Type Here to Get Search Results !

महत्त्वपूर्ण प्रश्न विषय - मराठी | प्रथम सत्र |Ssc Important Question Subject Marathi

महत्त्वपूर्ण प्रश्न विषय - मराठी | प्रथम सत्र |Ssc Important Question Subject Marathi 

महत्वपूर्ण प्रश्न पाठ व कविता (toc)

कविता 

एस. एस. सी. परीक्षेत या कवितेवर आकलन कृती चे खालील प्रकारे प्रश्न विचारले जातात.
कविता - संतवाणी
१) माता धावून जाते - जेव्हा बाळ आगीत पडते.
२) परमेश्वराचे दास - संत नामदेव 
३)मेघाला विनवणी करणारा - चातक

अंकीला मी दास तुझा

महत्त्वपूर्ण प्रश्न .

१) कवितेचे कवी -  संत नामदेव,

(२) कवितेचा विषय  - 
देवरूपी मातेने बाळाचा म्हणजेच आपला सांभाळ मायेने करावा, अशी विनवणी करणारा हा अभंग आहे.

(३) कवितेतील पुढील दोन ओळींचा सरळ अर्थ

 'सर्वेचि झेंपावें पक्षिणी पिलीं पडतांचि धरणीं ।।

भुकेलें वत्सरावें। धेनु हुंबरत धांवे ।।

सरळ अर्थ पिल्लू झाडावरून खाली पडताच त्याला वाचवण्यासाठी पक्षिणी जिवाच्या आकांताने खाली झेप घेते. भुकेले वासरू पाहून गाय हंबरत त्याच्याकडे धावते. यातून पशु-पक्ष्यांच्या हृदयातील ममता दर्शवली आहे.

(४) कवितेतून मिळणारा संदेश -
 भगवंत आई प्रमाणे  आपला सांभाळ करील, असा दृढ विश्वास संत नामदेव या अभंगातून व्यक्त करतात.

(५) कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे  - 

देवा  ने ही  आईप्रमाणे आपल्यावर मायेची नित्य पखरण करावी, हा विचारच -मनाला भावला. म्हणूनच मला हा अभंग खूप आवडला.

(६) प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ (चार शब्द)

(i) धेनू = गाय (ii) धरणी घरती 
(ii) काज = काम
 (iv) अग्नी = आग.

योगी सर्वकाळ सुखदाता

१) योगी पुरुषाचे चार वैशिष्ट्ये 
➡️ सर्वांसाठी मृदू असतात .
     सर्वकाळ सुखदाता देणारे.
      स्वानंद तृप्ती देतात.
      सर्व इंद्रियांना शांत करतात

२) चंद्र किरण घेऊन जगणारा पक्षी - चकोर

३) पिलांना सुरक्षितता देणारे - पक्षिणीचे पंख.

४) चिरकाल टिकणारा आनंद - स्वानंद तृप्ती

५) व्यक्तीला सदैव सुख देणारा - योगी

६) योगी पुरुष पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे 
➡️ पाण्याने माणसाच्या पोटाची भूक भागते परंतु योगी पुरुषाच्या श्रवण कीर्तनाने माणसांचे मन सदैव तृप्त राहते.
पाण्याची गोडी फक्त जीभे पुरती मर्यादित आहे परंतु योगी पुरुषांच्या आत्मज्ञानाची गोडी सर्व इंद्रियांना शांत करते.


दोन दिवस

१) प्रस्तुत कवितेचे कवी -  नारायण सुर्वे.

२) प्रस्तुत कवितेचा विषय
→ कामगाराच्या आयुष्यातील परिस्थितीचे वर्णन.

(३) प्रस्तुत कवितेतील दोन ओळींचा सरळ अर्थ 

शेकडो वेळा चंद्र आला; तारे फुलले, रात्र धुंद झाली; भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली.

अनेक वेळा चंद्र उगवला. चांदणे पडले. तारे चमचमले, काही रात्री आनंदमय गेल्या. बाकीचे सर्व आयुष्य 'भाकरीचा चंद्र शोधण्यात म्हणजे भूक शमवण्यात व उदरनिर्वाह करण्यात नासून गेले.

४) कवितेतून मिळणारा संदेश जीवन -

  जीवन सकारात्मक जगण्याची ऊर्जा ही कविता देते, तसेच मानवी निर्धार व आशावाद हे तत्त्व मनावर बिंबवले जाते.

(५) कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणे -

  कामगारविश्वाचे दाहक चित्रण केल्यामुळे कविता मनाला भिडते. 

(६) प्रस्तुत कवितेतील दिलेल्या शब्दांचे अर्थ लिहिणे .

(i) जिंदगी (ii) गहाण (iii) दारिद्र्य (iv) रात्र. 

