प्रसिद्ध आहेत.
प्रस्तुत अभंगांमध्ये संत नामदेवांनी विविध दृष्टांतातून परमेश्वराची कृपा याचना केली आहे .
संतवाणी अ) अंकिला मी दास तुझा - अभंग(toc)
कवितेचा ( अभंगाचा ) भावार्थ
श्रीविठ्ठलाला (देवाला) आई समजून, संत नामदेव स्वतःला बाळ समजत आहेत. विठ्ठलरूपी मातेने आपल्या बाळाचा मायेने सांभाळ करावा, हे सांगताना संत नामदेव म्हणतात -
जर समजा, आगीमध्ये बाळ चुकून पडला तर दयाळू आई त्याचे रक्षण करण्यासाठी धावत जाते. ।। १ ।।
त्याप्रमाणे हे देवा, माझे कार्य पूर्ण करण्यासाठी तू घावत ये. मी तुला शरण आलेला दास आहे. तुझ्या चरणी लीन झालेला मी परमभक्त आहे.।। २ ।।
झाडावरून अकस्मात जर पिल्लू घरतीवर पडले, तर क्षणाचा विलंब न करता पक्षिणी त्याच्यापाशी झेप घेते. त्याला वाचवण्यासाठी ती तत्परतेने जमिनीवर येते. ।। ३ ।।
कवितेचा संपूर्ण भावार्थ असलेला व्हिडिओ ची लिंक :
वासरू खूप भुकेले असते; तेव्हा त्याला दूध पाजण्यासाठी गाय तत्काळ हंबरत वासराकडे धावते ।। ४ ।। रानात वणवा पेटला; तर आपले पाडस त्यात सापडले तर नाही ना, या शंकेने हरिणी चिंतेत पडते, व्याकूळ होते. ।। ५ ।।
संत नामदेव म्हणतात, हे विठ्ठला, तू पाण्याने भरलेला ढग आहेस. त्यातल्या पाण्याचा (मायेचा) माझ्यावर वर्षाव होऊ दे. मी पावसाच्या पाण्याविना जगू न शकणाऱ्या चातकासारखा आहे. माझे जीवन तू सांभाळ, अशी मी विनवणी करीत आहे. ।। ६ ।।
साप्ताहिक चाचणी ची लिंक :
https://forms.gle/pihwvp36br4fRNyo9
प्रश्नउत्तर - अंकिला मी दास तुझा
प्रस्तुत अभंगाची कृती : प्रश्नःउत्तर
संतवाणी . अ) अंकिला मी दास तुझा....
(१) पाठाच्या आधारे खालील कृती केव्हा घडतात ते लिहा.
(अ) माता धावून जाते
उत्तर : माता धावून जाते जेव्हा बाळ आगीत पडते.
(आ) धरणीवर पक्षिणी झेपावते.....
उत्तर : धरणीवर पक्षिणी झेपावते जेव्हा पक्षिणीचे पिल्लू झाडावरून खाली पडते .
(इ) गाय हंबरत धावते.....
उत्तर : गाय हंबरत धावते जेव्हा वासराला भूक लागते
(ई) हरिणी चिंतित होते.....
उत्तर : हरिणी चिंतित होते जेव्हा पाडस वणव्यामध्ये सापडते.
(२) आकृती पूर्ण करा.
कवितेतील माता आणि हरिणीचे वर्णन करणारे शब्द
माता : कनवाळू
हरिणी : चिंतीत
(४) काव्यसौंदर्य.
(अ) खालील ओळींचे रसग्रहण करा.
‘सवेंचि झेंपावें पक्षिणी । पिलीं पडतांचि धरणीं ।।
भुकेलें वत्सरावें । धेनु हुंबरत धांवे ।।’
उत्तर : प्रस्तुत दोन चरणांमध्ये पक्षिणी व गाय या दोन मातांचे दृष्टांत संत नामदेव यांनी दिले आहेत . श्री . विठ्ठलाची विनवणी करताना ते म्हणतात आपले पिल्लू फांदीवरून पडताना जेव्हा पक्षिणी पाहते ,तेव्हा त्यांचे रक्षण करण्यासाठी ती वेगाने जमिनीवर झेप घेते व आपल्या पिलाला वाचवते.
वासरू जेव्हा भुकेले होते तेव्हा त्याच्या ओढीने त्याला पान्हा पाजण्यासाठी गाय हंबरत धावत जाते.
(आ) आई, प्राणी, पक्षी यांच्या मातृप्रेमाचे कवितेतून व्यक्त झालेले वर्णन तुमच्या शब्दांत सांगा.
उत्तर : संत नामदेवांनी श्री . विठ्ठलाला आई म्हटले आहे आणि आपण स्वतः तिचे तान्हुले आहोत ,असा आशय अभंगात व्यक्त केला आहे. माता बाळाची काळजी घेते . त्याचे दुखने मायेने पाहते . बाळाला काही लागले ,तर तिचा जीव कासावीस होतो. हरिणी आगीत सापडलेल्या बाळाचे रक्षण करण्यासाठी धावत वेगाने जाते. तसेच पिल्लू फांदीवरून पडताना जेव्हा पक्षिणी पाहते ,तेव्हा त्यांचे रक्षण करण्यासाठी ती वेगाने जमिनीवर झेप घेते. आई मूर्तिमंत करुणा आहे. साक्षात दयाळू आहे. विठ्ठल माऊलीने आपला सांभाळ करावा. माझे जीवन कृपेच्या वर्षावाने फुलवावे. अशा प्रकारे संत नामदेव आई, प्राणी, पक्षी यांच्या मातृप्रेमाचे कवितेतून वर्णन केले आहे.
या लिंक वर प्रस्तुत अभंगाचा व्हिडिओ आहे संपूर्ण भावार्थ सहित .
कवितेचा संपूर्ण भावार्थ असलेला व्हिडिओ ची लिंक :
साप्ताहिक चाचणी ची लिंक :
https://forms.gle/pihwvp36br4fRNyo9
(इ) संत नामदेवांनी परमेश्वराकडे केलेली विनंती सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तर : संत नामदेवांनी श्री . विठ्ठलाला आई म्हटले आहे.आईची माया जशी तिच्या बाळावर असते ,तशी मायेची व प्रेमाची पाखर हे देवा तू माझ्यावर अविरत करावी अशी विनंती संत नामदेव या अभंगात करतात.
श्री . विठ्ठलाची विनवणी करताना ते म्हणतात आपले पिल्लू फांदीवरून पडताना जेव्हा पक्षिणी पाहते ,तेव्हा त्यांचे रक्षण करण्यासाठी ती वेगाने जमिनीवर झेप घेते व आपल्या पिलाला वाचवते.
वासरू जेव्हा भुकेले होते तेव्हा त्याच्या ओढीने त्याला पान्हा पाजण्यासाठी गाय हंबरत धावत जाते.
रानात पेटलेल्या वणव्यात हरणीचे पाडस सापडले तर हरिणी चिंतीत होते व्याकुळ होते.संत नामदेव श्री. विठ्ठलाला मातृप्रेमाचा वर्षाव करायला सांगतात . श्री विठ्ठल पाण्याने भरलेले ढग होऊन चातक रुपी माझ्यावर मायेचा वर्षाव करावा अशी विनवणी संत नामदेव करतात.
(ई) पक्ष्याच्या/प्राण्याच्या आपल्या पिलाशी असलेल्या संबंधाबाबत तुमचा अनुभव लिहा.
उत्तर. ( तुम्ही पाळलेल्या मांजर किंवा इतर पक्षी / प्राणी यांची माहिती तुमच्या शब्दात लिहा.)
उदा.कोंबडी/ मांजर - तिचे नाव --
रंग कोणता -
तिचे राहण्याचे ठिकाण -
तिने किती पिल्लांना जन्म दिला --