Type Here to Get Search Results !

विषय : मराठी. प्रथम घटक चाचणी इयत्ता १० वी | first unit test std 10

 

विषय : मराठी. प्रथम घटक चाचणी इयत्ता १० वी | first unit test marathi std 10  

प्रथम घटक चाचणी विषय मराठी पेपर खालील लिंक ओपन केल्या नंतर मिळेल.

:मराठी पेपर घटक चाचणी : 

पेपर लिंक ⬇️

https://us.docworkspace.com/d/sIP68w_oan7aSiQY




विषय : मराठी साप्ताहिक चाचणी ऑगस्ट / testAug
विषय : मराठी इयत्ता : १० वी 
कविता : दोन दिवस 
या कवितेवर आधारित ही टेस्ट आहे.या टेस्ट मध्ये किती मार्क मिळाले हे लगेच पाहता येईल.
ही कवितापरीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वा ची आहे. खाली कवितेचा भावार्थ ही दिला आहे टेस्ट देताना भावार्थ वाचून उत्तरे लिहा.

कवितेचा भावार्थ : माणसाचे जीवन अगदी अल्प आहे. जणू ते चारच दिवसांचे आहे. काही चांगले व काही वाईट दिन होते. अजून किती दिवस अश्या कडक उन्हात काम करावे लागेल याचे  मोज माप मी  सतत  करत असतो.शेकडो वेळा चंद्रासारखे चमचमते, शीतल प्रकाशाचे दिवस मी पाहिले, तारे फुललेले पाहिले, काही रात्री धुंद आनंदाच्याही पाहिल्या; पण बाकी सर्व आयुष्य 'भाकरीचा चंद्र' शोधण्यात म्हणजे भूक शमवण्यात, गरिबीत उदरनिर्वाह करण्यात बरबाद झाले.

या हातांनी मी कष्ट केले. माझे हात साथथ काम करतात व ते गरिबी कमी करण्यासाठी गहाण ठेवले आहेत. गरिबीमुळे, दैन्यामुळे माझे कर्तृत्व पिचून गेले.  माझे हात मी   आकाश सामावून घेण्यासाठी मनाने उभे केले आहेत.  पण दारिद्र्यामुळे माझे हात जायबंदी झाले. हाती काही लागले नाही. स्वप्ने मातीमोल झाली.

आयुष्यातील कष्ट सहन करताना डोळ्यांत अश्रू आले. दरवेळेला मी कोरडे केले नाहीत. पण खडतर आयुष्यात अशीही वेळ आली की या अश्रूंनीच मला साथ दिली. मित्रासारखे अश्रू माझ्या मदतीला धावून आले.

कष्ट करणारे लोक हे त्याचे जीवन खूप असाह्य वेदना व न झेलणारे दुःख सहन करत हसत मुखाने जगात असतात.  कारखान्यात घाम गाळत राहतात. कारखान्यातील झोतभट्टीच्या तापमानात त्यांना काम करावे लागते. काम करणारे लोक आहेत त्यांचे आयुष्य खूप कठीण परिस्थितुन जात असते ज्या प्रमाणे आगीत   लोखंड वितळत असते त्याप्रमाणेच तापदायक असते, असे कवींना सुचवायचे आहे. त्यांच्या जीवनातील दाहकता किंवा त्यांच्या जीवनात आग प्रलय किती हाहाकरी आहे  याची जाणीव झाली पाहिजे म्हणून अश्या कष्ट करणाऱ्या सर्व कामगारांना आगीत  शेकणाऱ्या लोखंडाची  उपमा दिली आहे. आगीत गरम  केल्याशिवाय लोखंडाला  हवा तसा आकार मिळणार नाही, अश्या आयुष्यातील मनाला न सहन होणारी वेदना सांगत आहे व त्याच्या पेक्षा दुसरे कोणी सांगू शकत नाही. असतो.

माणसाला मिळालेले आयुष्य खूप लहान या मध्ये जीवनाचे सत्य सांगत असताना हे दिवस कसे जाते हे कळत नाही.. 'चार दिवसाचेच आयुष्य' असे म्हटले जाते. कामगारांचे जीवन कष्टमय असते. त्यातच दारिद्र्यात ते पिचून जातात. म्हणून कवी म्हणतात • चार दिवसांच्या आयुष्यामध्ये अर्धे आयुष्य म्हणजे त्यातील दोन दिवस सुखाची वाट पाहण्यात गेले. नि अर्धे आयुष्य पोटापाण्याच्या विवंचनेत दुःखात गेले. आता हयात संपण्याच्या बेतात आली.

हा कविते चा भावार्थ आहे .या कवितेची उत्तरे ही या ब्लॉग वर आहेत हे पाहण्यासाठी तुम्ही याला पुन्हा भेट द्या. व दहावी च्या जास्तीत जास्त मुलांना पाठवा.

या कवितेतील प्रश्न उत्तरे आहेत 

कविता क्रमांक 5 दोन दिवस प्रश्न उत्तर  | Question- answer

कृती.

१) कृती पूर्ण करा.

अ) रोज ची भूक भागवणे याच्या साठी करावे लागणाऱ्या कष्टा मुळे जीवनाचे काही दिवस वाया गेले आहेत' याचा अर्थ सांगा.

उत्तर :  जी  भाकर आहे त्या मध्ये आम्ही  चंद्र मिळतो हे पाहण्यात जीवन घालवतो

आ) कवी चा प्रयत्न वाद व आशा वाद ची ओळख करून देणारी ओळ लिहा.

उत्तर :  दुःख  कसे सहन करावे. नव्याने जीवन जगावे. पाहिजे, या ठिकाणी शिकलो आहे.

प्रश्न. २) एका शब्दांत उत्तर लिहा.


(अ) कवीचे सर्वस्व असलेली गोष्ट .

उत्तर : हात


(आ) कवीचा जवळचा मित्र .

उत्तर : अश्रू


प्रश्न. ३) दिलेल्या  शब्दसमूहांचा अर्थ काय आहे तो  लिहा.

(अ) माना उंचावलेले हात 

उत्तर : कार्य करण्याचे कर्तृत्व .

(आ) कलम केलेले हात.

उत्तर : या हातांनी काम केले आहे ते कधी गहाण राहिले तर ते कधी उंच केले . परिस्थिती मुळे ते जाय बंद झाले.


(इ) दारिद्र्याकडे गहाण पडलेले हात : 

उत्तर : कष्ट करणारे हात हे त्यांची शक्ती आहे. ते या हाताने काम करतात . हे लोक रोज काम करत असतात त्यांना उद्याची काळजी असते. म्हणून असे म्हटले आहे.


प्रश्न.४.

१)'दुःखब कसे  पेलावे'व 'पुन्हा कसे जगावे' या चा अर्थ  तुम्ही लिहा.

उत्तर : कवी  यांनी 'दोन दिवस' या कवितेमध्ये कामगारांचे कष्टमय जीवन किती दुःख व व्यथांनी भरलेले असते याचे वास्तव व विदारक चित्र प्रत्ययकारी शब्दांत रेखाटले आहे.

कामगार व त्यांचा भावना या ठिकाणी मांडल्या आहेत.  दुःख झेलत असतानाही मी जगमय झालो. अनुभवाच्या शाळेत मी शिकलो. 

२)  जीवनसत्य, काय आहे याबाबत तुमचा  विचार काय आहे हे तुम्ही सांगा. 

उत्तर : या कवितेत कवी  यांनी कष्टकऱ्यांच्या वेदनामय जीवनाचे वास्तव चित्र दाहक शब्दांत स्पष्ट केले आहे.पोटात आग आहे ती विझवण्यासाठी पूर्ण जीवन जाते.. त्या दिवसांत फक्त अश्रूंची साथ लाभली.   जी  भाकर आहे त्या मध्ये आम्ही  चंद्र मिळतो हे पाहण्यात जीवन घालवतो

. दुनियेतील माणसांची दु:खे आपलीशी केली. झोतभट्टीत जिणे शेकवले. हात म्हणजे कर्तृत्व ! या हातांनी अतोनात कष्ट उपसले. कधी ते नाकर्ते झाले. कधी दारिद्र्याकडे गहाण पडले.

३) जे कष्ट करणारे आहते त्यांच्या विषयी तुम्ही तुमचे मत सांगा.

उत्तर :काम करणारे जे लोक आहेत त्यांचे जीवन हे चढ व उतार याने भरले आहे.सतत काम आणि काम त्यांना करावे लागते. जीवनात आनंद काय  काय आहे हे तर  त्याचंद्राला लांबून पाहण्या सारखे आहे. जी  भाकर आहे त्या मध्ये आम्ही  चंद्र मिळतो हे पाहण्यात जीवन घालवतो. खूप कष्ट उपसले. दैन्यदारिद्र्याकडे आयुष्य गहाण पडले. 

या वर आधारित ही ऑनलाईन चाचणी आहे.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad