विरामचिन्हे मराठी व्याकरण | viramchinhe marathi व्याकरण
मराठीत नऊ प्रमुख विरामचिन्हे आहेत.
१) पूर्णविराम (.)
२) अर्धविराम (;)
३)स्वल्पविराम (,)
४)अपूर्णविराम (:)
५)प्रश्नचिन्ह ( ? )
६) उदगारचिन्ह ( ! )
७) अवतरणचिन्ह
दुहेरी अवतरणचिन्ह ( " ")
एकेरी अवतरणचिन्ह ( ' ')
८) संयोगचिन्ह ( - )
९) अपसारणचिन्ह ( -- )
सराव पेपर :१.
प्रश्न:पुढील कृती सोडवा.
१) पुढील विरामचिन्हे ओळखा :
१) " " - -------------
२) ' ' - -------------
३) : - -------------
४) ! - -------------
५) - - -------------
६) -- - -------------
७) ? - -------------
८) ; - -------------
९) . - -------------
सराव पेपर .२
प्रश्न. खालील कृती सोडवा
पुढील नावांची विरामचिन्हे लिहा :
१) पूर्णविराम - -------------
२) अर्धविराम - -------------
३)स्वल्पविराम - -------------
४)अपूर्णविराम - -------------
५)प्रश्नचिन्ह - -------------
६) उदगारचिन्ह - -------------
७) अवतरणचिन्ह - -------------
दुहेरी अवतरणचिन्ह - -------------
एकेरी अवतरणचिन्ह - -------------
८) संयोगचिन्ह - -------------
९) अपसारणचिन्ह - -------------
सराव पेपर : ३.
प्रश्न. पुढील वाक्यांतील विरामचिन्हे ओळखा :
१)अरे, लोकसभा म्हणजे काय ?
उत्तर : स्वल्पविराम (,) प्रश्नचिन्ह ( ? )
२)"अन्वर जेवला?"
उत्तर : दुहेरी अवतरणचिन्ह ( " ") प्रश्नचिन्ह ( ? )
३)आजपासून मी बसनंच ये - जा करणार.
उत्तर : संयोगचिन्ह ( - ) पूर्णविराम (.)
४) काय? फारच भयंकर कल्पना ही!
उत्तर : प्रश्नचिन्ह ( ? ) उदगारचिन्ह ( ! )
५) गांधीजींनी 'चले जाव' ही घोषणा केली.
उत्तर : एकेरी अवतरणचिन्ह ( ' ') पूर्णविराम (.)
सराव पेपर : ४
प्रश्न. पुढील प्रत्येक वाक्यात योग्य विरामचिन्हे देऊन वाक्ये पुन्हा लिहा :
१) वाघ बिबळा रानकुत्री अशा पिल्लांच्या संभाव्य शत्रूंचा धोका होता
उत्तर : वाघ, बिबळा, रानकुत्री अशा पिल्लांच्या संभाव्य शत्रूंचा धोका होता.
२) कल्पनांचा सुंदर आविष्कार कवितेत असतो हे बरोबर आहे ना
उत्तर :कल्पनांचा सुंदर आविष्कार कवितेत असतो, हे बरोबर आहे ना?
३) पाय वाळक्या काटकीवर पडून कट असा आवाज आला
उत्तर :पाय वाळक्या काटकीवर पडून 'कट' असा आवाज आला.
४) फेनधवल तुषारांमध्ये राहाल कैसे कष्टी
उत्तर :फेनधवल तुषारांमध्ये, राहाल कैसे कष्टी ?
५) भूतकाळ वर्तमानकाळ व भविष्यकाळ यांची साखळी जोडलेली
उत्तर : भूतकाळ, वर्तमानकाळ व भविष्यकाळ यांची साखळी जोडलेली असते.
विरामचिन्हे अभ्यासासाठी खालील pdf Download करा.
विरामचिन्हे Download(Download)