Type Here to Get Search Results !

इयत्ता१० वी कविता हिरवंगार झाडासारखं | Maharshtra state Board | poem Hirvagar Zadasarkhe Second Language standard 10

इयत्ता१० वी कविता हिरवंगार झाडासारखं | Maharshtra state Board  | Hirvagar Zadasarkhe  Second Language Standard 10 

विषय - मराठी

इयत्ता - १० वी.



कविता - हिरवंगार झाडासारखं (toc)

कवितेचा आशय  थोडक्यात -

झाडाची( वनस्पती ची)  सहनशीलता, परोपकार वृत्ती, दातृत्व व संकटात उभे राहण्याचा ठामपणा यांचे समर्पकपणे वर्णन या कवितेमध्ये केले आहे. माणसांचे जीवन झाडासारखे हिरवेगार व प्रसन्न असावे, असा संदेश या कविमधून मिळत आहे. 

कविता

कवितेतील कठीण शब्द

ध्यानस्थ - डोळे मिटून एकाग्र चित्त करून बसणे.
ऋषी - साधू
मौनव्रत - न बोलणे
तपश्चर्या - ठराविक वेळ ध्यानस्थ बसणे.
मुकाट - न बोलता.
अलगद - हळूच.
दव - दहि वरचे थेंब.
टपोरे - गोल.
विरघळतो - मिसळून जाणे.
खुडणे - फूल देटापासून तोडणे.
टवटवीत - ताजेतवाने.
कवेत - मिठीत.
पानझड - पानगळ.
वस्त्र - कपडे.

कवितेचा भावार्थ

जीवन कसे जगावे हे हे सांगत असताना कवीने झाडाचे उदाहरण दिलेले आहे एकदा ऋषीमुनी ज्याप्रमाणे मौन व्रत घेऊन ध्यानस्थ बसतात त्याच प्रमाणे झाडही न बोलता ध्यानस्थ बसते .
वेगवेगळे पक्षी झाडावर विसावा घेण्यासाठी येत असतात काही वेळ थांबतात व नंतर निघून जातात पक्षी व झाड हे  एकमेकाचे मित्र नसतात पण तरीही झाड पशुपक्ष्यांना आसरा देण्यासाठी सदैव उभे असते.
झाडावर कोणी कुराडीचा घाव घातला तरी ते काही बोलत नाही ही म्हणजे झाड हे सहनशील आहे.
सकाळी सकाळी झाडांच्या पानावर असलेले दवांचे थेंब आपण अलगद उचलण्याचा प्रयत्न करत असतो .
हिरवेगार झाड आपण पाहिले हे आपले मन शांत होते.
झाड हे वन वन फिरणाऱ्या लोकांना व पशूंना आश्रय देत असते झाडांची पाने गळती झाल्यानंतर त्या झाडाला पुन्हा पाने येतात तेव्हा ते झाड एखाद्या नवीन वधू सारखे दिसत असते पालवी फुटलेला झाडाला पाहिलं की आपल्या मनामध्ये ऊर्जा उत्साह संचारतो.
कवी म्हणतात झाडाप्रमाणे मनुष्य नाही सतत हसत रहावे व आयुष्यात थांब निर्धाराने उभे राहावे व संकटाचा सामना करावा.

कवितेखालील प्रश्नउत्तरे (कृती)

प्रश्न. चौकटी पूर्ण करा.
१) कवीने झाडाला दिलेली उपमा 
उत्तर - ध्यानस्थ ऋषी.
२) पानझडी नंतरचे , नवी वस्त्रे धारण करणारे झाड म्हणजे  उत्तर - नवीन नवरी .
३) कवीच्या मते उत्साही आयुष्य म्हणजे
उत्तर -  टवटवीत फुले .
४)अलगद उतरणारे थेंब .
उत्तर - दवाचे टपोरे थेंब .
५)फुटते शरीरभर पालवी याचा अर्थ
उत्तर -  मरगळ झटकली जाणे.

२) आकृती पूर्ण करा.
१) झाडाकडे टक लावून पाहिल्यानंतर घडणाऱ्या  गोष्टी.
उत्तर : शरीरभर हिरवा रंग विरघळतो .
        रक्त क्षणभर हिरवेगार होते .
        नुकत्याच खुडलेल्या फुलासारखे आयुष्य टवटवीत होते.

३) एका वाक्यात उत्तरे लिहा.
अ) झाडाच्या जीवनाचं गाणं कशात दडलेले असतं .
उत्तर : झाडाच्या जीवनाचं गाणं पक्षांच्या मंजुळ नादात दडलेलं असतं.
आ) झाडाच्या मुळावर घाव घातल्यावर त्याची प्रतिक्रिया काय असते ? 
उत्तर : झाडाच्या मुळावर घाव घातले तरी झाड ते मुकाट्याने सहन करते.

SSC परीक्षेत विचारला जाणार प्रश्न - गुण -८

प्रश्न.पुढील कवितेसंबंधी त्याखाली दिलेल्या मुद्यांच्या आधारे कृती सोडवा.
 हिरवंगार झाडासारखं.

(१) प्रस्तुत कवितेचे कवी - जॉर्ज लोपीस,

(२) प्रस्तुत कवितेचा विषय - माणसाने आपले आयुष्य झाडासारखे जगावे, हे सूत्र या कवितेतून मांडले आहे.
 (३) प्रस्तुत कवितेतील ओळींचा सरळ अर्थ

'झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर

अलगद उतरतात दवांचे टपोरे थेंब.'

→ माणसाने झाडासारखे प्रसन्न व हिरवेगार असावे असे सांगताना कवी म्हणतात, पहाटे पहाटे झाडाच्या पानावरून वहीच्या पानावर उतरलेले दवाचे थेंब कवीला जाणवतात व त्याला कविता सुचते हा भावार्थ सूचित होतो.

(४) प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश - कवी जॉर्ज लोपीस यांची मुक्तछंदात लिहिलेली ही कविता आहे. झाडाचे महत्त्व, झाडाची सहनशीलता, परोपकारी वृत्ती, संकटात ठाम उभे राहण्याची जिद्द .ही शिकवण या कवितेतून मिळते.

५)कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे → 'झाड' हा निसर्गाचा एक घटक आहे. झाडाची परोपकारी वृत्ती, अविचल वृत्ती, दानशूरता, आनंदी वृत्ती हे गुण मानवाने आत्मसात करावेत. असे सांगितले आहे म्हणून ही कविता आवडते.
६) प्रस्तुत कवितेतील दिलेल्या शब्दांचे अर्थ लिहिणे-
    व्रत - वसा पक्षी - पाखरू पान - पर्ण.

सराव पेपर 








उपयोजित लेखन 

विषय मराठी - उपयोजित लेखन गुण- 24
उपयोजित लेखन साठी खालील लिंक ओपन करा . व like, share, subscribed and press bell button

https://youtu.be/6FkOD07nd4g



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad