विषय - मराठी वर्क शीट विभाग 1 ची उत्तर पत्रिका / sub Marathi worksheet ans key
प्रश.१.अ . कृती कधी घडतात ते लिहा.
(अ) माता धावून जाते
उत्तर : बाळ आगीत पडते तेव्हा आई धावून जाते.
(आ) धरणीवर पक्षिणी झेपावते.....
उत्त पक्षिणीचे पिल्लू झाडावरून खाली पडते .त्या वेळेस ती धरती कडे झेप घेते.
इ) योगी पुरुषाचे चार वैशिष्ट्ये :
उत्तर : योगी पुरुष मृदू असतो. सर्वकाळ सुख देणारा असतो.स्वानंद तृप्ती देतात. सर्व इंद्रियांना शांत करतात.
प्रश.२. चौकटी पूर्ण करा.
1) पु. ल. व त्यांची पत्नी यांनी दिलेल्या शालीचा केलेला उल्लेख काय आहे : पुलकित शाल
2)पाठात उताऱ्यात उल्लेख असणारी नदी. : कृष्णा नदी
3) सभा, संमेलने गाजवणारे कवी.: नारायण सुर्वे.
प्रश्न.३. ' शाल व शालीनता ' तुम्हाला कळलेला अर्थ लिहा.
उत्तर : 'शाल' हे सन्मानचिन्ह आहे. 'शालीनता' हा सज्जन माणसाचा स्वभावधर्म आहे. जी व्यक्ती मूलतः शालीन किंवा सालस असते, तिला शाल अधिक शोभा देते. किंबहुना शालीन माणसाला शालीची गरजही नसते. जो दुर्जन माणूस असतो, त्याला शालीने किती नटवले, तरी त्याच्यात शालीनता येणे कठीण आहे.
प्रश्न.४. पंतांची आस्था वाढू लागलेल्या गोष्टी.
उत्तर : --- आहारशास्त्राच्या पुस्तकाचे वाचन ,प्रोटीनयुक्त, चरबीयुक्त पदार्थ हे शब्द आवडू लागले.
ताटातल्या पदार्थांऐवजी कॅलरिज दिसू लागल्या
प्रश. ५. शब्द समूहा साठी एक शब्द .
१) भाषेचा प्रवाह : वाक्य प्रवाह.
प्रश्न. ६. टिपा लिहा.
१) B.A.R.C :
उत्तर : B.A.R.C. म्हणजेच 'भाभा अॅटॉमिक रिसर्च सेंटर'चे लघुरूप आहे. होमी भाभा हे भारतातील थोर अणुशास्त्रज्ञ होते. त्यांनी भारतामध्ये अणुसंशोधनाचा पाया घातला. भारताच्या अणुसंशोधनाचे होमी भाभा हे अध्वर्यू होत. म्हणून हे नाव केंद्राला दिले आहे.(अजून उत्तर लिहू शकता .पुस्तक पाहावे)
२) डॉ. होमी भाभा :
उत्तर : डॉ. होमी भाभा हे भारतातील
विश्वविख्यात अणुशास्त्रज्ञ होते. त्यांनी भारतातील अणुसंशोधनाचा पाया घातला. म्हणून हे नाव केंद्राला दिले आहे. B.A.R.C. म्हणजे भाभा अॅटॉमिक रिसर्च सेंटर! त्यांचे स्वरूप हे नवतरुण नवीन पिढीला ऊर्जा देणारे होते. लेखकांनी त्यांच्याबद्दल सांगितलेली एक आठवण आहे - लेखक जेव्हा ट्रेनिंग स्कूलला शिकत असताना, तिथे होमी भाभा तीन-चार वेळा आले होते. विद्यार्थ्यांनी विचारले की आम्हा सर्व विद्यार्थ्यांना पुरेल इतके काम येथे आहे का? ते उद्गारले की तुम्ही चिंता करू नका. तुम्ही सर्वजण संशोधन करा. तुम्ही स्वतःच काम निर्माण करा. काय काम करायचे ते तुम्ही स्वतःच ठरवा. मालकाने सांगितले तेवढेच काम करायचे हे चुकीची आहे. या उद्गारातून होमी भाभा यांचा संशोधनाच्या बाबतीतला सकारात्मक दृष्टिकोन दिसून येतो.
प्रश्न. ७. वाक्य प्रचार .
१) हात दाखवून अवलक्षण :अर्थ : आपण होऊन संकटओढवून घेणे.
वाक्य : मधू आजारी असताना पोहायला गेला, त्याने हात
दाखवून अवलक्षण केले.
२) सुरुंग लावणे : अर्थ : एखादा बेत उधळून लावणे.
वाक्य : घरात कचरा करून अरुणने स्वच्छता मोहिमेला सुरुंग लावला.