अनाथ मुलांना नोकरी व शिक्षण यामध्ये आरक्षण | Reservation 1 %
राज्यामध्ये कोरोना महामारी प्रादुर्भावामुळे ज्या मुलांनी पालक गमावलेले आहेत अश्या सर्व मुलांसाठी व बालकांसाठी सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांना नोकरी आणि शिक्षणात १ टक्के आरक्षण दिलं जाणार असल्याची घोषणा आज राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ठाकूर यांनी केली आहे.
. आज झालेल्याबैठकीत काही अति महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये राज्यातील अनाथ मुले आणि एकल महिलांसाठी महत्वपूर्ण निर्णयांची घोषणा केली आली आहे.
कोरोना महामारी मुळे ज्या पालकांचा मृत्यू झाल्यानं जे अनाथ झालेली बालक व मुले आहेत त्यांची जबाबदारी राज्य सरकारने घेतली होती.
त्यानंतरअश्या अनाथ बालक व मुलांच्या भविष्याच्या दृष्टीने त्यांना नोकरीत आणि शिक्षणात १ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.
अनाथ मुलांचे तीन वर्ग तयार केले आहेत.
' अ ' या मध्ये ज्या मुलांचे आई-वडील, भाऊ-बहीण, जवळचे नातेवाईक, गाव, तालुका, पत्ता याबाबत काहीही माहिती उपलब्ध नाही अशा : अनाथ असलेल्या मुलांनाचा या मध्ये समावेश असेल.
' ब ' या मध्ये ज्या मुलाचे आई-वडील मयत झाले आहेत तसेच ज्यांच्या कागदपत्रावर जातीचा उल्लेख करण्यात आलेला नाही किंवा उल्लेख असला तरी तांत्रिक कारणामुळे जात प्रमाणपत्र काढणे किंवा जात वैधता पडताळणी करणे शक्य झाले नसेल. अश्या बालकांचे किंवा मुलांचे पालनपोषण बालकांसाठी कार्यरत संस्थेत किंवा अनाथालयात झाले असेल अशा बालकांचा व मुलांचा समावेश या मध्ये असेल.
' क ' या मध्ये अशी मुले ज्यांची वयाची 18 वर्ष वय होण्यापूर्वी आई-वडील मयत आहेत परंतु, त्या मुलाचे इतर नातेवाईक विशेषत: वडीलांकडचे हयात असून नातेवाईकाकडे बालकाचे संगोपन झालेले आहे व त्यांची जात कोणती या बाबत माहिती असणे गरजेचे आहे, अश मुलांचा समावेश यामध्ये असेल.
' अ ' आणि ' ब ' प्रवर्गातील बालकांना नोकरी, शिक्षणामध्ये आरक्षण आणि शिक्षणांतर्गत शिष्यवृत्ती, शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती यामध्ये सवलत लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या मुलांना सवलत लागू करताना जी खाली पदे आहेत त्या ऐवजी जी एकूण पदे आहेत यावर सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचे प्रमाण एकूण जो संवर्ग असेल त्या संख्येच्या १ टक्क्यापेक्षा अधिक राहणार नाही.
' क ' या मध्ये मुलांना व बालकांना नोकरीम व शिक्षण सवलत लागू असणार नसून शिक्षणात सवलत तसेच शिक्षणांतर्गत शिष्यवृत्ती, शैक्षणिक शुल्क साठू सवलती लागू असणार आहेत.
वरील जे तीनही प्र वर्गातील अनाथ मुलांना अनुसूचित जाती प्रमाणे वय, शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क सवलत देण्यात येणार आहे . तसेच अश्या मुलांना देण्यात येणाऱ्या अनाथ प्रमाणपत्राच्या नमुन्यात सुधारणा तसेच प्रमाणपत्र वितरणाच्या प्रक्रियेत सहज पणा आणण्यात येणार असून त्यामुळे अनाथांना होणारा प्रक्रियेतील त्रास मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे, असेही मंत्री यावेळी म्हणाल्या आहेत.