संत ज्ञानेश्वर महाराज जयंती माहिती निबंध लेखन| Sant Dnyaneshwar Maharaj | निबंध लेखन Niband likhan
संत ज्ञानेश्वर महाराज निबंध व अभंग(toc)
तोषोनि मज द्यावे ! पसायदान हे !!
जे खळांची व्यंकटी सांडो ! तया सत्कर्मी रति वाढो !!
भूतां परस्परें जडों ! मैत्र जीवाचे !!
संत ज्ञानेश्वर महाराज हे आपल्या महाराष्ट्रास लाभलेले अनमोल रत्न. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात व व परमार्थ क्षेत्रातील न भूतो न भविष्यती असे लौकिक व्यक्तिमत्व म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज होय.
संत ज्ञानेश्वर महाराज यांचे जीवन चरित्र
संत ज्ञानेश्वर हे महाराष्ट्रातील महान संतांपैकी एक होते. संत ज्ञानेश्वर महाराज महाराष्ट्रातील एक थोर योगी, तत्त्वज्ञानी आणि संतकवी होते. ते भागवत तथा वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञ प्रवर्तक. अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणारा ज्ञानमार्ग त्यांनी सर्वसामान्यांना दाखवला.
त्यांनी योगसामर्थ्याने आपले प्रभुत्व सिद्ध केले होते. आध्यात्मिक समतेवर आधारलेल्या वारकरी संप्रदायाची सुरुवात त्यांनी केली. वारकरी संप्रदायाला जन्म देणारे संत ज्ञानदेव सर्व संतांची माउली झाले आहेत. आजही आपण ज्ञानेश्वरांची पालखी खांद्यावर घेऊन संत वारकरी मोठ्या भक्तिभावाने ज्ञानेश्वर माउलीच्या नावाचा गजर करत पंढरपूर ला जातात.
संत ज्ञानेश्वर महाराज यांचा जन्म व परिवार माहिती
संत ज्ञानेश्वर महाराज | |
---|---|
आईचे नाव | रुक्मिणीबाई |
वडिलांचे नाव | विठ्ठलपंत |
ज्ञानेश्वर महाराज | जन्म इ. स.१२२५ |
भावंडे | निवृत्ती सोपान मुक्ताबाई |
: संत ज्ञानेश्वर महाराज बालपण :
संन्याशाची मुले असे म्हणून त्यांच्याच समाजातील लोक अतिशय निष्ठूरपणे त्यांची हेटाळणी करीत असत. त्यांची केलेली विटंबना, उपेक्षा, हाल विठ्ठलपंत व रुक्मिणीबाई यांना सहन होत नसे. त्यांनी प्रायश्चित्त म्हणून जलसमाधी घेतली. त्यांना वाटले, आपल्या मृत्यूनंतर तरी मुलांना ब्राह्मणसमाजात स्थान मिळेल; परंतु तसे घडले नाही.
आपल्या आईवडिलांच्या मृत्यूमुळे खचलेल्या निवृत्तीनाथांनी मोठ्या धाडसाने आपल्या दोन लहान भाऊ व बहिण यांचे सांत्वन केले आणि आपल्या वडिलांच्या इतर नातेवाईकांकडून कमीतकमी आधार मिळावा म्हणून आपेगावला गेले पण त्याही ठिकाणी सर्व पाहुणे यांनी दरवाजे बंद केले.
त्या पुढे ही भावंडे परत आळंदीला गेली तिथे गेल्यावर समाज त्यांचा स्वीकार करेल असे त्यांना वाटले होते; परंतु असे काही झाले नाही. यापेक्षा त्यांना अन्न आणि पाणी यासारख्या मूलभूत गोष्टीही नकार देण्यात आले. पुढे ही भावंडे शुद्धिपत्र मिळविण्यासाठी पैठणला गेली.
संत ज्ञानेश्वरांचे चमत्कार
संन्याशाची मुले म्हणून वाईट नजरेने लोक त्यांच्याकडे पाहू लागले. तुमच्या मुंजीस धर्मशासाची परवानगी नाही असे शेवटी त्यांना सांगण्यात आले. धर्माचे जे ठेकेदार आहेत तव पुढे असेही म्हणाले की, “ब्रह्मचर्याचे आचरण करा, संसार वाढवू नका, परमेश्वराची भक्ती करा. यामुळे तुमचे पाप नाहीसे होऊन मुक्ती मिळेल.” ब्रह्मसभेची आज्ञा त्यांनी निमूटपणे मान्य केली.
तिथून बाहेर पडल्यानंतर त्यांना एकाने नाव विचारले. ज्ञानेश्वर शांतपणे म्हणाले, “ज्ञानदेव.” त्यावर “नावात काय आहे ? तो समोरून रेडा येत आहे, त्याचेही नाव ज्ञाना आहे; परंतु पखाली वाहण्याचं काम करतो.” असे बाजूला असलेला एक ब्राह्मण कुचेष्टेने म्हणाला, यावर शांतपणे ज्ञानदेव म्हणाले, “हो” पण त्याच अन् माझा आत्मा एकच आहे. हो का ? म्हणतोस आहेस तर तू या रेड्याच्या तोंडून वेद बोलवून दाखव. मग आम्ही तुझं म्हणणं मान्य करू.” ज्ञानोबा रेड्याच्या जवळ गेले आणि रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला. त्याबरोबरच रेड्याच्या तोंडून भराभर वेदातील ऋचा बाहेर पडू लागल्या. कित्येक लोकांनी हा चमत्कार पाहिला. तेथे ज्ञानेश्वरांनी आपली विद्वत्ता सिद्ध केली.
संत ज्ञानेश्वर महाराज यांचे आध्यात्मिक कार्य
‘जे पिंडी ते ब्रह्मांडी’ हे मान्य करून या विश्वातील मानवाचं स्थान काय आहे? ती शक्ती कुठे आहे? याचा शोध कसा घ्यायचा त्यासाठी जप, तप, ध्यान-धारणा ही तंत्रं शोधून काढली. या तंत्राचा वापर केल्यानंतर लक्षात आलं की, जर या शक्तीचा वापर केला तर माणसाच्या मूळस्वरूपाचं रहस्य मिळू शकतं. यावर विचार करून आत्मशोधाला सुरूवात झाली.
आत्मिकशक्तीचा वापर करून ‘असाध्य ते साध्य करण्याचे सामर्थ्य माणसामध्ये आहे हे ज्ञानेश्वरांनी केलेल्या अनेक चमत्कारावरून लक्षात येते. कधी रेड्याच्या तोंडून श्लोक बोलवून घेतले, कधी पाठीवर मांडे भाजवले, तर कधी भिंत चालवली. विज्ञानाचा आणि अध्यात्माचा उद्देश एकच, तो म्हणजे मानवाचे कल्याण. ज्ञानाच्या मार्गाने जीवन सुखी करणे. “जगाच्या कल्याणा संतांच्या विभूति” याचा प्रत्यय ज्ञानेश्वरांच्या आध्यात्मिक प्रवासातून सर्व संतांनी व सामान्यांनी अनुभवला.
: संत ज्ञानेश्वर महाराज यांचे लेखन :
पसायदान
भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी) .
अमृतानुभव .
चांगदेवपासष्टी .