उत्तरे : (1) जिंदगी = आयुष्य (ii) गहाण = तारण (iii) दारिद्र्य = दैन्य (iv) रात्र = रजनी.

२) कवीचे सर्वस्व असलेली गोष्ट - हात

३) दोन दिवस  यात गेले - दोन दिवस दुःखात , वाट पाहण्यात .

४) कलम केलेले हात - या हातांनी कष्ट उपसले .कधी अभिमानाने उंचावले.

कविता : स्वप्न करू साकार 

 १) प्रस्तुत कवितेचे कवी / कवयित्री : किशोर पाठक
२) प्रस्तुत कवितेचा विषय : देशाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न या कवितेत रेखाटले आहे
३) प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश : कर्तव्याची  जाणीव करून देणारा संदेश मिळतो
४) प्रस्तुत कविता आवडण्याचे व न आवडण्याचे कारण : 
कारण या कवितेमध्ये कृषी संस्कृती श्रमप्रतिष्ठा एकात्मतेचे सामर्थ्य या मूल्यांचा पुरस्कार केला आहे नवीन पिढीसाठी नवी स्वप्ने साकार करण्याचा विचार मांडणारी ही कविता मला आवडते.
५)प्रस्तुत कवितेतील खालील ओळींचा अर्थ लिहा  :
या देशाच्या मातीवर अमुचा रे अधिकार नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न करू साकार 
अर्थ: पहिल्या ओळी मध्ये भारतीयांचा मा ती वरचा अधिकार सांगितला आहे तर दुसऱ्या ओळीमध्ये नव्या पिढीचे व नव्या युगाचे स्वप्न साकार करणे या कर्तव्याची जाणीव करून दिली आहे.
६) कवितेतील पुढील चार शब्दांचे अर्थ लिहा :
अ)   तन  : शरीर   ब)    हस्त  : हात  क) धन  : दौलत  ड)विभव   : वैभव

कविता : हिरवंगार झाडासारखं

 १) प्रस्तुत कवितेचे कवी / कवयित्री : जॉर्ज लोपीस
२) प्रस्तुत कवितेचा विषय : या माणसाने आपले आयुष्य झाडासारखे जगावे.
३) प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश : झाडाचे महत्व झाडाचे सहनशीलता परोपकारी वृत्ती संकटात ठाम उभी राहण्याची जिद्द या गुणांची माहिती या कवितेतून अधोरेखित झाली आहे.
४) प्रस्तुत कविता आवडण्याचे व न आवडण्याचे कारण : 
झाडाची परोपकारी वृत्ती दानशूरता आनंद वृत्ती हे गुण मानवाने आत्मसात करावेत असे ही कविता सांगते म्हणून ही कविता आवडते.
५) प्रस्तुत कवितेतील खालील  ओळींचा अर्थ लिहा  :
( १)  झाड बसते ध्यानस्थ ऋषीसारखं मौन व्रत धारण करून तपश्चर्या करत :
 अर्थ : एखादा ऋषी-मुनी जसा मोर घेऊन ध्यानस्थ पणे तपश्चर्या करीत बसतो त्याप्रमाणे झाडी अबोल होऊन ध्यानस्थ बसते.
 ६) कवितेतील पुढील चार शब्दांचे अर्थ लिहा .
अ)  दव   :दही वराचे थेंब     ब)    बाहू    : हात 
क)     कवेत  : कुशीत  ड)   वस्त्र  : कपडे


कविता : रंग मजेचे रंग उद्याचे 

 १) प्रस्तुत कवितेचे कवी / कवयित्री : अंजली कुलकर्णी
२) प्रस्तुत कवितेचा विषय : या कवितेमधून संगणक युगाची निसर्गाची दौलत जोपासायला हवी हे सांगितले आहे.
३) प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश : मानवाने पर्यावरणाची जोपासना केली पाहिजे. निसर्गाची रममाण होऊन जगण्यातच खरा आनंद आहे हा मौलिक संदेश ही कविता देते.
४) प्रस्तुत कविता आवडण्याचे व न आवडण्याचे कारण : 
पर्यावरणाची होणारी हानी थांबून पर्यावरणाचे रक्षण आपण केले पाहिजे तरच निसर्गाच्या विविध मनोहारी आविष्कारात जगण्याचा मनस्वी आनंद आपणास मिळू शकेल.
५) प्रस्तुत कवितेतील खालील  ओळींचा अर्थ लिहा  :
( १) फुलफुलांचे दाट ताटवे,जिथे पोचते दृष्टी रंग मजेचे, रंग उद्याचे, जपून ठेवू सृष्टी  :
 अर्थ : निसर्गामध्ये जिथे आपली नजर जाईल तिथपर्यंत वेगवेगळ्या फुलांचे गर्द गुच्छ ड हाळीला लगडलेले पाहायला मिळतील
 ६) कवितेतील पुढील चार शब्दांचे अर्थ लिहा :
अ)   वृष्टी   : वर्षाव    ब)  अनोखी   : वेगळी
  क) तुष्टी  :समाधान  ड) : दाट  : गर्द
 

 कविता : औक्षण

 १) प्रस्तुत कवितेचे कवी / कवयित्री : इंदिरा संत

२) प्रस्तुत कवितेचा विषय : देशाचे रक्षण करणाऱ्या सीमेवरील जवान विषयी कृतज्ञता व्यक्त करणारी ही कविता

३) प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश : जवानांचे शौर्य गाथे पुढे नतमस्तक होण्याची शिकवण हि कविता सहज पणे देते.

४) प्रस्तुत कविता आवडण्याचे व न आवडण्याचे कारण :
 कारण - सैनिक देशाची रक्षा करतो अशा सर्व सैनिकांचे भले व्हावे यासाठी त्यांचे औक्षण  केले जाते .त्याला चिरंजीवी त्वाचा आशीर्वाद दिला जातो हा विचार माझ्या मनाला आवडतो म्हणून ही कविता मला आवडते.

५) कवितेतील पुढील चार शब्दांचे अर्थ लिहा :
अ) द्रव्य - पैसा    ब) सामर्थ्य - बळ क) जिद्द - हिम्मत 
ड) राखण - रक्षण

गद्य विभाग 

एस. एस. सी. परीक्षेत या पाठवर  आकलन कृती चे खालील प्रकारे प्रश्न विचारले जातात.

पाठ - शाल 

1)लेखकाने भूषवलेली पदे:  

उत्तर -  साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद व विश्वकोशाच्या अध्यक्ष 

2)2004 च्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष .

उत्तर -  लेखक: रा. ग. जाधव.

3) निकटवर्ती मित्राला दिलेले .

उत्तर - शालींचे गोठोडे 

4) सगळ्या शाली यांना वाटल्या .

उत्तर -  गरीब श्रमिकांना 

5) भिक्षेकऱ्याच्या अंगावर असलेली 

उत्तर -  चिरगुटे.

6)कविवर्य नारायण सुर्वे गाजवत .

उत्तर - सभा, संमेलन .

7)लेखकाने गरीब बाईला दिले.

उत्तर - पुलकित शाल, पाच पाचपन्नास 

8) बाळ का रडत होते ? 

उत्तर - कारण - कडाक्याच्या थंडीने कुडकुडत रडत होते

9) लेखकाने सुटकेस मधील पुलकित शाल काढली ?

उत्तर . कारण: कडाक्याच्या थंडीने कुडकुडत रडत होते पण आई तिकडे बघतच नव्हती.

स्वमत :

(आप के इस पर जो विचार हैं ओ लेखन कर ना हैं ) गुण: 03

प्रश्न.1) शाल व शालीनता यांवर तुमचे मत लिहा. 

प्रश्न. 2) भिक्षेकऱ्याने केलेल्या शालीचा उपयोग या विषयी तुमचे मत लिहा.


पाठ : 4.उपास.

एस. एस. सी. परीक्षेत या पाठवर  आकलन कृती चे खालील प्रकारे प्रश्न विचारले जातात.

1) आकलन कृती - आकृती बंध पूर्ण करा. गुण .02

पंतांना शेजाऱ्यांनी दिलेले भाताचे पदार्थ .

उत्तर - 1) सकोजी:  कोळंबी भात   2) पसरटवारांनी: नागपुरी वडा भात.

2) पंतांच्या उग्र साधनेचे घटक .

उत्तर - उपास , निराहार ,शास्त्रोक्त आहार, दोरीवरच्या उड्या 

3) स्वमत :  गुण : 03

प्रश्न : तुम्हाला सर्वात आवडलेला विनोद कोणता ? तो का आवडला ते स्पष्ट करा.

पाठ .7.फुटप्रिंटस. लेखक : डॉ. प्रदीप आवटे.

.एस. एस. सी. परीक्षेत या पाठवर  आकलन कृती चे खालील प्रकारे प्रश्न विचारले जातात

1) आकलन कृती - पाठा तील कोणतेही चार व्यक्तिंची नावे.

उत्तर -  अभिषेक, रेखमावशी ,सुमित, स्नेहल( गुण:02)

2) पावडेकाकांच्या पावलांची वैशिष्ट्ये .

उत्तर - एकदम गोजीरा, गुलाबी तळवा, कुठे चिरण्या नाहीत,एकदम लोण्यागत(गुण.02)

3) स्वमत : गुण.03

प्रश्न: आपण जसे आपले घर स्वच्छ ठेवतो . तसेच  आपली धरती माता प्रदूषण स्वच्छ करण्यासाठी उपाय सुचवा 

पाठ :08 उर्जाशक्तीचा जागर लेखक : डॉ.रघुनाथ माशेलकर.

