Type Here to Get Search Results !

रंग मजेचे रंग उद्याचे इयत्ता :१० वी | Rang Majeche Rang Udhyache std 10

 रंग मजेचे रंग उद्याचे इयत्ता :१० वी | Rang Majeche Rang Udhyache std 10

विषय : मराठी
इयत्ता :१० वी
कविता - रंग मजेचे रंग उद्याचे - अंजली कुलकर्णी

कविता - रंग मजेचे रंग उद्याचे (toc)

कवितेची प्रस्तावना 

आजच्या काळातील संगणकाच्या युगात माणसाने मातीचा संबंध जिव्हाळ्याने जपायला हवा व त्यासाठी जनजागृती केली पाहिजे. पर्यावरणाची काळजी घेतली तर माणूस समृद्ध व समाधानी  होईल. निसर्गाच्या मनोहारी सौंदर्याविष्कारात आयुष्यातील खूप आनंद , उत्साह साठला आहे, असा मानवतावादी दृष्टिकोन व्यक्त करणारा या कवितेचा आशय आहे.

कविता 

कवितेतील कठीण शब्द

दाद - गर्द . 
ताटवे - गुच्छ.
 दृष्टी - नजर . 
सृष्टी - जग
उधळू - विखरून टाकू . 
रुजतील - उगवतील .
फेन धवल - फेसासारख्या सफेद ,पांढरा शुभ्र .
छत्र - सावली . 
गर्भरेशमी - सुखद ( रेश्माच्या गाभ्यासारखा).
अनोखी - वेगळी .
तुषार - थेंबाचा शिडकावा.
कष्टी - नाराज .
तयांस - त्यांना.

कवितेचा भावार्थ 

निसर्गामध्ये जिकडे (जिते) आपली नजर जाईल तिथपर्यंत वेगवेगळ्या  फळ ,फुलांचे दाट ताटवे  आपल्या सर्वांना पाहण्यासाठी मिळतील हे निसर्ग ची जादू आहे. हे मजेदार मनाला तृप्त करणारे रंग हे उदयाचे भवितव्य, या हिरव्या निसर्गाला आपण मायेने जपले पाहिजे व काळजी घेतली घेणे आपले कर्तव्य आहे.
संगणक युग जरी आले तरी संगणक आपल्याला खाण्यासाठी अन्न - धान्य देत नाही. आपली जी 'काळी आई' म्हणजे धनधान्य देणारी शेते आपण स्वतः हून जगवणे गरजेचे आहे. जे मातीमध्ये काबाडकष्ट खूप परिश्रम मेहनत  करून धान्य पिकवतात त्या हातांना शेतकऱ्यांना आपण पाठबळ देणे , त्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहूया व त्यांना सहकार्य करूया.
डोंगराडोंगरावर बिया उधळून टाकूया  त्यातून हिरवी देशी झाडे तयार होतील. पेरलेल्या बियांमधून गर्द झाडी वनराई  निर्माण होईल. सारी राने हिरवीगार दिसतील व  आभाळातून पावसाचा खूप वर्षाव होईल व बळीराजा सुखी होईल.
डोंगरामधू झरे धबधबे वाहतात  त्यातून खळखळणारे वाहणारे पाणी व त्यातून पांढऱ्याशुभ्र तुषारांचे हे संजीवन बघून कोणीही दुःखी होणार नाही व सर्व निसर्ग व प्राणी आंनदीत होतील.

कृति स्वाध्याय व उत्तरे

प्रश्न. १. कवितेच्या आधारे पाऊस पडण्याच्या चक्राचा ओघ तक्ता तयार करा.
उत्तर : डोंगरावर बिया उधळणे.
           देशी झाडे उगवून येणे.
           रान गच्च माजणे.
          आभाळातून पाऊस पडणे.
 २. आकृती पूर्ण करा.
काळी आई जगवण्यासाठी अपेक्षित कार्य 
उत्तर : राबणाऱ्या हातांना पाठबळ.
       देणे डोंगरावर बिया उधळणे.
       देशी झाडे रुजवणे.
प्रश्न.२.चौकटी पूर्ण करा.
अ) जेथे दृष्टी पोहोचते असे ठिकाण - फुलाफुलांची दाट ताटवे.
आ) कवित्री च्या मते जपायची गोष्ट - सृष्टी.
प्रश्न. ३.कवितेतील आलेल्या खालील संकल्पना स्पष्ट करा.
अ) आभाळाचे छत्र 
उत्तर - आभाळाची माया आभाळाचा आधार माणसांना मिळणे आभाळातून पाऊस पडतो या सर्व नैसर्गिक कार्यामुळे अन्नधान्य पिकते व त्यामुळे सर्व जनजाती किंवा मनुष्य जगतो म्हणून याला आभाळाचे छत्र किंवा सावली म्हटले जाते.
आ) गर्भरेशमी सळसळ
उत्तर - जेव्हा पाउस पडून धरती हिरवीगार होते त्या वेळेस माणसाच्या मनात समृद्धीचे पालवी फुटते मनातल्या नाजूक कोमल व आनंदी पाहुण्यांच्या आंदोलनाला गर्भरेशमी सळसळ म्हटले जाते.

Ssc परीक्षेत येणारा महत्वपूर्ण प्रश्न गुण ८

प्रश्न.पुढील कवितेसंबंधी त्याखाली दिलेल्या मुद्यांचा आधारे कृती सोडवा. रंग मजेचे रंग उद्याचे.

१) प्रस्तुत कवितेची कवयित्री - अंजली कुलकर्णी.

(२) प्रस्तुत कवितेचा विषय - 'रंग मजेचे, रंग उदयाचे' या कवितेतून कवयित्रींनी संगणक युगातही निसर्गाची दौलत जोपासायला हवी, हे हृदय शब्दांत सांगितले आहे.

(३) प्रस्तुत कवितेतील ओळींचा सरळ अर्थ

“हिरवी हिरवी मने भोवती, किती छटा हिरव्याच्या गर्भरेशमी सळसळण्याच्या जगास सांगू गोष्टी...' 
अर्थ - अवतीभवती सृष्टीमध्ये फुललेल्या हिरव्या रंगाच्या विविध

छटा पाहून आपली सर्वांची मनेही हिरवीगार प्रसन्न व्हावीत. रेशमी मखमली गाभ्यासारखा निर्मळ आनंद प्रत्येकाच्या मनात सळसळेल व या समृद्धीच्या कहाण्या आपण अभिमानाने सर्व जगाला सांगूया. 

(४) प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश -  'रंग मजेचे, रंग उदयाचे' या कवितेमध्ये कवयित्री अंजली कुलकर्णी यांनी यंत्रयुगातही पर्यावरण सुंदर ठेवावे, म्हणजे मानवी मनेही समृद्ध होतात हा संदेश दिला आहे. मानवाने पर्यावरणाची जोपासना केली पाहिजे. निसर्गाशी रममाण होऊन जगण्यातच खरा आनंद आहे, हा मौलिक संदेश ही कविता देते.

(५) कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे  - यंत्राच्या संगणकाच्या युगामध्ये निसर्गप्रेमाचा महिमा सांगणारी
ही कविता मला खूप आवडली.

(६) प्रस्तुत कवितेतील दिलेल्या शब्दांचे अर्थ लिहिणे-
 
१) पुष्टी-दुजोरा  २) हात - हस्त  ३) वृष्टी-वर्षाव.४) झाड - वृक्ष.





Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad