Type Here to Get Search Results !

मुलांसाठी विशेष अनुदान योजना बार्टी / visheash Anudan barti

 

मुलांसाठी विशेष अनुदान योजना बार्टी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी)च्यावतीने .मुलांसाठी विशेष अनुदान योजना राबविण्यात येत आहे. 

या योजनेसाठी जे पात्र व  इच्छुक आहेत  त्यांच्या कडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या साठी काही नियम व नियमावली आहे.

योजना कोणासाठी : 

ही योजना  अनुसूचित जाती मधील इयत्ता  १० वी पास झाले आहेत व त्यांना इयत्ता 10 वी मध्ये ९० %पेक्षा अधिक गुण मिळाले आहेत अश्या गुणवान   विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

 MH- CET, NEET, JEE इ. व  त्या पुढील जे व्यावसायिक व उच्च शिक्षणाची आहे त्याची पूर्वतयारी त्यांना  करता यावी यासाठी विद्यार्थ्यांना विशेष असे आर्थिक सहाय्य त्यांना दिले जाते. 

ही योजना मार्च २०२१ मधील इयत्ता १० वी मध्ये पास  झालेल्या विद्यार्थ्यांना लागू आहे. 

या योजनेच्या महत्वपुर्ण  अटी :

१) या योजनेत जे विद्यार्थी येणार आहेत त्या  विद्यार्थ्याच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखापेक्षा कमी असले पाहिजे.


२) घरातील कोणताही  व्यक्ती  शासकीय/निमशासकीय कामात नसावा.

३) त्या बाबत चे  पालकांना  स्वघोषणापत्र द्यावे लागणार आहे.

योजनेसाठी कोण कोणते कागदपत्रे गरजेचे आहेत.

१) विद्यार्थी किंवा पालक यांचे जात प्रमाणपत.

२) उत्पादन प्रमाणपत्र

३) इयत्ता १० वी चे गुणपत्रक.

४) रहिवाशी दाखला गरजेचा आहे.

५) शाळा सोडल्याचा दाखला  .

६) शाळेचे मुख्याध्यापक यांचे शिफारस पत्र. 

सर्व  कागदपत्र  साक्षांकित प्रती कराव्यात व त्या सह अर्ज करावा . 

 अर्ज करण्यासाठी पत्ता :

बार्टी संस्था  पुणे .

या वरील पत्यावर रजिस्टर पोस्टाने पाठवा. 

योजनेच्या अटी-शर्ती, निकष व कार्यपद्धती, अर्जाचा नमुना या बाबतची माहिती बार्टीच्या संकेतस्थळ या वर मिळेल.

बार्टीचे संकेतस्थळ

 https://barti.in/notice-board.php  


Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad