पाठ. ४. उपास/ std .10 chapter 4. Question and Ans
कृती
१. पंतांची आस्था वाढू लागलेल्या गोष्टी :
उत्तर : आहारशास्त्राच्या पुस्तकाचे वाचन
प्रोटीनयुक्त, चरबीयुक्त पदार्थ हे शब्द आवडू लागले.
ताटातल्या पदार्थांऐवजी कॅलरिज दिसू लागल्या.
२. पंतांच्या आहारतज्ज्ञ मित्रांनी वर्ज्य करायला सांगितलेल्या आहाराव्यतिरिक्तच्या गोष्टी.
उत्तर : दिवसा झोपणं सोडणे.पत्ते खेळायचे सोडणे.रनिंग करणे
३. पंतांच्या आहारनियंत्रणाविषयी त्यांच्या पत्नीच्या प्रतिक्रिया.
उत्तर : रोज चमत्कारिक पदार्थ खायला घालणे.
उकडलेली पडवळे खायला घालणे व बिनसाखरेचा चहा व
शेवग्याच्या व चवळीच्या शेंगा, भेंडी वगैरे सडपातळ भाज्यांचा खुराक कॉलीफ्लावर, कोबी वगैरे बाळसेदार भाज्या वर्ज्य.
प्रश्न .२. कारणे लिहा.
१) वजन करण्यासाठी न बोलण्याचा उपाय पंतांना जमणार नव्हता ,कारण : वजन कमी करण्यासाठी न बोलण्याचा उपाय पंतांना जमणार नव्हता; कारण पंतांची नोकरी टेलिफोन-ऑपरेटरची होती.
२)बाबा बर्वे पंतांच्या समाचाराला आले नाहीत; कारण 'उपास हे त्यांचे खास राखीव कुरण होते.
प्रश्न.३. पाठा आधारे खालील संकल्पना चा अर्थ स्पष्ट करा.
१. भीष्मप्रतिज्ञा - एखादया गोष्टीचा किंवा कार्याचा मनाशी
केलेला ठाम निर्धार.
२. बाळसेदार भाज्या - ज्या भाज्यांमुळे कॅलरीज वाढून अंग गुटगुटीत होते, अशा भाज्यांना बाळसेदार भाज्या म्हटले आहे.
३. वजनाचा मार्ग भलत्याच काट्यातू न जातो - वजन कमी करण्यासाठी पंतांना जे उपद्व्याप करावे लागले, त्याने जेरीस येऊन त्यांनी हे सत्य आकळणारे उद्गार काढले आहेत. काट्यांतून चालावे तसा हा वजन कमी करण्याचा मार्ग आहे, असा या वाक्याचा अर्थ आहे.
४. असामान्य मनोनिग्रह : सगळ्यांच्या सल्ल्यानुसार वागणे, वजन कमी करण्यासाठी पराकाष्ठा करणे भलभलते उपाय करणे याला मनाचा असामान्य निग्रह म्हणजे निर्धार असे म्हटले आहे.
प्रश्न .४. खालील शब्द समुहासाठी पाठातून एक शब्द शोधा.
१. ठरवलेले व्रत मध्येच सोडणे : व्रत भंग
२. वजन घटवण्यासाठी आहार बदलण्याची कल्पना : आहार परिवर्तन.
३. भाषेची प्रवाह : वाक्य प्रवाह.
प्रश्न.५. अचूक शब्द ओळखून लिहा :
* (1) वडीलांसोबत / वडिलांसोबत/वडिलानसोबत / वडीलानसोबत.
उत्तर : वडिलांसोबत
*2) तालमिला / तालमीला / ताल्मीला / ताल्मिला.
उत्तर :तालमीला
* 3) गारहाणी / गाणि / गाऱ्हाणी / ग्राहाणी.
उत्तर : गाऱ्हाणी.
प्रश्न. ६ . खालील वाक्य प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या जुळवा.
१. हात दाखवून अवलक्षण एखादा बेत उधळून लावणे
२. सुरुंग लावणे आपण होऊन संकट ओढवून घेणे
३. अंगाचा तिळपापड होणे स्तुतीने हुरळून जाणे.
४. मूठभर मांस चढणे खूप संताप येणे.
उत्तर : १. हात दाखवून अवलक्षण ---- आपण होऊन संकट ओढवून घेणे
२. सुरुंग लावणे - एखादा बेत उधळून लावणे.
३. अंगाचा तिळपापड होणे - खूप संताप येणे.
४. मूठभर मांस चढणे - स्तुतीने हुरळून जाणे.
प्रश्न.७ . स्वमत लिहा.
अ)दोरीवर उडी मारणे या घटनेतील तुम्हांला समजलेला
मजेशीर विनोद स्पष्ट करा.
उत्तर : पंतांना डाएटिंगसाठी दोरीवरच्या उड्या मारण्याचा सल्ला कचेरीतील सहकारी महिलेने दिला. त्यात त्यांनी दोरीवरच्या उड्या मारण्याचा प्रयत्न केला. दिवाणखान्यात संपूर्ण दोरी फिरवताना एकदा ड्रेसिंग टेबलवरच्या तेलाच्या व औषधांच्या बाटल्या खाली पडल्या. दुसऱ्या खेपेस ही दोरी जवळच्या बर्वे यांच्या गळ्यांत अडकली.
(आ) पंत यांनी केलेल्या उपास या विषयी त्यांची पत्नी यांचा उत्साह तुमच्या शब्दांत वर्णन करा.
उत्तर : वजन कमी करण्यासाठी पंतांनी डाएट करून उपास करण्याचा संकल्प सोडला. तेव्हा शेजाऱ्यापाजाऱ्यांनी व कचेरीतील सहकाऱ्यांनी पंतांना भलभलते सल्ले दिले. या प्रकरणात त्यांच्या पत्नीचा उत्साह कमालीचा होता. पंतांच्या पत्नीने वेगवेगळे चमत्कारिक पदार्थ खाऊ घालण्याचा सपाटा लावला.
(इ) पाठातील तुम्हांला सर्वांत आवडलेला विनोद कोणता ? तो का आवडला ते स्पष्ट करा.
उत्तर : जेव्हा पंतांनी वजन घटवण्याचा शेवटचा निकराचा प्रयत्न केला, त्या वेळी त्यांनी केलेल्या कृती फारच विनोदी आहेत. त्यांना सडपातळ झाल्याची स्वप्ने पडू लागली. जेवणाचे ताट पुढे असताना न खाता ते उठू लागले. साखर पाहिली की त्यांना अतोनात राग येऊ लागला.
(ई) तुम्ही कोणता संकल्प केला आहे आणि तो पूर्ण केला नाही तर कुटुंबातील व्यक्ती कोणत्या प्रतिक्रिया व्यक्त करतील, याची कल्पना करून लिहा.
उत्तर : एकदा मी भल्या पहाटे उठून अभ्यास करण्याचा संकल्प केला. सगळ्यांना फुशारक्या मारल्या की उदया पहाटे उठणार! पण थंडी इतकी होती की उठलोच नाही. थेट आठ वाजता उठलो. इतक्यात आई म्हणाली - "काय रे? मोठा पहाटे उठणार होतास ना! काय झालं त्याचं? कुठल्या स्वप्नात मश्गुल होतास की काय?"