स्थूलवाचन .१. मोठे होत असलेल्या मुलांनो. प्रश्न उत्तरे
कृती स्वाधाय / सोडवलेले प्रश उत्तरे
१) B.A.R.C.
उत्तर : B.A.R.C. म्हणजेच 'भाभा अॅटॉमिक रिसर्च सेंटर'चे लघुरूप आहे. होमी भाभा हे भारतातील थोर अणुशास्त्रज्ञ होते. त्यांनी भारतामध्ये अणुसंशोधनाचा पाया घातला. भारताच्या अणुसंशोधनाचे होमी भाभा हे अध्वर्यू होत. म्हणून त्यांचे नाव अणुसंशोधन केंद्राला दिले आहे.
२) डॉ. होमी भाभा → डॉ. होमी भाभा हे भारतातील
विश्वविख्यात अणुशास्त्रज्ञ होते. त्यांनी भारतातील अणुसंशोधनाचा पाया घातला. म्हणून त्यांचे नाव अणुसंशोधन केंद्राला दिले आहे. B.A.R.C. म्हणजे भाभा अॅटॉमिक रिसर्च सेंटर! त्यांचे व्यक्तिमत्त्व तरुण नवीन शास्त्रज्ञ पिढीला स्फूर्तिदायक होते. लेखकांनी त्यांच्याबद्दल सांगितलेली एक आठवण आहे - लेखक जेव्हा ट्रेनिंग स्कूलला शिकत असताना, तिथे होमी भाभा तीन-चार वेळा आले होते. विद्यार्थ्यांनी विचारले की आम्हा सर्व विद्यार्थ्यांना पुरेल इतके काम येथे आहे का? ते उद्गारले की तुम्ही चिंता करू नका. तुम्ही सर्वजण संशोधन करा. तुम्ही स्वतःच काम निर्माण करा. काय काम करायचे ते तुम्ही स्वतःच ठरवा. मालकाने सांगितले तेवढेच काम करायचे हे चुकीची आहे. या उद्गारातून होमी भाभा यांचा संशोधनाच्या बाबतीतला सकारात्मक दृष्टिकोन दिसून येतो.
२) ऊर्जा मिळवणे व कार्यात सक्षम होणे हे ध्येय असावे ही परिस्थिती केव्हा निर्माण होऊ शकते, ते मोठे होत असलेल्या मुलांनो... या पाठाच्या आधारे लिहा.
उत्तर : डॉ. होमी भाभा यांच्या मते, स्वतःच काम निर्माण करणे व काय काम करावे, हे स्वतःच ठरवणे हा सकारात्मक विचार प्रत्येकाने करायला हवा. बॉसने सांगितले तेवढेच काम करणे, ही कोती प्रवृत्ती आहे. चिंता करीत न बसता, कार्यरत व कार्यमग्न झाले की स्काय इज द लिमिट ही परिस्थिती निर्माण होते. आपल्याला काही लोक बोट धरून चालवतील , रस्ता दाखवतील ही स्थिती आरंभी ठीक आहे. परंतु शेवटी स्वत:चे मार्ग स्वतः शोधणे, ऊर्जा मिळवणे व कार्यात सक्षम होणे हे ध्येय असावे. यालाच 'स्काय इज द लिमिट' असे म्हटले आहे.
३) मेटलायझिंग प्रक्रियेवर काम न होण्यामागची कारणे कोणती असावीत, असे तुम्हांला वाटते ?
उत्तर : बार्कमध्ये लेखक इंजिनियर म्हणून रुजू झाले. तेव्हा त्यांना मेटलायझिंग प्रक्रियेवर काम करायला सांगण्यात आले. त्या प्रसंगातून आपल्याला मेटलायझिंग प्रक्रियेवर काम न होण्याची कारणे कळतात. तिथे सगळी यंत्रसामग्री असली तरी, कोणी वापरत नाही. इंजिनियरला वेल्डर व फोरमन लागतात. परंतु कुणाचीही मदत न घेता इंजिनियरने आधी सर्व कामे करायला हवीत. स्वतः सगळी कामे इंजिनियरला आली तर मग त्याला इतर माणसे हाताखाली मिळतील व ते आनंदाने काम करतील. आपल्याला येत नसताना दुसऱ्याला काम सांगणे योग्य नाही. प्रथम आपण काम करायचे मग इतरांना सांगायचे, हे घडत नसल्यामुळे मेटलायझिंग प्रक्रियेवर काम होत नाहीत.