कविता : अंकीला मी दास तुझा
प्रश्न .१.खालील कवितेवर आधारित कृती सोडवा. गुण :०८
१) प्रस्तुत कवितेचे कवी / कवयित्री : संत नामदेव
२) प्रस्तुत कवितेचा विषय : देवरूपी आई (जननी) ने आपल्या बाळाचा सांभाळ मायेने करावा अशी विनंती या अभंग गाथे मध्ये केली आहे.
३) प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश : देवाची / भगवंताची आपण मना पासून सेवा केली तर देव आपली ईच्या पूर्ण करतो.
४) प्रस्तुत कविता आवडण्याचे व न आवडण्याचे कारण : प्राणी - पक्ष्यांमधील मातृप्रेमाचे वर्णन अतिशय सुंदर केले आहे.
५) कवितेतील पुढील चार शब्दांचे अर्थ लिहा :
अ) वत्सरावे : वासरू
ब) धेनु : गाय
क) पाडस : हरिणीचे पिल्लू
ड) कनवाळू : दयाळू
प्रश्न.२. पुढील कृती केव्हा घडतात, ते लिहा :(कोणतेही 2 लिहा) गुण : ०२
१) माता धावून जाते : जेव्हा बाळ आगीत पडते.
२) पृथ्वीवर पक्षिणी झेपावते : जेव्हा पक्षिणीचे पिल्लू झाडावरून खाली पडते.
३) गाय हंबरत धावते : जेव्हा वासराला भूक लागते.
४) हरिणी चिंतित होते : जेव्हा पाडस वणव्या मध्ये सापडते.
किंवा
(२) कोण ते लिहा :
१) परमेश्वराचे दास : संत नामदेव
२) मेघाला विनवणी करणारा : चातक