शिक्षक दिन डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन | Teacher day
निबंध लेखन : स्पर्धा : Thank Teacher :
निबंध लिखने के लिए आप को ब्लु कलर के उपर टच कर ना हैं आप को निबंध दिखाई देंगे ।
१) आधुनिक 21 वी सदी में शिक्षको की बदलती जिम्मेदारिया
२)शिक्षक : समाज परिवर्तन के माध्यम
3) देश के विकास में शिक्षकों का योगदान
: भाषण व निबंध :
आदरणीय व्यासपीठ, व्यासपीठावर विराजमान मुख्याध्यापक, वंदनीय गुरुजनवर्ग व माझ्या मित्र मैत्रिणींनो,
दिनांक ५ सप्टेंबर हा दिवस भारताचे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आहे.
त्यामुळे शिक्षकांच्या बदल असणाऱ्या भावना व आदर व्यक्त करण्यासाठी शिक्षक दिन ५ सप्टेंबरला साजरा केला जातो.
शिक्षक हा समाजाचा निर्माण कर्ता आहे. शिक्षकांच्या हातात देशाचे भविष्य असते. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करून देशाची प्रगती करणे हे एकमेव उद्दिष्ट शिक्षकांचे असते.
कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला योग्य आकार देऊन त्यापासून सुंदर मडकी घ त्याप्रमाणे शिक्षक विद्यार्थाच्या व्यक्तिमत्वाला सुरेख आकार देऊन संस्कारक्षम भावी पिढी घडवण्याचे महान कार्य करत असतात.
शिक्षक म्हणजे
शिक्षक (गुरू) म्हणजे एक समुद्र......
ज्ञान , पावित्र्य यांचा, एक आदर होय ,
प्रत्येक व्यक्तीच्या मनातला....
शिक्षक, अपूर्णाला पूर्ण करणारा ....
शिक्षक, शब्दांनी ज्ञान वाढविणारा
शिक्षक, जगण्यातुन जीवन घडवणारा
ज्ञानाचा, पावित्र्याचा, एक आदरणीय कोपरा,
प्रत्येक व्यक्तीच्या मनातला....
शिक्षक, अपूर्णाला पूर्ण करणारा....
शिक्षक, शब्दांनी ज्ञान वाढविणारा
शिक्षक, जगण्यातुन जीवन घडवणारा
शिक्षक, तत्त्वातुन मुल्ये फुलवणारा....
माझ्या जीवनाला ( आयुष्याला) आकार, आधार आणि अमर्याद ज्ञान देणाऱ्या सर्व शिक्षक (गुरूवर्यास) शतशः( कोटी कोटी) नमन.....
मित्रांनो,
"शिकवता शिकविता आपणास
आकाशाला गवसणी
घालण्याचे सामर्थ्य देणारे
आदराचे स्थान म्हणजे आपले... शिक्षक
५ सप्टेंबर... म्हणजे शिक्षक दिन. प्रथमत: आई या गुरुला नंतर... माझ्या वडील या गुरूंना आणि ज्यांनी माझं भविष्य घडविले... त्या तमाम शिक्षकरूपी देवांना नमन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करतो /करते.
"चिखलातला जन्मही
सुंदर सार्थकी लावावा,
निसर्गासारखा शिक्षक प्रत्येकाला मिळावा?"
'शिक्षक' हा भावी पिढीचा
.शिल्पकार असून त्यांच्याकडूनच आपल्याला ज्ञान ..व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते.
असं म्हणतात की,
एक पुस्तक,
एक पेन
एक विद्यार्थी
आणि एक शिक्षक,
*हे संपूर्ण जग बदलू शकतात......
शिक्षक म्हणजे,
आयुष्याला कलाटणी देणारी प्रेरणा, ध्येयपूर्तीसाठी मार्ग दाखवणारी दिशा, कधी बिकट परिस्थितीत, प्रेमाची साथ, तर कधी कौतुकांचे गोड शब्द तर कधी हातावर बसणारा छडीचा मार.
शिक्षक म्हणजे,