Type Here to Get Search Results !

कारगिल विजय दिवस | kargil vijay Day

कारगिल विजय दिवस/ kargil vijay Day

नमस्कार आज आपण 26 /07  या दिवशी कारगिल युद्धात भारताने आपल्या विजयाचा झेंडा आपल्या पराक्रमाने शौर्य ने फडकावला होता.  म्हणून हा दिवस साजरा केला जातो.



कारगिल विजय दिवस 

विजय दिवस 26 जुलै हा  आपल्या साठी व सैन्य दल यांच्या साठी अभिमानाचा व शौर्याचा दिवस आहे.दिनांक. 26 /07  या दिवशी कारगिल युद्धात भारताने आपल्या विजयाचा झेंडा आपल्या पराक्रमाने शौर्य ने फडकावला होता.  म्हणून हा दिवस साजरा केला जातो.
 कारगिल विजय दिवस 

कारगिल युद्ध का झाले ?

 कारगिल युद्ध का झाले हे थोडक्यात जाणून घेऊया.
कारगील हे लहान शहर आहे .हे शहर जम्मू आणि काश्मीरची राजधानी श्रीनगरपासून २०५ किलोमीटर अंतरावर आहे.
हवामान : उन्हाळा कडक. हिवाळा अति थंडअसतो.
तापमान उणे ४० अंश सेल्सियस पर्यंत असते.
   घुसखोरी : घुसखोरांनी पाकव्याप्त काश्मीरच्या   जवळच्या आणि रस्त्याला समांतर अशा १६० किलोमीटरच्या पट्यातच घुसखोरी केली होती. हिवाळ्यापूर्वी दोन्ही बाजूने सैन्याची माघार व्हावी आणि उन्हाळ्यात बर्फ वितळल्यावर व हवामान मानवी रहाण्यास स्थिर झाल्यानंतर ते- ते सैन्य आपापल्या चौक्यांमध्ये परतावे, असा अलिखित समझौता भारत- पाकिस्तानमध्ये कारगील युद्धाच्या आधीपर्यंत होता.
भारतीय सैन्य भारतीय चौक्यांवर परतण्यापूर्वीच पाकिस्तानी घुसखोरांनी ऐन हिवाळ्यात चौक्यांचा ताबा घेतला. त्यामुळे कारगीलचे युद्ध भडकण्यास ठिणगी पडली.चौक्यांचा ताबा घुसखोरांकडे गेल्याने त्यांना उतारावरील चौक्यावर नियंत्रण ठेवणे सोपे गेले.चौक्यांचा ताबा परत घेण्यासाठी भारताने ऑपरेशन विजय सुरू केले होते.

 kargil vijay Day  - युद्धाचा क्रम  :

१) ०४ मे ला पाकिस्तान कारगिल येथील उंच ठिकाणी घूस खोरी केली.
२) ०५ मे ते १५ मे या दिवसात भारतीय सैन्य दलाने जी माहिती मिळाली त्याची पाहाणी केली.
३) या काळामध्ये कॅ. सौरभ कालिया बेपत्ता झाले होते त्यांना पाकिस्तानी सैन्याने त्यांना ठार केले.
४) ही बातमी समजल्या नंतर भारतीय हवाई दलाने कारगिलमधील पाकिस्तानी सैन्याच्या छावण्यांवर हवाई हल्ले सुरु केले.
५) भारतीय हवाई दलाचे एक विमान अपघात होऊन कारगिल येथे पडले त्यातील वैमानिक यांना पाकिस्तान सैन्या नि कैद केले. 
६) भारतीय वैमानिक यांना सोडले.
७)१० जून ला भारतीय सैन्य जे पाहाणी करण्यासाठी गेले होते त्यांचे देह विचित्र अवस्थेतील भारताला दिले.
८) १२ जून ला दोन्हीं देशात मध्ये जी चर्चा झाली ती निष्फळ झाली.पाकिस्तान ची भूमिका आड पणाची होती.
९) १५ जून ला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी पाकिस्तान ला सैन्य माघारी घेण्यास सांगितले.
१०) २९ जून : भारतीय सैन्य यांनी  टायगर हिल्स या प्रदेशातील दोन अतिमहत्वाच्या चौक्या आपल्या ताब्यात घेतल्या. 
११) ४ जुलै :  टायगर हिल्स या भागावर भारतीय
  सैन्य यांनी ताबा मिळवला. भारतीय सैन्याच्या  तीन तुकड्यांनी १८ ग्रेनेडियर्स, २ नागा आणि ८ शिख बटालियनने यांनी प्रदेशात जोरदार गोळीबार करुन हा प्रदेश ही आपल्या ताब्यात घेतला .
१२) ११ जुलै ला पाकिस्तान ने सैन्य माघारी घेतले.
१३) १४ जुलै ला भारताचे ऑपरेशन विजय हे पूर्ण झाले

जवान शहीद भावपुर्ण श्रद्धांजली - कारगिल विजय दिन

देश रक्षणासाठी जे जवान शहीद झाले त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली. तुम्ही दिलेल्या लढ्यामुळे आज आम्ही  आनंदात आहे पण या आनंदासाठी तुम्ही तुमचे प्राण दिले हे आम्ही कधी ही विसणार नाही. तुमच्या जिद्दीला , पराक्रमाला सलाम. 

🇮🇳जय हिंद🇮🇳























Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad