कला उत्सव 2021 माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी कला उत्सव kala ustav 2021 std 9th to 12th 2021
|
कला उत्सव 2021 |
कला उत्सव 2021 माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी कला उत्सव kala ustav 2021 std 9th to 12th
माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांमधील प्रतिभा ओळखून त्यांच्या मधील कलागुणांना वाव देण्यासाठी शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, नवी दिल्ली यांच्यामार्फत सन 2015-16 पासून कला उत्सवाचे दरवर्षी आयोजन करण्यात येत आहे.
यामध्ये देशातील सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेश आपला सहभाग नोंदवितात. सन 2021-22 मध्ये केंद्र शासनाने कला उत्सवाच्या आयोजनामध्ये शास्त्रीय गायन, पारंपारिक गायन, शास्त्रीय संगीत वादन, पारंपारिक लोकसंगीत वादन, शास्त्रीय नृत्य, पारंपारिक लोकनृत्य, द्वीमितीय चित्र, त्रिमितीय चित्र/शिल्प व स्थानिक खेळणी तयार करणे या 9 कला प्रकारांचा समावेश केलेला आहे. त्यामुळे सन 2021- 22 मध्ये राज्याच्या 9 कला प्रकारांचे 9 संघ राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या ऑनलाइन कला उत्सवासाठी 10 डिसेंबर 2021 पर्यंत नामनिर्देशित करावयाचे आहेत. राज्याच्या संघ निवडीसाठी वर नमूद कला प्रकारांमध्ये ऑनलाईन स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.
पुरस्कार
प्रथम पुरस्कार - 25,000 /-
द्वितीय पुरस्कार - 20,000/-
तृतीय पुरस्कार - 15 ,000 /-
कला उत्सवामध्ये राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील 9 वी ते 12 वीं मध्ये शिकणारे विद्यार्थी सहभागी होऊ शकतील. सर्व कला प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांचा वैयक्तिक सहभाग असणार आहे .
अधिक माहितीसाठी या स्पर्धेबाबतच्या मार्गदर्शक सूचना खालील वेबसाईटवर उपलब्ध आहेत.
📖 विद्यार्थ्यांसाठी सूचना 📖
➡️ एक विद्यार्थी केवळ एका कला प्रकारातच सहभाग घेऊ शकतो.
➡️व्यावसायिक कलाकारांचा सहभाग अथवा त्यांची मदत घेता येणार नाही, असे निदर्शनास आल्यास सदरील प्रवेशिका रद्द केली जाईल.
➡️ निकषात नमूद केल्यानुसार 4 ते 6 मिनिटांचा . व्हिडीओ मोबाईल अथवा कॅमेराद्वारे तयार करावा.
➡️ व्हिडिओमधील चित्र व आवाजात स्पष्टता असावी तयार केलेला व्हिडीओ व सोबत कला सादर करतानाचे 5 फोटो विद्यार्थ्यांने स्वत:च्या / पालक/शिक्षकाच्या फेसबुक, इंस्टाग्राम ट्वीटर किंवा अकाऊंट वरून #kalautsavmah2021 या हॅशटॅगचा वापर करून दि. 13 नोव्हेंबर 2021 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पोस्ट करावा.
➡️ व्हिडीओ पोस्ट करताना विद्यार्थ्याने आपले नाव, इयत्ता, शाळेचा पत्ता, शाळेचा Udise क्रमांक, तालुका, जिल्हा, मेल आय. डी. संपर्क क्र, भाग घेत असलेला कला प्रकार इ. उल्लेख करावा.
➡️ पोस्ट Public असावी. ई- मेल पत्ता स्वतःचा
नसेल तर पालक / शिक्षक यांचा ई मेल वापरावा.
➡️ फेसबुक, इंस्टाग्राम, डीटर किंवा यु-टूब अकाऊंट वरून व्हिडीओ पोस्ट करताना प्राप्त झालेली कोणतीही एक लिंक copy करून ठेवावी.
➡️ #kalautsavmah2021 हा हॅशटॅग लिहिताना अक्षरात कोठेही स्पेस देऊ नये, हॅशटॅगचे स्पेलिंग चुकवू नये.
कला उत्सव २०२१ नाव नोंदणी
विद्यार्थ्यांने आपली नोंदणी
या लिंक वर जाऊन करावी.
नोंदणी मधील सर्व माहिती विद्यार्थ्यांने बिनचूक व पूर्ण भरावी.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्यासाठी सूचना:
जिल्ह्यातील सर्व पात्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी कला उत्सवामध्ये सहभागी व्हावे यासाठी प्राचार्य, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था व शिक्षणाधिकारी (माध्य.) यांनी शाळा मुख्याध्यापकांसाठी संयुक्त सहीचे एक परिपत्रक त्वरीत निर्गमित करून कला उत्सवाबाबतची माहिती आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांना द्यावी.
राज्यभरातून प्राप्त झालेली नामनिर्देशने व व्हिडीओ याची यादी राज्यस्तरावरून जिल्हानिहाय, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थाना दि. 15 नोव्हेंबर 2021 रोजी पुरविले जाईल.
प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी
जिल्ह्यातील प्राप्त नामनिर्देशनामधून योग्य विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी प्रत्येक कलाप्रकारनिहाय दोन परीक्षकांची एक निवड समिती जिल्हास्तरावर स्थापन करावी. (एकूण 9 कला प्रकार)
दि. 17 व 18 नोव्हेंबर 2021 रोजी (प्रवेशिकांच्या संख्येनुसार नुसार 1/2 दिवस) राज्यस्तरावरून पुरविलेल्या व्हिडीओचे परीक्षण करून परीक्षकांनी जिल्हास्तरावर प्रत्येक कला प्रकारात सर्वोत्कृष्ट विद्यार्थी व । विद्यार्थिनी अशा 9 कला प्रकारांत 18 विद्यार्थ्यांची निवड ठरवून दिलेल्या निकषानुसार गुणदान करून करावी. (सोबत कला प्रकार निहाय निकष व गुणदान तक्ते जोडले आहेत.)
मुंबई शहर व उपनगरामधील विद्यार्थी निवडीची प्रक्रिया प्राचार्य, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई यांनी करावी.
जिल्हास्तरावरील कलाप्रकार निहाय सर्वोत्कृष्ट म्हणून निवडलेल्या मुलांची नावे या कार्यालयास दि. 23 नोव्हेंबर 2021 रोजी संध्या. 5.00 पर्यंत कळवावी.