11 वी सीईटी परीक्षा रद्द हायकोर्टाचा आदेश | 11 CET EXAM cancelled.
11 वी सीईटी परीक्षा रद्द हायकोर्टाचा आदेश | 11 CET EXAM cancelled.
कोरोनाची दुसरी लाट आली व त्यामुळे दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली व त्या नंतर अंतर्गत मूल्यमापन च्या आधारे त्यांना पास केले. विद्यार्थी पास झाले त्यांना आनंद पण झाला पण पुन्हा परीक्षा यामुळे त्यांना पुन्हा थोडे टेन्शन .परीक्षा कशी होणार अभ्यासक्रम पूर्ण येणार की 25 % कट होऊन त्या वर प्रश्न विचारले जाणार हे प्रश्न निर्माण झाले.
सर्व बोर्ड साठी एक प्रश्न पत्रिका असणार का असे अनेक प्रश्न निर्माण झाले त्यावर न्यायालयात खटला चालला व आज त्याचा निकाल लागला .
इयत्ता .११ वी प्रवेशांसाठी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता . या निर्णयाला हायकोर्टात आव्हान देण्यात आले होते. आज त्यावर मोठा निकाल देताना हायकोर्टाने राज्य सरकारला एक जोरदार धक्का दिला आहे.
अकरावीच्या प्रवेशांसाठी सीईटी परीक्षा न घेण्याचा निर्णय
इयत्ता दहावीच्या मूल्यांकनाच्या आधारे अकरावीला प्रवेश देण्याचे आदेश राज्य सरकार दिले आहेत.
इयत्ता अकरावीच्या प्रवेशाकरिता घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षेला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील निकाल उच्च न्यायालयाने मंगळवारपर्यंत ठेवला होता . त्याचा आज निकाल लागला आहे.
महाविद्यालयांच्या प्रवेशासाठी २१ ऑगस्ट रोजी घेण्यात येणारी सीईटी पूर्णपणे एसएससी बोर्डाच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे अशी सूचना २८ मे रोजी काढण्यात आली होती. आज निकाल देताना कोर्टाने ही सूचना रद्द केली आहे.पुढील सहा आठवड्यांत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे सक्तीचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
कोरोना काळात परीक्षा घेऊन मुलांचा जीव धोक्यात घालत आहोत.
या कारणामुळे न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागत आहे असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. यासाठी मागील आठवड्यापर्यंत १० लाख विद्यार्थ्यांनी सीईटीसाठी नोंदणी केली आहे.
सीईटीबाबतच्या या सूचनेला आयसीएसईची विद्यार्थिनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या याचिकेची सुनावणी न्या. आर. डी. धानुका व न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठापुढे झाली.
अश्या परिस्थितीत ही परीक्षा घेण्यात येत आहे, व गुणांच्या आधारे प्रवेश देण्याकरिता परीक्षा घेण्यात येणार आहे, सीईटी मे मध्ये जाहीर करण्यात आली तरी ही सीईटी एसएससी बोर्डाच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल, हे जुलैमध्ये जाहीर करण्यात आले, असे विद्यार्थी व त्याचे पालक यांनी सांगितले व आपले मत मांडले.
जर सीईटी रद्द ठरवण्यात आली तर काय होईल? असा प्रश्न न्यायालयाने मागील सुनावणीच्या वेळेस विचाराने होता.
विद्यार्थ्यांना ऑनलाइनद्वारे प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. न्यायालयाने गेल्या सुनावणीत सूचना केल्याप्रमाणे कोणतेही बोर्ड ssc बोर्डाला प्रश्नसंच देण्यास तयार नाही, असे देसाई यांनी न्यायालयाला सांगितले आहे.
अजून राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा धोका अधिक वाढला आहे. राज्य सरकार काय व्यवस्था करणार आहे?, असे न्यायालयाने म्हटले.
कोरोनाच्या नियमांचे पालन करूनच परीक्षा घेण्यात येतील. तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या निवास स्थान ज्या ठिकाणी अस अश्या ठिकाणी परीक्षा केंद्र असेल, अशी माहिती यांनी न्यायालयाला दिली.