ऑनलाईन टेस्ट मराठी विभाग १
या ऑनलाईन चाचणी मध्ये आपण विषय मराठी यामध्ये विभाग 1 . यातील संत वाणी मधील दोन कविता. पाठ .शाल, पाठ उपास स्थूलवाचन मधील 1 पाठ . या सर्व घटकांवर ही 30 गुणांची परीक्षा ऑनलाईन आहे.
या मध्ये विचारलेले प्रश्न हे ssc परीक्षेत वारंवार येणार प्रश्न आहेत. त्यामुळे हा पेपर काळजी पूर्वक द्या . पेपर दिल्या नंतर तो तुमच्या नोट बुक मध्ये लिहून ठेवा.
या ऑनलाईन परिक्षेसाठी चा पेपर पुढे दिला आहे तो लक्ष्य पूर्वक पाहा आणि पेपर लिहा.
या ऑनलाईन पेपर मध्ये व्याकरण ,कविता, स्थूलवाचन, पाठ असे चार घटक आहेत. हे चार घटक मराठी मध्ये पहिल्या भाग मध्ये आहेत.
या सर्व घटकांची माहिती थोडक्यात पाहणार आहोत .
कविता :१. अंकिला मी दास तुझा :
या अभंगात संत नामदेव यांनी भगवंत विठ्ठलाला माता म्हटले आहे ज्याप्रमाणे एखादी माता आपल्या बाळाला जीव लावते व त्याची पाठराखण करते त्याप्रमाणे भगवंता तुही माझ्यावर व या लहान बाळावर जीव लावा अशी नम्र पणे विनंती या अभंगात केलेली आहे.
कविता :२. योगी सर्वकाळ सुखदाता:
या कवितेमध्ये योगी पुरुष किती थोर आहेत याचे उदाहरणासह स्पष्टीकरण यामध्ये दिलेल्या योगी आपल्या सहवासाने लोकांचा उद्धार करतात लोकांना सत्याचा मार्ग दाखवतात संत एकनाथ यांनी या अभंगात पाणी व योगी यांची तुलना करून योगी पुरुष पाण्यापेक्षा कसे श्रेष्ठ आहेत हे वेगवेगळी उदाहरणे देऊन स्पष्ट केलेले आहे
पाठ.३. शाल :
या पाठा मध्ये शाली भोवती असलेले लेखकाच्या आठवणी या पाटातून व्यक्त झाल्या आहेत शाल ही प्रतीकात्मक आहे शाली मुळे येणारा शालीन तेचा संदर्भ यामध्ये अंतर्मुख करणारा आहे पाठातील काही उदा किंवा घटना या माणसाची संवेदनशीलता हे मूल्य ची जाणीव करून देणारी असतात . या सर्व घटनांचा ठेवा जतन ठेवणे गरजेचे आहे. या सर्व घटना व आठवणींचा उजाळा महत्त्वाचा आहे त्यामुळे त्याचे मानवी जीवनामध्ये महत्व खूप असते असा चा पाठ आहे या पाठांमध्ये वरील प्रमाणे शाली चे महत्व सांगितले आहे.
लेखक लेखक वाईला विश्वकोशा चे अध्यक्ष म्हणून गेले होते त्या ठिकाणी नदीकाठच्या पार्ट शाळेच्या खोलीत ते राहत असे खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर होत्या थंडीच्या दिवसात एक बाई माझ्या खिडकीखाली घाटाच्या छोट्या तटावर एक लहान मुल टोपली घेऊन मासे पकडण्याचे काम करत होती त्या बाईचे बाळ थंडीने कुडकुडत जोराने रडत होते पण त्याकडे तिचे लक्ष नव्हते हे दृश्य पाहून मला रहावले नाही मी माझ्या सुटकेस मध्ये एक शाल काढली तसेच काही पैसेही देण्यासाठी वर काढले व त्या स्त्रीला हाक मारून ती शाल व पैसे तिला दिले.
पाठ .४.उपास :
उपवास या पाठात मध्यमवर्गीय लोकांच्या संकल्पपूर्ती तू कसे अंतर पडले जाते व त्यातून विनोद तयार होतात किंवा ते हास्यास्पद ठरतात याचे लेखन या पाठांमध्ये लेखकाने केलेले आहे.
लेखक हे ज्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणी आलेले अनुभव त्यांचे वजन कमी करण्याबाबत ते या ठिकाणी त्यांनी सांगितलेले आहे लेखक आपले वजन कमी करण्यासाठी कोण कोणते उपाय करावे यासाठी सर्व चाळीतील लोकांना विचारत असत प्रत्येक व्यक्ती लेखकाला वेगवेगळ्या अटी व खाण्याबाबत नियम सांगत असे.
दोन महिन्यात पन्नास पाउंड वजन कमी करेल अशी प्रतिज्ञा ही लेखकाने घेतले होते व त्यासाठी पुस्तके वाचत असे दोन महिन्यात वजन कमी करण्यासाठी जे काय करावे लागेल ते करण्यासाठी लेखक तयार होते हे करत असताना चाळी मध्ये घडलेले अनेक हास्यविनोद व काही घटना त्यांनी यामध्ये सांगितलेल्या आहेत.
स्थूलवाचन :१. मोठे होत असलेल्या मुलांनो :
स्थूल वाचन आतील या पाठांमध्ये डॉक्टर काकोडकर यांनी लिहिलेले एक पत्र आहे यामध्ये त्यांनी बार्क मधील अनुभव मुलांच्या जडणघडणीमध्ये कसे आवश्यक आहेत ते त्यांनी सांगितले आहे कुठल्याही मोठ्या कामाची सुरुवात लहान अशा कामावर मधून होत असते कोणतेही काम कमी न लेखता किंवा ते कमी दर्जाचे आहे असे न मानता ते काम मी करेन अशी सवयी आपण ठेवली तर आपल्याला कोणत्याही कामांमध्ये अडचण येणार नाही असा संदेश किंवा अशी शिकवण या पाटातून लेखकांनी दिलेली आहे आहे.