Type Here to Get Search Results !

10 वी नंतर काय ?/ After 10 th

 10 वी नंतर काय ? 

इयत्ता १० वी चा निकाल लागला आता पुढे काय असा प्रश्न पालक व मुलांना पडतो . आपल्या कडे दहावी ची परीक्षा पास होणे याला खूप महत्व दिलेजाते  त्याचे कारण ही तसे आहे  ते म्हणजे आपले करियर . तुम्हाला 10 वी ला किती मार्क्स मिळाले या वरून पुढील वाटचालीची दिशा आपण सर्व जण ठरवत असतो.

या वर्षी महामारी मुळे परीक्षा झाली नाही पण अंतर्गत मूल्यमापन पद्धतीने मुलांना गुण दिले . आता वेळ आहे ती आपल्या करियर ची वाट निवडणे .

 तुम्हाला किती गुण मिळाले यावर तूम्ही तुमची शाखा निवडता असता जी शाखा तुम्ही निवडता त्या मध्ये तुम्हाला स्वतःला आवड पाहिजे . तुमचे मित्र घेत आहेत म्हणून तुम्ही  घेऊ नका प्रत्येकाची अभ्यास करण्याची क्षमता वेगळी असते. जो निर्णय तुम्ही घेणार आहात त्यावर तुमचे भविष्य अवलंबून असणार आहे. म्हणून दहावी नंतर कोणता मार्ग निवडायचा या चा विचार काळजी पूर्वक करावा.

दहावी पास नंतर आपण काय करू शकतो:

तुम्हा सर्वांना कॉलेज ला जाणे आवडते कारण कॉलेज विश्व थोडे वेगळे असते. कॉलेज विषयी थोडे जाणून घेऊ

या मध्ये तीन शाखा असतात तसेच इतर ही डिप्लोमा व कोर्सेस

1) कला 

2) वाणिज्य

3) विज्ञान 

4) डिप्लोमा कोर्सेस 

5) आय टी आय : 

या तीन शाखेतील कोणती शाखा निवडावी हा ही प्रश्न मनात निर्माण होतो?

कला शाखा :  कला शाखेतून  खूप मार्ग निवडतात येतात.या शाखेची ओळख  करून घेतली पाहिजे या मधून सुद्धा तुम्ही तुमचे करियर करू शकता टाईमपास म्हणून ही शाखा निवडू नका. 

या शाखेमधून तुम्ही समाजशास्त्र, मानसशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास , असे अनेक विषयात पदवी घेऊ  शकता . 

 अनिमेशन, अभिनय किंवा इतर कुठल्याही क्रिएटीव्ह क्षेत्रात पदवी घेऊन असंख्य मार्ग तुमच्या पुढे  उपलब्ध होतात. या साठी तुम्हाला परिश्रम करावे लागणार.


वाणिज्य : 

वाणिज्य शाखा या मध्ये  आर्थिक व्यवहारांशी  संबंधित संपूर्ण अभ्यासक्रम आहे .त्यामुळे येथे  काटेकोरपणा आणि अचूकतेला खूप महत्त्व असते.या मध्ये तुम्ही पदवी नंतर CA ची परीक्षा देऊ शकता.

संधी : बँक क्षेत्रात करियर करण्यासाठी .

विज्ञान : जास्तीत जास्त  पालकांची इच्छा असते की आपल्या मुलाने  विज्ञान शाखे ची निवड करावी . कारण यानंतर मार्ग भरपूर आहेत जसे की  डॉक्टर, इंजिनियर . यासाठी मार्क्स तसे पाहिजेत . 

पण या मध्ये तुमची ईछ्या ,आवड असणे गरजेचे आहे. पालक म्हणतात म्हणून करायचे असे करू नका. 

अति महत्वाचे सर्व प्रथम तुम्हाला कश्या मध्ये आवड आहे , कश्या मध्ये करियर करायचे आहे या बाबत आई वडील यांच्या बरोबर चर्चा करा व नंतर मार्ग निवडा.

डिप्लोमा कोर्सेस :

डिप्लोमा कोर्सेस मध्ये : कृषी , इंजिनिअर , कॉम्पुटर,सिरॅमिक ,इलेक्ट्रॉनिक व कॅमुनिकेशन अजून अनेक कोर्सेस आहेत . 

फॅशन  डिजाइनिंग कोर्सेस : 

हा सर्वांचा आवडीचा विषय आहे. या मध्ये तुम्ही तुमचे करियर करू शकता फॅशन ची आवड असेल तर .
या मध्ये डिओलॉम इन फॅशन टेकनॉलॉजि , फूट वेअर, लेदर डिझाइन .असे अनेक विविध कोर्सेस करु शकता.

आय टी आय : 

आयटीआय म्हणजे औद्योगिक प्रशिक्षण संस्था होय . या मध्ये विविध व्यवसाय चे प्रशिक्षण दिले जाते . विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकासावर आयटीआय व्यवसाय आणि अभ्यासक्रम आहे.

आय टी आय - डिझेल मेकॅनिकल , ट्रॅक्टर ,फिटिंग ,वेल्डिंग  असे अजून  वेगवेगळे  आय टी आय  प्रकार आहेत ते तुम्ही करू शकता.

प्रोग्रामिंग भाषा कोर्सेस :

या मध्ये ग्रोफिक डिझाइन,क्रिएटिव्ह डायरेक्टर ,Ms ऑफिस ,
C++ . असे अनेक कोर्स तुम्ही करू शकता.

शाखा निवडताना कोणत्या गोष्टी  महत्त्वाच्या असतात .

१)आवड व ईच्छा :

 तुम्ही जी शाखा निवडणार आहे या मध्ये तुम्हाला आयुष्य भर काम करावे लागणार आहे  हे काम आपण  इतक्या  मोठ्या कालावधीसाठी करू शकणार आहे का? हा प्रश्न स्वतःला विचारा. कारण आपल्या ज्या मध्ये आवड असते त्या मध्ये काम करायला आपल्याला कंटाळा येते नाही. यासाठी तुम्हाला जो विषय आवडतो तो निवडा

) व्यक्तिमत्व अभ्यास : आपल्यात काय कौशल्ये आहेत हे जाणून घेणे.

३) अनुभवी लोकांशी चर्चा :ज्या विषयात आपल्याला आवड आहे .त्या मध्ये कोणी पहिले करियर केलेलले अश्या लोकांशी चर्चा करणे. 

४) क्षमता : तुम्ही तुमच्या करियर चा   निर्णय घेतला पाहिजे . बाकी लोकांवर   अवलंबून राहू नका.  तुमच्या करियर चा निर्णय तुम्ही घ्या या मधून तुमची निर्णय क्षमता दिसते.





 


 




Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad