Type Here to Get Search Results !

15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी लसीकरण | 15 to 18 age Child Vaccination | COWIN Registration | रजिस्ट्रेशन कसे करावे? | बूस्टर डोसही |Booster Dose

15  ते 18 वयोगटातील मुलांसाठी लसीकरण | 15 to 18 age Child Vaccination | COWIN  Registration | रजिस्ट्रेशन कसे करावे? बूस्टर डोसही |Booster Dose 


Children's Vaccination : COWIN Registration रजिस्ट्रेशन कसे करावे? जाणून घ्या

Corona Vaccination for children Registration (toc)

Corona Vaccination for children 15 to 18 Registration 

Corona Vaccination for children: देशाता आता 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी लसीकरण (Child Vaccination) सुरु होत आहे.

 मुलांना 1 जानेवारी 2022 पासून COWIN पोर्टलवर नाव नोंदणी करता येणार आहे, 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी लसीकरण 3 जानेवारी 2022 पासून सुरू आहे .

CoWIN वर नोंदणी कशी कराल


- सध्या, CoWIN प्लॅटफॉर्मवर फक्त भारत बायोटेकच्या Covaxin (Bharat Biotech Covaxin) चा पर्याय असेल. 25 डिसेंबर रोजी, ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी आपत्कालीन वापरासाठी कोवॅक्सिनला मान्यता दिली आहे. Zydus Cadila ची ZyCoV-D लस देखील लहान मुलांसाठी वापरण्यासाठी मंजूर केली असली तरी ती प्रथम प्रौढांना दिली जाईल.

मुले त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसोबत नोंदणी करू शकतात तसेच स्वतंत्रपणे नोंदणी देखील करू शकतात. त्यांच्याकडे आधार कार्ड नसल्यास, मुले त्यांच्या विद्यार्थी ओळखपत्राच्या मदतीने देखील नोंदणी करू शकतात. 

Cowin aap कसे Download करावे ।

Cowin aap Download करण्यासाठी खालील लिंक ओपन करा google play store मधून ही Download करू शकता ।

https://play.google.com/store/apps/details?id=com.cowinapp.app


➡️ एका मोबाईलवर नंबरवर एका कुटुंबातील चार सदस्यांची नोंदणी करता येते.

➡️  लहान मुले लसीकरणासाठी जवळच्या मान्यताप्राप्त केंद्रात देखील जाऊ शकतात. याबाबतचा निर्णय राज्य सरकारे घेतील.


-➡️  "15 ते 18 वयोगटातील मुलं 1 जानेवारीपासून CoWIN पोर्टलवर नोंदणीसाठी पात्र असतील. 




यासाठी कोविन पोर्टलमध्ये नोंदणीवेळी ओळखपत्रासाठी 10 वीचं विद्यार्थी ओळखपत्र सादर करता येणार आहे. कारण काही विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड किंवा इतर कुठलं ओळखपत्र नसू शकतं. त्यामुळं त्यांच्यासाठी ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे"


संमती पत्र



१५ ते १८ वयोगटातील लाभार्थ्यांसाठी कशी असेल कोविन सुविधा ?


1. ज्या मुलांचं वय हे १५ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक असेल तसेच ज्यांचं जन्म वर्ष २००७ किंवा त्यापूर्वीचं २ असेल ते सर्व लस घेण्यात पात्र असून त्यांना कोविन पोर्टलवर नोंदणी करता येईल.

2. कोविनवरील सध्याच्या अकाऊंटवरुन किंवा नव्यानं अकाउंट तयार करुन या लाभार्थ्यांना नोंदणी करता येईल. यासाठी त्यांना युनिक मोबाईल क्रमांक द्यावा लागेल. सध्याच्या सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी ही सोय उपलब्ध असेल.

3. या लाभार्थ्यांना थेट लसीकरण केंद्रावर जाऊनही फॅसिलिटी रजिस्ट्रेशन मोडद्वारे नोंदणी करता येईल.

4. लहान मुलांच्या लसीकरणासाठी ऑनलाइन किंवा ऑनसाईट नोंदणी करता येणार आहे.

5. १५ ते १८ वयोगटातील मुलांना केवळ कोव्हॅक्सिन लसंच देण्यात येणार आहे. 

3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांचं लसीकरण सुरु करण्यात येणार आहे

बूस्टर डोसही |Booster Dose 

देशात 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांचं लसीकरण सुरु करण्यात येणार आहे. तसेच 10 डिसेंबरपासून आरोग्य कर्मचारी आणि 60 वर्षांवरील नागरिकांसाठी बूस्टर डोसही (Booster Dose) सुरु करण्यात येणार आहे.

यासाठी या मुलांना १ जानेवारी २०२२ पासून COWIN पोर्टलवर नाव नोंदणी करता येणार आहे, CoWIN प्लॅटफॉर्मचे प्रमुख डॉ. आर. एस. शर्मा (Dr. R. S. Sharma) यांनी ही माहिती दिली.

लसींचा प्राधान्यक्रम काय असेल? कधी मिळणार बूस्टर डोस?

1. १५ ते १८ वयोगटातील मुलांना येत्या ३ जानेवारी २०२२ पासून लसीकरण सुरु होत आहे. या लाभार्थ्यांना केवळ लहान मुलांसाठी असलेली कोव्हॅक्सिनची लस देण्यात येणार आहे.

2. आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाइन वर्कर्सना येत्या १० जानेवारी २०२२ पासून बूस्टर डोस देण्यात येणार आहे. पण त्यांनी दुसरा डोस घेऊन ९ महिने (३९ आठवडे) पूर्ण झालेल्यांनाच हा बूस्टर डोस घेता येणार आहे.

3. आणि ६० वर्षांवरील नागरिक जे गंभीर आजारांनी ग्रस्त आहेत, अशांना १० जानेवारी २०२२ पासूनच बूस्टर डोस देण्यात येणार आहे. 

 या नागरिकांनी दुसरा डोस घेऊन ९ महिने (३९ आठवडे) पूर्ण झालेले असणं गरजेचं आहे.

बूस्टर डोससाठी कशी असेल कोविन सिस्टिम?


1. आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाइन वर्कर्स आणि ६० वर्षांवरील गंभीर आजार असलेले जे नागरिक बूस्टर डोससाठी पात्र आहेत त्यांना त्यांच्या सध्याच्या कोविन अकाउंटवरुनच बूस्टर डोस घेता येणार आहे.

2. कोविन सिस्टिममध्ये बूस्टर डोससाठी पात्र असलेल्या नागरिकांनी दुसरा डोस कोणत्या तारखेला घेतला आहे, त्यावरुनच त्यांना बूस्टर डोस घेता येणार आहे.

3. बूस्टर डोससाठी पात्र असलेल्या नागरिकांना दुसऱ्या डोसनंतर नंतर दिनांक मिळेल.

https://us.docworkspace.com/d/sIMe8w_oa1su8jgY
4. बूस्टर डोससाठी आणि थेट लसीकरण केंद्रावर नोंदणी करता येणार आहे.

5. बूस्टर डोस घेतल्यानंतर लाभार्थ्यांच्या लस प्रमाणपत्रावर त्याचा तसा स्पष्ट उल्लेख असणार आहे.


   लसीकरण केंद्र नाव पत्ता  व पालकांसाठी सूचना 

पालकांसाठी महत्वपूर्ण सूचना व मुलांच्या  लसी करण साठी मुंबई मध्ये कुठे केंद्र असणार आहे याची यादी खाली दिली आहे .
यादी Download करण्यसाठी खाली क्लिक करा





Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad