लालबहादूर शास्त्री जयंती Lalbahadur Shastri Jayanti | निबंध भाषण माहिती|
लालबहादूर शास्त्री
लालबहादूर शास्त्री यांचा परिचय
लालबहादूर शास्त्री | परिचय |
---|---|
पूर्ण नाव | लालबहादूर शारदाप्रसाद श्रीवास्तव |
आईचे नाव | रामदुलरिदेवी |
वडिलांचे नाव | शारदाप्रसाद |
जन्म स्थान | बनारस मोगलसराई |
लालबहादूर शास्त्री यांचे बालपण
यांचा जन्म बनारसजवळील मोगलसराई या रेल्वे वसाहतीत शारदाप्रसाद व रामदुलरिदेवी या दांपत्याच्या पोटी सामान्य कायस्थ कुटुंबात झाला. वडील शारदाप्रसाद सुरूवातीस प्राथमिक शिक्षक होते; पुढे ते शासकीय लिपिक झाले. आई पारंपरिक धार्मिक वृत्तीच्या होत्या. लालबहादूर दीड वर्षाचे असताना वडील वारले. तेव्हा हे कुटुंब बनारसजवळ रामनगरला स्थायिक झाले.
हरिश्चंद्र हायस्कूलमध्ये ते मॅट्रिकला असताना म. गांधींनी असहकाराची चळवळ सुरू केली (१९२१). शास्त्रींनी शाळा सोडली व म. गांधींच्या विचारसरणीकडे ते आकृष्ट झाले
शिक्षण सामाजिक कार्य व विवाह
काशी विद्यापीठातून तत्त्वज्ञान या विषयात पहिल्या वर्गात शास्त्री ही पदवी मिळविली (१९२५).
विद्यार्थिदशेत डॉ. भगवानदास, गोपालशास्त्री या अध्यापकांचा आणि नंतर पुरुषोत्तमदास टंडन व लाला लजपत राय यांच्या त्यांच्यावर प्रभाव पडला. लाला लजपत राय यांनी स्थापिलेल्या ‘सर्व्हंट्स ऑफ द पीपल’ या संस्थेचे ते १९२५-२६ मध्ये आजीव सेवक झाले आणि अलाहाबादेत त्यांनी कायमचे वास्तव्य केले.
मिर्झापूर येथील ललितादेवींशी त्यांचा १९२७ मध्ये विवाह झाला. त्यांना चार मुलगे व दोन मुली झाल्या. त्यांचे दोन मुलगे पुढे सक्रिय राजकारणात आले. पत्नी ललितादेवी धार्मिक वृत्तीच्या असून उपासना व पतीची सेवा यात मग्न असत. काही दिवस मुझफरपूर येथे त्यांनी हरिजनोद्वाराचे कार्य केले. अलाहाबादला नेहरूंचे मार्गदर्शन व सहवास त्यांना लाभला.
राजकीय वाटचाल
उत्तर प्रदेश विधान सभेवर ते काँग्रेसतर्फे १९४६ मध्ये निवडून आले. गोविंद पंतांच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे गृह आणि दळणवळण खाते देण्यात आले. पंडित नेहरूंनी त्यांना अ. भा. काँग्रेसचे महासचिव केले(१९५०). भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत (१९५२) त्यांनी काँग्रेस उमेदवारांच्या निवडीचे कठीण काम केले. त्यांची समन्वयवादी वृत्ती व संघटनकौशल्य लक्षात घेऊन पंडित नेहरूंनी त्यांना राज्यसभेचे सभासद करून केंद्रीय मंत्रिमंडळात रेल्वे आणि वाहतूक खात्याचे मंत्री केले. त्यांनी तिसऱ्या वर्गाच्या उतारूंसाठी अनेक सुखसोयी उपलब्ध करून देऊन गंगा नदीवर मोठा पूल बांधला (१९५५). प. बंगालमध्ये चित्तरंजन कारखान्याची उभारणी केली. यावेळी केरळमध्ये घडलेल्या अरियालूरच्या भीषण रेल्वे अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी रेल्वे मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि आदर्श घालून दिला (१९५६).
१९५७ मध्ये पून्हा लोकसभेवर निवडून आले. ते पुन्हा केंद्रीय मंत्रिमंडळात आले.
१९५७ ते १९६४ दरम्यान त्यांनी संचार व परिवहन, उद्योग व व्यापार, गृह इ. खाती समर्थपणे सांभाळली होती.विशेषतः गृहमंत्रिपदाच्या काळात पंजाबी सुभ्याची चळवळ, दक्षिणेतील हिंदी विरोधी चळवळ, जम्मू-काश्मीरमधील धार्मिक तणाव यांसारख्या समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागले.
पुस्तके -
लालबहादूर शास्त्री यांच्या वर लिहिली पुस्तके
१) गोष्टीरूपी लालबाहादुर .
२) शांतीदूत लालबहाद्दूर शास्त्री .