राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण NAS 2021 | NATIONAL ACHIEVEMENT SURVEY 2021
राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण NAS 2021 | NATIONAL ACHIEVEMENT SURVEY 2021(toc)
भारत सरकारच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाच्या वतीने राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT) दिल्ली, CBSE बोर्ड व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या वतीने संपूर्ण राज्यात एकाच दिवशी राष्ट्रीय संपादणूक सर्व्हेक्षण चाचणी घेण्यात येणार आहे.
राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण NAS माहिती
➡️ चाचणी दिनांक 12 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 10.30 ते 12.30 .
या कालावधीत सर्व्हेक्षणमध्ये निवडण्यात आलेल्या शाळेमध्येच घेण्यात येणार आहे.
➡️ निवडलेल्या शाळांची यादी व निवडलेले वर्ग NAS CBSE CELL व SCERT (SNO) पुणे कडून प्राप्त होताच कळविण्यात येईल.
➡️ राष्ट्रीय संपादणूक सर्व्हेक्षण चाचणी इयत्ता 3 टी, 5वी, 8 वी व 10 वी साठी घेण्यात येणार असून
निवडलेल्या वर्गातील CBSE च्या सूचनानुसार एकूण पट 30 पेक्षा जास्त असल्यास एकूण पटापैकी 30 विद्यार्थ्यांची निवड करून तेवढयाच विद्यार्थ्यांची चाचणी घेण्यात येणार आहे.
➡️ तसेच वर्गातील विद्यार्थी पटसंख्या 30 पेक्षा कमी असल्यास सर्व विद्यार्थांची चाचणी घेण्यात येणार आहे.
➡️ अधिक माहितीसाठी या संकेतस्थळावर भेट देण्यात यावी.