आधार कार्ड आपल्या भाषेत बनवता येणार / Adhar card
प्रत्येक भारतीय व्यक्ती साठी आधार कार्ड हे गरजेचे आहे . तुमच्या प्रत्येक खाजगी व सरकारी कामा साठी आधार कार्ड आवश्यक असते.
आपल्या जवळ जे आधार कार्ड आहे त्या वर आपले नाव हे इंग्रजी मध्ये असते .
UIDAI ने प्रत्येक व्यक्तीला त्याच्या भाषेनुसार आधार कार्ड बनवता येईल याची सुविधा दिली आहे.
प्रत्येक आधार कार्ड धारक व्यक्ती मराठी आसाम, उर्दू, पंजाबी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, इंग्रजी, हिंदी, बंगाली, उडिया, गुजराती या भाषांमध्ये बदल करून घेऊ शकतो.
आधार कार्ड वरील भाषा बदलण्यासाठी काही रक्कम द्यावी लागेल.
भाषा बदलण्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.
भाषा बदलण्यासाठी किमान 15 दिवस जातील.
भाषा बदलण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा.
१) प्रथम वेबसाईटवर जावे.
२) चेक ऑनलाईन डेमोग्रापिकस स्टेटस वर क्लिक करावे.
(Check online demographics update status)
३) तुमचा स्वतःचा आधार कार्ड नंबर टाकावा.
४) कॅपच्या कोड टाकावा.
५) ओटीपी साठी तुमचा मोबाईल क्रमांक टाकणे जो आधार कार्ड ला जोडला आहे.
६) तुमच्या मोबाईल वर ओटीपी येईल तो विचारले ठिकाणी लिहून लॉग इन करणे. त्यानंतर
७) तुम्हाला ज्या भाषे मध्ये आधार कार्ड पाहिजे ती भाषा निवडा. जी माहिती विचारली जाईल ती भरा.
८) अर्ज सबमिट करण्यापूर्वी तो चेक करा व नंतर सबमिट करा.
९) पुन्हा एक ओटीपी येईल .त्या पूढे जे विचारले जाईल तसे करावे.