राखी पौर्णिमा, रक्षा बंधन | Rakhsha Bandhan
निबंध : राखी पौर्णिमा , रक्षा बंधन
" या रक्षा बंधन ला आपल्याला नव चैतन्य देऊ दे ,
तुला सर्व सुख ,आनंद , यश मिळू दे ,
तुझी सर्व स्वप्नं पूर्ण होऊ दे "
आपले हे नाते असच जन्मोजन्मी राहू दे "
भारतीय संस्कृती मध्ये जे प्रमुख सण त्या सणामध्ये ‘रक्षा बंधन’ हा सण आहे. ताई - दादा यांच्यातील प्रेम द्विगुणीत करणारा हा सण आहे. भारता मध्ये या सणाला वेगवेगळ्या ठिकाणी वेग वेगळ्या नावाने ओळख जात आहे. उत्तर भारतामध्ये या सणाला ‘कजरी-पौर्णिमा’,असे म्हणतात तर पश्चिम भारतामध्ये ‘नारळी पौर्णिमा’ या नावाने हा सण ओळखला जातो व अति उत्साहा ने साजरा केला जातो. या वर्षी रक्षाबंधन दिनांक : २२ ऑगस्ट २०२१ रोजीआहे ., श्रावण महिन्यातीला पौर्णिमेला रक्षा बंधन साजरा करणे ही परंपरा पूर्वी पासून आहे.
रक्षा बंधन हा सण ताई दादा ,भाऊ - बहिण यांच्या मधील प्रेम ,माया आपुलकी ,जवळीक जपणारा व सांगणारा सण आहे . श्रावणातील सरी जश्या सतत पडत असतात व मनाला आनंद देऊन जातात त्या प्रमाणे ताई , दीदी , ज्या वेळेस आपल्या मनगटावर राखी बांधतात तेव्हा आपले मन एकदम भरून येत असते. ते नवचैतन्य एक ऊर्जा आपल्याला देऊन जाते.
रक्षा बंधन हा सण ताई दादा ,भाऊ - बहिण यांच्या मधील असणारे नाते किती अतूट व पवित्र आहे याची जाणीव करून देणारा हा सण आहे.
हा सण भारत भर साजरा केला जातो आनंद, अतिउत्साही पणे प्रत्येक जण या दिवसाची आतुरतेने वाट पाहात असतो. तो दिवस आपल्याला एक वर्ष साठी एवढे प्रेम व माया देऊन जातो की ते आपण शब्दात वर्णन करू शकत नाही.
रक्षा बंधनाचे महत्त्व काय आहे ?
आपण अनेक वेळा पाहतो असतो की , प्रत्येकाच्या घरात एक बहीण मोठी किंवा लहान असते, ती आपल्या भावाचे सतत रक्षण करण्याचा प्रयत्न करते मंग ते अभ्यास मध्ये असू की दुसरे कशात पण ती त्याला नकळत मदत करत असते.एकादी महिला बहिण कितीही कमावणारी किंवा किती मोठी असली तरीही तिचा तिच्या भावावर असणारा विश्वास व प्रेम तिने बांधलेल्या रखीतून दिसून येत असतो. भावा बहिणीचे , ताई दादा चे नाते हे कधी कधी भांडणाचे,एकमेकांच्या खोडीचे तरीही तितक्याच प्रेमाचे व जिव्हाल्याचे असते. हाताच्या मंगटावर बांधलेला धागा हा त्या दोघांमधील प्रेमाचे प्रतिक आहे.
" रेशमी धाग्यात रंग आहे प्रेमाचा , भावनेचा ,
आपुलकीचा , व जिव्हाळ्याचा,
ताई ,दादा तुम्ही यशाचे उंच शिखर गाठत रहा "
हीच प्रार्थना.
: राखी पौर्णिमा किंवा रक्षा बंधन इतिहास :
इतिहास मध्ये काही नोंद नाही पण काही कथा आहेत ज्या मध्ये राखी पोर्णिमे विषयी माहिती सांगितली आहे. देवांचे राजे इंद्र यांनी शत्रू चा ( दानव )पराभव केला ते लढाई ला जाताना त्यांच्या पत्नी ने मनगटावर रक्षा धागा (सूत्र ) बांधले होते त्यामुळे ते विजयी झाले.
चित्तौढगड ची महाराणी कर्मावतीने यांनी बहादुरशाह यांच्या पासून आपल्या स्वत:ची रक्षण करता यावे म्हणून मुघल हुमायू यांना राखी बांधली आहे . त्यांनी महाराणी यांच्या रक्षणासाठी जीवाचे रान केले होते .असे अजून उदा आहेत.
: राखी बंधन करताना काय म्हणावे:
आपल्या भाऊ रायच्या मनगटावर राखी बांधताना
हे म्हणावे " येन बद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबलः। तेन त्वामनुबध्नामि रक्षे मा चल मा चल " । (दानवांचे जे राजा बली होते यांच्या हातात दैत्यगुरू शुक्राचार्य यांनी जशी रक्षाराखी बांधली होती तसी मी ही तुझ्या मनगटावर या दिवशी राखी बांधत आहे.)
राखी बंधन साठी शुभ वेळ : सकाळी : 6 वाजून 15 मिनिटे ते सायं: 5 वाजून 31 मिनिटे पर्यंत आहे.
: एक ताई ,आई ,बहिण व बायको म्हणून :
" हा सण साजरा करताना आपल्या ला आई पाहिजे , बहिण पाहिजे , बायको पाहिजे " कारण ती आई ,बायको ही कोणाची ना कोणाची मुलगी किंवा बहिण आहे हे आपण जाणतो .हे प्रेमळ नाते आपल्या ला मिळते ते एका " मुलीकडून " मंग प्रश्न असा निर्माण होतो की " आई ,ताई , दीदी , मैत्रीण , बायको " ही एक मुलगीच आहे मंग तिची हत्या गर्भाशयेत का केली जाते ?
याचा विचार ही आपण केला पाहिजे.
या रक्षा बंधन दिवशी प्रत्येकाने एक संकल्प करू की " स्त्री भ्रूण " हत्या थांबली पाहिजे.