छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा
जय भवानी जय शिवाजी
स्वराज्य स्वराज्य ही संकल्पना काळानुरूप बदलत गेलेली आहे.
स्वराज्य म्हणजे स्वतःचे सार्वभौम राज्य हा अर्थ निश्चितपणे लक्षात येतो . यामध्ये लोकांचे रक्षण, सार्वजनिक हित साधणे देशाच्या रक्षणाकरिता लष्कर व मुलकी सेवा संघटित करणे व सर्वसामान्यतः रयतेच्या कल्याणाच योजना आखणे होय.
शिवाजी महाराजांच्या स्वराज्यालय ध्येय आणि हिंदू परंपरा यासाठी स्फुर्ती मिळाली. शिवाजी महारानी हिंदवी स्वरा अभप्रेत होता. मुसलमान राज्यका हिंदू राज्यकत्यांच्या अधिपत्याखाली आणणे व हिंदवी स्वराज्य स्थापना करणे हा स्वराज्याच्या स्थापनेमागचा प्रमुख हेतू होता .
महाराजानी ज्याला हिंदवी स्वराज्य म्हटले आहे त्या संकल्पनेमध्ये हिंदूने स्वयंशासित राज्य हा अर्थ अभिप्रेत होता. मुसलमान राज्यकर्त्यांच्या ताब्यातील हिंदुस्थान, हिंदू राज्यकत्यांच्या अधिपत्याखाली आगणे व हिंदुपतपातशाहीची स्थापना करणे हा स्वराज्याच्या स्थापनेमागचा प्रमुख हेतू होता. हिंदवी स्वराज्याचा अर्थ हिंदूचे अथवा मराठ्यांचे राज्य असा मर्यादित नव्हता तर हिंदुस्थानातील लोकांचे अधिराज्य अशा व्यापक अर्थाने तो अबलविला होता. स्वतंत्र निर्मितीमागची प्रमुख प्रेरणा होती. स्वराज्य भौगोलिकदृष्ट्या लहान होते परंतु ते राजकीयदृष्ट्या स्वतंत्र व स्वयंशासित होते. हिंदू धर्मीयांना या राज्यात स्वाभिमानाने जगता येत होते.
स्वराज्याचे महत्व स्वराज्यामुळे हिंदू धर्मियांना आपल्या धर्माचे पालन निर्भयपणे करता येऊ लागले.
स्वराज्यामुळे रयतेचे शाश्वत जीवन सुरक्षित झाले. प्रजेला केवळ धार्मिक जानातून नव्हे तर वतनदार व जहागीरदाराच्या जागातूनही मुक्त करण्याचे महत्वाचे कार्य केले.
स्वराजातील लोकांचे रक्षण करणे ,आजूबाजूचा प्रदेश आपल्या अधिपत्या खाली असणे गरजेचे व आवश्यक होते. तसेच निजामशाही ,आधीलशही ,मुघल शाही यांनी कधी दगा पटका केला तर त्यांना प्रतिकार करण्यासाठी निष्ठावान सैन्य असणे गरजेजे होते .
शिवाजी महाराज बंगलोरडून पुण्यास आल्यानंतर बारा मावळ आपल्या वर्चस्वाखाली आणले होते.
कान्होजी जेधे:
बाजी पासलकर :
सूर्यराव काकडे :
येसाजी कक :
जिवा महाल :
दादाजी नरसप्रभु:
नऱ्हेकर देशपांडे :
बापूजी मुदगल :
तानाजी मालुसरे :
असे कर्तत्ववान व्यक्ती शिवाजी महाराजांसोबत आले. त्यांच्या समवेतच रायरेश्वराच्या साक्षीने स्वराज्याची शपथ शिवाजी महाराजांनी घेतली अद्वितीय साहस आणि विलक्षण मुत्सद्देगिरीच्या जोरावर त्यांनी स्वराज्य स्थापनेकडे वाटचाल केली.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभे केलेले स्वराज्य हे सह्याद्रि च्या खोऱ्यातील होते . त्या ठिकाणी घनदाट जंगल आणि वनराई होती.
या ठिकाणी जे गड आणि किल्ले होते त्याचे रक्षण करण्यासाठी मनुष्यबळ असणे गरजेचे होते या साठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी जात पात न मानता स्वराज्य निर्मिती साठी सैन्य ( मावळे ) तयार केले जे आपल्या माय जन्म भूमीसाठी लढू शकतात . असे एक नव्हे लाख मावळे तयार झाले स्वराज निर्मिती साठी तयार झाले.
त्या मधील काही मावळ्यांची नावे वर दिले आहेत.
लोकांमध्ये स्वराज्य निर्मिती साठी छत्रपती शिवाजी महाराज नवचेतना निर्माण केली होती.