दोन दिवस कविता भावार्थ /Two day
इयत्ता : १० वी विभाग 2 मधील पहिली कविता
कविता : 5. दोन दिवस ( पाठ्य पुस्तक क्रमांक : १७)
शेकडो वेळा चंद्रासारखे चमचमते, शीतल प्रकाशाचे दिवस मी पाहिले, तारे फुललेले पाहिले, काही रात्री धुंद आनंदाच्याही पाहिल्या; पण बाकी सर्व आयुष्य 'भाकरीचा चंद्र' शोधण्यात म्हणजे भूक शमवण्यात, गरिबीत उदरनिर्वाह करण्यात बरबाद झाले.
या हातांनी मी कष्ट केले. माझे हात साथथ काम करतात व ते गरिबी कमी करण्यासाठी गहाण ठेवले आहेत. गरिबीमुळे, दैन्यामुळे माझे कर्तृत्व पिचून गेले. माझे हात मी आकाश सामावून घेण्यासाठी मनाने उभे केले आहेत. पण दारिद्र्यामुळे माझे हात जायबंदी झाले. हाती काही लागले नाही. स्वप्ने मातीमोल झाली.आयुष्यातील कष्ट सहन करताना डोळ्यांत अश्रू आले. दरवेळेला मी कोरडे केले नाहीत. पण खडतर आयुष्यात अशीही वेळ आली की या अश्रूंनीच मला साथ दिली. मित्रासारखे अश्रू माझ्या मदतीला धावून आले.
मी कधीही एकलकोंड्यासारखा फक्त स्वत:चाच विचार केला नाही. मी कधी स्वार्थी झालो नाही. मी या जगाचा, समाजातील माणसांचा विचार केला. त्याची सुखदुःखे आपली मानली. मी जगचा झालो आहे . दुःख कसे पेलावे कसे मापन करायचे , कसा सामना करायचा हे ही मी येथे शिकलो आहे.
कारखाना झोत जसे पोलाद शेकते, तसे मी माझे आयुष्य शेकवून घेतले. बऱ्यावाईट प्रसंगाच्या आगीतून मी निघालो.
प्रत्येक कामगारांचे काही दिवस हे आनंद देणारे व काही दुःख देणारे असतात. पण त्या काळात ते ही सतत मेहनत करत असतात.
कष्ट करणारे लोक हे त्याचे जीवन खूप असाह्य वेदना व न झेलणारे दुःख सहन करत हसत मुखाने जगात असतात. कारखान्यात घाम गाळत राहतात. कारखान्यातील झोतभट्टीच्या तापमानात त्यांना काम करावे लागते. काम करणारे लोक आहेत त्यांचे आयुष्य खूप कठीण परिस्थितुन जात असते ज्या प्रमाणे आगीत लोखंड वितळत असते त्याप्रमाणेच तापदायक असते, असे कवींना सुचवायचे आहे. त्यांच्या जीवनातील दाहकता किंवा त्यांच्या जीवनात आग प्रलय किती हाहाकरी आहे याची जाणीव झाली पाहिजे म्हणून अश्या कष्ट करणाऱ्या सर्व कामगारांना आगीत शेकणाऱ्या लोखंडाची उपमा दिली आहे. आगीत गरम केल्याशिवाय लोखंडाला हवा तसा आकार मिळणार नाही, अश्या आयुष्यातील मनाला न सहन होणारी वेदना सांगत आहे व त्याच्या पेक्षा दुसरे कोणी सांगू शकत नाही. असतो.
माणसाला मिळालेले आयुष्य खूप लहान या मध्ये जीवनाचे सत्य सांगत असताना हे दिवस कसे जाते हे कळत नाही.. 'चार दिवसाचेच आयुष्य' असे म्हटले जाते. कामगारांचे जीवन कष्टमय असते. त्यातच दारिद्र्यात ते पिचून जातात. म्हणून कवी म्हणतात • चार दिवसांच्या आयुष्यामध्ये अर्धे आयुष्य म्हणजे त्यातील दोन दिवस सुखाची वाट पाहण्यात गेले. नि अर्धे आयुष्य पोटापाण्याच्या विवंचनेत दुःखात गेले. आता हयात संपण्याच्या बेतात आली.
Asjad khan
ReplyDelete