१) आकलन कृती : गुण .02

१) माशेल गावच्या पुसट आठवणी .

उत्तर - मैदानावर खेळल्याच्या ,पिंपळ कट्यावर निवांत बसणे.

2) आकलन कृती : चौकट पूर्ण करणे. गुण .02

१) युनियन हायस्कूल मुंबईच्या भागात होते.

उत्तर - गिरगाव.

२) प्रत्येक मुलाची पहिली शिक्षक .

उत्तर -  आई

3) मालती निवास मुंबईतील या भागात होते: खेतवाडी तील देशमुख गल्ली मध्ये.

४) लेखकाची प्राथमिक शाळा येथे होती: खेतवाडी

५) स्वमत : गुण:03

प्रश्न: माझ्या जीवनातील 'शिक्षकाचे स्थान ' या विषयावर तुमचे मत लिहा.



पाठ .११ . जंगल डायरी. लेखक : अतुल धामणकर .

१) आकलन कृती : गुण: 02

१) या पैकी एकाची वाघिणीने शिकार साधली असावी .

उत्तर -  सांबर ,रान गवा , नील गाय, रान डुक्कर 

२) आकलन कृती - कारण लिहा .गुण०२

१)  वाघीण पिलांच्या सुरक्षेबद्दल दक्ष होती कारण .

कारण - नर वाघ,बिबला रानकुत्री, व इतर भक्षकां पासून खूपच धोका होता.

२) वाघिणीने मंद पाने गुरगुरुन पसंती व्यक्त केली ,कारण .

कारण -  एक पिलू वाघिणीच्या पाठीवर  उडी घेते पण ते घसरून पाण्यात धपकन पडले

स्वमत : गुण .03.

प्रश्न . तुम्ही पाहिलेल्या जंगली प्राण्याची माहिती लिहा .


पाठ: १४. बीज पेरले गेले. लेखक : चंदू बोर्डे.

१) आकलन कृती : कारण लिहा .गुण 02

१) लेखकाला क्रिकेट ची मॅच झाडावर बसून पाहावी लागली कारण.

कारण - आत जाण्याचे सर्व मार्ग बंद होते.

२) लेखकाच्या पाठीवर या गोष्टीचा वर्षाव होई .

उत्तर - धमक लाडू व चापट पोळ्यांचा

३) लेखकाचा बालपणीचा स्वभाव .

उत्तर - खेळकर ,खोडकर

४) वर्गात गणिताच्या तासाला वहीची अनेक पाने लेखकाच्या स्वाक्षरीने भरू लागली कारण .

 कारण : काही खेळाडू आनंदाने सही देत होते काही नाकारत होते.हे पाहून आपण ही मोठे खेळाडू बनू मंग आपल्या भोवती अशीच गर्दी होईल म्हणून

२) ओघ तक्ता करा.

१) लाजेने मान खाली 

२) आंतर शालेय सामना

३) १०० धावा केल्या

४) कौतुकाचे भाव

५) अभिमानाने मान वर.

६) स्वमत : गुण .03.१) लेखका च्या वडिलांची शिस्त  जाणवलेले प्रसंग पाठच्या आधारे तुमच्या शब्दात लिहा.

पाठ :15.खरा नागरिक .

लेखक : सुहास बारटक्के.  1)आकलन कृती : गुण .02

१) निरंजनला मिळालेल्या कोणत्याही दोन सवलती :

उत्तर - १) वसतिगृहात प्रवेश

        २) शिष्यवृत्ती वह्या पुस्तकांच्या खर्चा साठी.

 २) चौकट पूर्ण करा. 

 १) निरंजनला हृदयाशी धरणारे : गुरुजी  

२) निरंजनचा बुडालेला पेपर : नागरिकशास्त्र .

3) मावशीच्या घरी निरंजनला भेटायला आलेली मंडळी : 

उत्तर : शाळेचे अधिकारी, ,जिल्हाधिकारी ,मुख्याध्यापक, भड सावळे गुरुजी, वर्तमानपत्र वाले. (गुण : 02)

4) निरंजन ची दिनचर्या लिहा.

उत्तर -  सकाळी अभ्यास करणे, भूपाळी ऐकणे, पक्ष्याचे सुमधुर संगीत, संस्कृतचा झोक.( गुण 2)

5)  भडसावळे गुरुजींच्या मते सकाळची वेळ अभ्यासाला योग्य असते 

कारण :  प्रसन्न वातावरण ,शरीर पुरेशा विश्रांती मुळे ताजतवान बनलेले असतं. ( गुण 02)

6) स्वमत : गुण .03 .1) तुम्हाला अभिप्रेत असलेली आदर्श विद्यार्त्यांची गुण वैशिष्ट्य लिहा.

2)  निरंजन खरा नागरिक कसा ठरला ते तुमच्या शब्दात लिहा.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad