पॅन कार्ड बनवणे झाले सोपे | pan card
पॅन कार्ड बनवणे झाले सोपे .
अत्यावश्यक कागदपत्रे यामध्ये तुमचे आधार कार्ड, रेशनकार्ड व पॅन कार्डचा यांचा समावेश आहे . तुमचे कोणतेही काम असू तुम्हाला आधार कार्ड, रेशनकार्ड व पॅन कार्ड या तीन पैकी दोन महत्वाची कागदपत्रेआधार कार्ड, व पॅन कार्ड बँक ,नोकरी व इतर आवश्यक कामासाठी ही कागदपत्रे खूप आवश्यक आहेत.या शिवाय तुमचे काम होणार नाही.
काही लोकांच्या जवळ पॅन कार्ड आहे.पण आज अशी ही काही माणसे, 18 वर्ष पुढील मुले आहेत की त्यांच्या जवळ पॅन कार्ड नाही अश्या व्यक्ती किंवा मुलांना घरी बसून पॅन कार्ड मिळवता येणार आहे.
या पद्धती मुळे लोकांचा वेळ वाचणार आहे व सहज रित्या ते स्वतः अर्ज करून ई पॅन तयार करू शकतात.
ई-पॅनसाठी अर्ज कसा करावा.
आपल्या मोबाईल वर किंवा लॅपटॉप वर पॅन कार्ड कसे बनवायचे ?
१) सर्व प्रथम तुम्ही आयकर विभाग च्या मुख्य वेबसाईटवर जायचे आहे.ही वेबसाईट खालील प्रमाणे आहे.
२) ही लिंक ओपन केली की या पेज च्या मुख्य पेज वर ई - पॅन साठी अर्ज हा पर्याय दिसेल.त्या वर क्लिक केले की नवीन पेज ओपन होईल.
३) नवीन ई-पॅन मिळवा येथे क्लिक करा.
४)या ठिकाणी तुम्हाला तुमची आधार कार्ड नंबर जन्मतारीख, मोबाईल क्रमांक आणि स्वतः चे नाव लिहा. भरलेली माहिती चेक करण्यासाठी तुमच्या मोबाईल वर ओटीपी (otp) येईल.
५) आलेला ओटीपी त्या ठिकाणी लिहिणे व सबमिट बटण वर क्लिक करायचे आहे.
ई-पॅन डाउनलोड कसे करावे.
१) वेबसाईटच्या मुख्य पेज वर जाणे . https://www.incometax.gov.in/iec/foportal/
२) ई-पॅनशी संबंधित टॅब आहे त्या वर क्लिक करा
३) तुम्हाला नवीन पेज ओपन झालेले दिसेल त्या मध्ये
‘तुमच्या पॅन ची स्तिथी ( status) काय आहे या वर क्लिक करा.
४)आधार क्रमांक लिहा. तुमच्या . मोबाईल क्रमांकावर मिळालेल्या ओटीपीने विचारले ल्या जागी type करा.
५)त्याची तपासणी केल्यानंतर तुम्ही तुमच्या पॅनची स्थिती सहज तपासू शकाल.
आपल्या पॅन कार्ड ची पडताळणी कशी करणार ?
१) सर्व प्रथम तुम्ही आयकर विभाग च्या मुख्य वेबसाईटवर जायचे आहे.ही वेबसाईट खालील प्रमाणे आहे.
२)ही लिंक ओपन केली तुम्हाला पेज वर व्हेरिफाई युवर पॅन’ हा पर्याय तुम्हाला दिसेल. या वर क्लिक करा.
3) तुम्हाला तुमचा पॅनचा तपशील विचारला जाणार आहे. यामध्ये तुमची जन्मतारीख, मोबाईल क्रमांक आणि स्वतः चे नाव भरावयाचे आहे. व नंतर तपासणी प्रक्रिया पूर्ण होणार आहे.