टोकियो ऑलिंपिक / TOKY OLYMPICS
नमस्कार
आज आपण ऑलिंपिक खेल या विषयी थोडे बोलणार आहोत. ऑलिंपिक असा शब्द ऐकू आला की आपल्या डोळ्यांसमोर समोर तीन रंग दिसतात त्या तीन रंगांना आपण अभिमानाने व सन्माना ने पदक ( मेडल) असे म्हणतो ते म्हणजे गोल्ड , सिल्वर व ब्रॉंझ . प्रत्येक देशाचा खेळाडू या दिवसाची आतुरतेने वाट पाहात असतो आणि त्याच्या साठी मेहनत ,कष्ट घेत असतो. व या पैकी एक म्हणजे गोल्ड पदक ( मेडल) जिंकून आपल्या देशाची मान उंच करण्याचे स्वप्न पाहात असतो. चला तर मंग टोकियो ऑलिंपिक स्पर्धा उद्या दिनांक 23/07/2021 पासून सुरू होत आहे या स्पर्धेचा आनंद घेऊ या.
तसे पाहिले तर टोकियो ऑलिंपिक स्पर्धा ही इतर ऑलिंपिक स्पर्धे पेक्षा खूप खास आहे आणि त्या मागचे कारण ही तसे खासच आहे पण थोडे मनाला चटका लावणारे ते म्हणजे कोरोना 19. या महामारी मुळे पूर्ण जग संकटात मध्ये आहे .
या कोरोना 19. या महामारी च्या संकटात प्रत्येक देशातील जगातील डॉक्टर, पोलीस कर्मचारी , आणि अनेक कर्मचारी हे आपल्या सर्वांसाठी 24 तास लढत आहेत या सर्वांना माझा मानाचा मुजरा.
या काळात ही आपले ध्येय न विसरता मेहनत घेणाऱ्या जगातील प्रत्येक खेळातील खेळुडाच्या जिद्दीला ही सलाम .
तुम्ही सर्व जण ऐवढी मेहनत ,कष्ट घेतले आहेत त्याचे फळ तुम्हा सर्वांना मिळो अशी सदिच्छा देतो.
या ऑलिंपिक मध्ये प्रत्येक देशाचा खेळाडू हा आपल्या देशाचे नाव मोठे व्हावे या साठी या मध्ये भाग घेत असतो . प्रत्येक खेळाडू ने दुसऱ्या खेळाडूचा मान राखला पाहिजे आणि एकमेकांना सन्मान दिला ही पाहिजे.तसेच प्रत्येक देशाचे प्रेक्षक आहेत त्यांनी प्रत्येक खेळाचा, खेळाडूचा व देशाचा मान सन्मान केला पाहिजे .
आपल्या मुळे कोणाला त्रास होईल असे बोलणे टाळावे.
जगातील सर्व खेळाडूंना पुन्हा एकदा शुभेच्छा तुम्ही सर्वांनाआप आपल्या खेळात यश मिळो ही सदिच्छा