वाक्प्रचार मराठी व्याकरण |vakyaprachar marathi vyakaran| Sentence Marathi grammar
वाक्प्रचार(toc)
वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करणे.
(१) हात दाखवून अवलक्षण करणे.
अर्थ - आपणहून संकट ओढवून घेणे.
वाक्य- जंगलतोड करून माणूस स्वतःहून हात दाखवून अवलक्षण करतो.
२) अंगाचा तीळपापड होणे -
अर्थ - खूप राग येणे.
वाक्य • प्रगती पुस्तकातील श्यामलला मिळालेले फार कमी गुण पाहून आईच्या अंगाचा तीळपापड झाला.
३) मूठभर मांस चढणे -
अर्थ - स्तुतीने हुरळून जाणे.
वाक्य - वर्गात सरांनी समीरच्या बुद्धिमत्तेचे कौतुक केले, तेव्हा समीरच्या अंगावर मूठभर मांस चढले.
४) कवेत घेणे
अर्थ : मिठीत घेणे.
वाक्य : बऱ्याच वर्षांनी आपली मुलगी माहेरी आली, तेव्हा तिला प्रेमाने कवेत घेतले.
५) मरगळ झटकणे -
अर्थ - आळस सोडणे.
वाक्य - या वर्षी सगळी मरगळ झटकून मोहन सपाटून अभ्यास करू लागला.
६) हातभार लावणे
अर्थ : मदत करणे.
वाक्य - स्वच्छता अभियानामध्ये सर्व गावकऱ्यांनी योजनेला हातभार लावला.
७) चेहरा पडणे -
अर्थ : लाज वाटणे.
वाक्य : महेशच्या काकांनी महेशची लबाडी उघडकीस आणताच महेशचा चेहरा पडला.
८)आ वासून पाहणे
अर्थ : आश्चर्याने स्तिमित होणे.
वाक्य - आयुष्यात प्रथमच सुंदर देखाव्याकडे स्मिता मोठा 'आ' वासून पाहत राहिली.
९)राबता असणे.
अर्थ सतत हालचाल असणे.
वाक्य - सरपंचांच्या कार्यालयात दररोज माणसांचा राबता असतो.
१०) झुंबड उडपणे
अर्थ : खूप गर्दी होणे.
वाक्य : गावात पहिल्यांदाच भरलेल्या जत्रेमध्ये सकाळपासून गावकऱ्यांची झुंबड उडाली.
११)भुरळ पडणे
अर्थ -मोह होणे,
वाक्य : नीताने काढलेल्या सुंदर चित्राकडे पाहून मितालीला भुरळ पडली.
१२) रममाण होणे -
अर्थ - गुंगून जाणे, मग्न होणे.
वाक्य – शाब्दिक कोडे सोडवण्यात प्रकाश नेहमी रममाण होतो.
१३) आनंद गगनात न मावणे.
अर्थ: खूप आनंद होणे.
वाक्य - बुद्धिबळ स्पर्धेत जिल्ह्यात पहिला आल्यामुळे सोहमचा आनंद गगनात मावत नव्हता.
१४)हेवा वाटणे
अर्थ - मत्सर वाटणे.
वाक्य - साहिलच्या कुशाग्र बुद्धिमत्तेचा त्याच्या मित्रांना नेहमी
हेवा वाटतो.
१५) खूणगाठ बांधणे
अर्थ : दृढ निश्चय करणे.
वाक्य : या वर्षी दिवसरात्र झटून अभ्यास करायचा अशी प्रतीको मनाशी पक्की खूणगाठ बांधली.
१६) सुरंग लावणे -
अर्थ - एखादा बेत उधळून लावणे.
वाक्य - आईने दुपारपासून अभ्यासाबाबत चौकशी करून मुलांच्या सिनेमाला जाण्याच्या आनंदाला सुरुंग लावला.
१७) हातात हात घालणे
अर्थ : सहकार्य करणे.
वाक्य : गावातील पडीक विहिरीची बांधणी करण्यासाठी गावकन्यांनी हातात हात पावले.
१८)पारंगत असणे -
अर्थ: तरबेज असणे.
वाक्य : वयाच्या तिसऱ्या वर्षी छोटा राहुल संगणक वापरण्यात पारंगत झाला.
१९) अंगावर काटा येणे -
अर्थ - भीतीने अंगावरचे केस उभे राहणे.
वाक्य - जंगलातून जाताना समोर अचानक वाघ दिसताच प्रवाशांच्या अंगावर काटा आला.
२०) संकोच वाटणे
अर्थ : शरम वाटणे.
वाक्य - रमेशकडे पैसे मागण्यास उदेशला संकोच वाटला.
२१) सामना करणे -
अर्थ - मुकाबला करणे.
वाक्य - सीमेवर भारतीय जवानांनी शत्रू सैन्याचा शर्थीने सामना केला.
सराव पेपर :१.
प्रश्न. पुढील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करा.
१) कीव येणे
अर्थ :
वाक्य :
२) संकोच वाटणे
अर्थ :
वाक्य :
३) सामना करणे
अर्थ :
वाक्य :
४) अंगावर काटा येणे
अर्थ :
वाक्य :
५) धीर न सोडणे.
अर्थ :
वाक्य :
६) हातभार लावणे
अर्थ :
वाक्य :
७) आनंद गगनात न मावणे
अर्थ :
वाक्य :
८) धूम ठोकणे
अर्थ :
वाक्य :
९) धीर न सोडणे
अर्थ :
वाक्य :
१०) पारंगत असणे
अर्थ :
वाक्य :
वाक्प्रचार सराव व अभ्यास साठी pdf
वाक्प्रचार सराव व अधिक अभ्यासासाठी खालील pdf download करा.
वाक्प्रचार pdf Download ( Download)