Type Here to Get Search Results !

योगी सर्वकाळ सुखदाता सोडवलेली कृती

 कृती - स्वाध्याय 

योगी सर्वकाळ सुखदाता - कृती स्वाध्याय उत्तरासहित

प्रश्न क्रमांक ०१. खालील चौकटी पूर्ण करा

अ) अभंगात वर्णिलेला चंद्रकिरण पिऊन जगणारा पक्षी:चकोर

आ) पिल्लांना सुरक्षितता देणारे : पक्षिणीचे पंख

इ) चिरकाल टिकणारा आनंद : स्वानंदतृप्ती

ई) व्यक्तीला सदैव सुख देणारा : योगी

२) खालील आकृती पूर्ण करा.

योगाचे मृदुत्व सर्वांशी त्याप्रमाणे -----

 १)पक्षिणीच्या पंखा सारखी ➡️ पिलीयांसी

२) चकोराशी ➡️ चंद्रकिरण यांसारखे

३) जीवांशी ➡️ पाण्यासारखे

३) खालील तक्ता पूर्ण करा.

योगी पुरुष आणि जीवन ( पाणी) यांच्यातील फरक पष्ट करा.

उत्तर : योगी पुरुष :

१) सबाह्य निर्मळ करतो.

२) स्वानंदतृप्ती देतो.

३) सर्व इंद्रियांना शांत करतो.

४) आत्मज्ञानाने उद्धार करतो.

जीवन ( पाणी) :

१)वरवरचा मळ धुते.

२)तहान शमवणारे क्षणाचे सुख देते.

३)फक्त जिभेला तृप्त करते.

४)फक्त अन्नदान करते..

योगी पुरुषाची चार वैशिष्ट्ये -

१) योगी पुरुष सर्वांसाठी मृदू असतो

२) सर्वकाळ सुख देणारा असतो

३) स्वानंदतृप्ती देतो

४) सर्व इंद्रियांना शांत करतो


3 ) योगी पुरुष पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे, हे विधान तुमच्या शब्दांत स्पष्ट करा. 

किंवा

 योगी पुरुषाचे श्रेष्ठत्व तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.


उत्तर : संत एकनाथ महाराजांनी योगी पुरुष व पाणी यांची प्रस्तुत अभंगात सार्थ तुलना केली आहे व योगी पुरुषाचे श्रेष्ठत्व ठसवले आहे.

योगी पुरुष पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे, हे सांगताना ते म्हणतात पाणी हे वरवरचा मळ धुवून टाकते परंतु योगी जनांचे मन अंतर्बाह्य निर्मळ करून सोडतो. पाण्याने एकावेळची तहान भागवते परंतु योगी पुरुष हा सर्वांसाठी सर्वकालीन सुख देणारा सज्जन आहे. पाण्याचे सुख क्षणिक आहे. तात्पुरते आहे. पण योग्याने दिलेल्या सुखात विकृती नाही. योगी पुरुष सर्वांना स्वानंदतृप्ती म्हणजे अक्षय परमानंद देतो. पाण्याची गोडी फक्त जिभेपुरती मर्यादित असते. परंतु योग्याच्या आत्मज्ञानाची गोडी सर्वजनांच्या सर्व इंद्रियांना शांत करते. पाण्याने माणसाची पोटाची भूक भागते परंतु योगी पुरुष श्रवणकीर्तनाने माणसांच्या मनाचे पोषण करतो.अशा प्रकारे 'योगी पुरुष हा पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे' हे संत एकनाथांनी सोदाहरण पटवून दिले आहे.

४)योगी पुरुष आणि पाणी' हे दोघेही सामाजिक कार्य

करतात, हे स्पष्ट करा.

उत्तर : योगी पुरुष आणि पाणी हे दोन्हीही जनकल्याणासाठीच झटतात. दोघेही जनमानसाची निस्पृह सेवाच करतात.

पाणी हे मानवाला जीवनदायी आहे. चराचरातील प्राणिसृष्टी व वनस्पतीसृष्टी पाण्यामुळे जिवंत राहते. पाणी माणसाची तहान तर भागवतेच परंतु पोटाची भूकही शमवते. पाण्यामुळे धरतीवर अन्नधान्य पिकते. पशुपक्ष्यांना पाण्यामुळे चारा मिळतो. पाण्यामुळे साय निसर्गात चैतन्य संचारते. सारी सृष्टी तरारून उठते. अशा प्रकारे पाणी हे मानवासाठी सामाजिक कार्य करते.

योगी पुरुष हा या मृत्युलोकात जन्म घेतो. तप:साधनेने आत्मज्ञान प्राप्त करतो. त्या आत्मज्ञानाची शिदोरी तो जनमानसात श्रवणकीर्तनाने वाटतो. सर्वांना तो सदासर्वकाळ सुख देतो. इंद्रियांचे ताप हरण करून त्यांना अक्षय परमानंदाची ठेव अर्पण करतो. योगी पुरुषाच्या आत्मज्ञानाने माणसांची मने निर्लेप, निस्वार्थी व निर्मळ होतात. अशा प्रकारे योगी पुरुषही सामाजिक कार्य निस्पृहपणे करतो.

प्रश्न. ५. पुढील कवितेसंबंधी त्याखाली दिलेल्या मुद्दयांच्या आधारे कृती सोडवा :

कविता - योगी सर्वकाळ सुखदाता


उत्तर : योगी सर्वकाळ सुखदाता


(१) प्रस्तुत कवितेचे कवी -  संत एकनाथ महाराज.

२) प्रस्तुत कवितेचा विषय : संत एकनाथ महाराजांचा हा अभंग योगी पुरुषाचे महत्त्व सांगणारा आहे.

३) प्रस्तुत कवितेतील ओळींचा सरळ अर्थ : 'तैसे योगियासी खालुतें येणें । जे इहलोकीं जन्म पावणें । जन निववी श्रवणकीर्तनें। निजज्ञाने उद्धरी।।

आकाशातील ढगांतून पाणी खाली मातीवर येते, त्यामुळे त्यातून अन्नधान्य निर्माण होते. त्याप्रमाणे योगी पुरुष जेव्हा धरतीवर अवतरतो म्हणजेच जेव्हा तो इहलोकात जन्म घेतो. तेव्हा त्याच्या बोलण्याने, ते बोल ऐकण्याने लोकांची मने तृप्त होतात. योगी पुरुष आत्मज्ञानाने लोकांचा उद्धार करतो.

(४) प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश योगी पुरुष तप साधनेने आत्मज्ञान प्राप्त करतो. त्या आत्मज्ञानाची शिदोरी तो जनमानसात श्रवणकीर्तनाने वाटतो. योगी पुरुषाच्या आत्मज्ञानाने माणसांची मने निर्लेप, निस्वार्थी व निर्मळ होतात. म्हणूनच योगी पुरुषाच्या सान्निध्याने भवसागर पार करण्याचे आत्मिक बळ आणि मन:शांती मिळते, असा संदेश या अभंगातून मिळतो.


(५) कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे संत एकनाथ महाराजांनी योगी पुरुष व पाणी यांची प्रस्तुत अभंगात सार्थ तुलना केली आहे व योगी पुरुषाचे श्रेष्ठत्व ठसवले आहे. पाण्याने एका वेळची तहान भागते; परंतु योगी पुरुष हा सर्वांसाठी सर्वकालीन सुख देणारा सज्जन आहे, ही बाब संत एकनाथांनी सोदाहरण, सोप्या शब्दांत पटवून दिली आहे. त्यांनी विशद केलेले योगी पुरुषाचे महत्त्व थेट मनाला भिडते. सत्संगाने जीवनाचे मार्गदर्शन व मनःशांती मिळते, हे मनोमनी पटते, म्हणूनच हा अभंग मला आवडतो.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad