शब्दसिद्धी मराठी व्याकरण इयत्ता 10 वी | Shabdsidhi Marathi Vyakran 10
विषय - मराठी
इयत्ता - १० वी
घटक - व्याकरण शब्दसिद्धी
शब्दसिद्धी
अर्थ - भाषेमधला शब्द कसा तयार होतो त्याला शब्दसिद्धी असे म्हणतात.
साधित शब्द चे प्रकार
१) उपसर्गघटित शब्द
२) प्रत्ययघटित शब्द
३) अभ्यस्त शब्द
१) उपसर्गघटित शब्द
मूळ शब्दांच्या आधी एक किंवा अधिक अक्षरे लागून जे शब्द तयार होतात ,त्यांना उपसर्गघटित शब्द म्हणतात .
उदा .
उपसर्ग + मूळ शब्द ➡️ उपसर्गघटित शब्द
१) सु + विचार ➡️ सुविचार
२) प्र + गती ➡️ प्रगती.
उपसर्ग घटित शब्द यावर SSC परीक्षेत विचारले खालील प्रमाणे प्रश्न विचारतात.
१)' दु:' हा उपसर्ग असलेले चार शब्द लिहा.
➡️ दुष्काळ , दुर्दैव , दुःख, दुर्दशा .
२) प्रत्ययघटित शब्द
मूळ शब्दांच्या नंतर एक किंवा अधिक अक्षरे जोडून जे शब्द तयार होतात त्यांना प्रत्ययघटित शब्द म्हणतात .
नंतर लागणाऱ्या शब्दांना प्रत्यय म्हणतात
उदा.
मूळ + शब्द प्रत्यय ➡️प्रत्ययघटित शब्द
१) रस + इक ➡️ रसिक
२) माणूस + की ➡️ माणुसकी
प्रत्यय घटित शब्द यावर Ssc परीक्षेत खालील प्रमाणे प्रश्न विचारले जातात.
१) ' दार' हा प्रत्यय लावन दोन शब्द तयार करा.
➡️ चौकीदार , समजूतदार.
३)अभ्यस्त शब्द
एकाच प्रकारचे दोन शब्द एकत्र येणे किंवा सार्थ व निरर्थक शब्द एकत्र येणे किंवा दोन विरुद्ध शब्द एकत्र येणे किंवा शब्दांची पुनरावृत्ती
होणे, अशा प्रकारच्या शब्दांना अभ्यस्त शब्द म्हणतात. उदा., (१) क्षणक्षण, जवळजवळ, पैसाचपैसा ➡️ पूर्णाभ्यस्त.
(२) आसपास, जवळपास, उभाआडवा, शेजारीपाजारी, पुस्तकबिस्तक ➡️ अंशाभ्यस्त.
(३) कडकड, बडबड, झुळझुळ, गुटगुटीत, तुरुतुरु,
कडकडाट ➡️ अनुकरणवाचक.
अभ्यस्त शब्द यावर SSC परीक्षेत खालील प्रमाणे प्रश्न विचारले जातात .
१) दिवसेंदिवस सारखे चार अभ्यस्त शब्द लिहा.
➡️ महिनोंमहिने , क्षणोक्षणी , घरोघरी, वारंवार .