समास व समासचे प्रकार Samas prakar मराठी व्याकरण
इयत्ता - १० वी
विषय - मराठी व्याकरण
समास व समासचे प्रकार(toc)
१)कर्मधारय समास
२)द्वंद्व समास
३) द् विगू समास
कर्मधारय समास
कर्मधारय समासाची वैशिष्ट्ये.
१) दोन्ही पदे एकाच विभक्तीत असतात.
२) काही वेळेस पूर्व पद विशेषण असते.
उदा., नरसिंह
३) काही वेळेस उत्तर पद म्हणजे दुसरे पद विशेषण असते .
उदा. घननीळ
४) कधी दोन्ही पदे विशेषणे असतात.
उदा., श्यामसुंदर (उ) कधी पहिले पद उपमान तर कधी दुसरे पद उपमान असते.
उदा., कमलनयन, नरसिंह
५) कधी दोन्ही पदे एकरूप असतात.
उदा. विद्याधन
सामासिक शब्द | विग्रह |
---|---|
मातृभूमी | भूमी हीच माता |
नीलकमल | नील असे कमल |
नरोत्तम | उत्तम असा नर |
महाराष्ट्र | महान असे राष्ट्र |
नरसिंह | सिंहासारखा नर |
द्वंद्व समास
ज्या समाजातील दोन्ही पदे अर्थ दृष्ट्या प्रधान असतात त्यास 'द्वंद्व समास' असे म्हणतात.
द्वंद्व समास व त्याचे प्रकार
प्रकार | सामासिक शब्द | विग्रह |
---|---|---|
इतरेतर द्वंद्व | रामलक्ष्मण | राम आणि लक्ष्मण |
वैकल्पिक द्वंद्व | बरेवाईट | बरे किंवा वाईट |
समाहार द्वंद्व | मीठभाकर | मीठ, भाकर वगैरे |
'इतरेतर द्वंद्व ' समास
ज्या समासाचा विग्रह करताना आणि', 'व' या समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो, त्या समासाला 'इतरेतर द्वंद्व ' समास म्हणतात.
इतरेतर द्वंद्व समास ची वैशिष्ट्ये
१) अर्थासाठी दोन्ही पदांची अपेक्षा असते.
२) या समासाचा विग्रह करताना 'आणि', 'व' ही समुच्चयबोधक अव्यये वापरावी लागतात.
वैकल्पिक द्वंद्व समास
ज्या समासाचा विग्रह करताना 'किवा', 'अथवा', 'वा' या विकल्पबोधक उभयान्वयी अव्ययाचा उपयोग
करावा लागतो, त्यास 'वैकल्पिक द्वंद्व समास' असे म्हणतात.
वैकल्पिक समासाची वैशिष्ट्ये
१) दोन्ही प्रधान पदांपैकी एकाचीच अपेक्षा असते.
२) समासाचा विग्रह करताना 'किंवा', 'अथवा', 'वा' यांपैकी एखादे विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय वापरावे लागते.
समाहार द्वंद्व समास
या समासातील पदांचा विग्रह करताना त्यातील पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थाचाही त्यात समावेश केलेला असतो, त्यास 'समाहार द्वंद्व समास असे म्हणतात.
समाहार द्वंद्व समासाची वैशिष्ट्ये
१) समासातील पदांचा विग्रह करताना त्यातील पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थाचाही समावेश केलेला असतो.
२) समासात आलेल्या आणि त्या जातीच्या इतर वस्तूंच्या समुदायाला महत्त्व असते, म्हणून हा समास
एकवचनी असतो.
द् विगू समास
ज्या समासातील दुसरे पद प्रधान असून पहिले पद संख्याविशेषण असते, त्यास द्विगू समास म्हणतात.
उदा.त्रिभुवन चौकोन, पंचपाळे, नवरात्र
द् विगू समास ची वैशिष्ट्ये
१) द्विगू समासात पूर्वपद संख्यावाचक असते.
२) हा समास नेहमी एकवचनात असतो.
३) सामासिक शब्दावरून एका समुच्चयाचा बोध होतो.
सामासिक शब्द | विग्रह |
---|---|
त्रिभुवन | तीन भुवनांचा समूह |
पंचपाळे | पाच पाळ्यांचा समूह |
नवरात्र | नऊ रात्रींचा समूह |
चौकोन | चार कोनांचा समूह |