इयत्ता 5 वी व इयत्ता 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा प्रवेश फी शुल्क | Class 5th and Class 8th Scholarship Exam Entrance Fee
शिष्यवृत्ती परीक्षा प्रवेश शुल्क
इयत्ता ५ वी व इयत्ता 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा प्रवेश शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये दिनांक - 11 नोव्हेंबर 2021 च्या शासन निर्णयानुसार पासून वाढ करण्यात आलेली आहे. शैक्षणिक वर्ष 2021 2022 पासून इ. 5 वी व इ. 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा प्रवेश शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
पूर्वी सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी या इयत्तेकरिता घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेकरिता दिनांक २२.०७.२०१० च्या शासन निर्णयामधील प्रचलित अटी व शर्तीमध्ये दि. १५.११.२०१६ च्या शासन निर्णयान्वये सुधारणा केल्या आहेत. त्यानुसार बिगर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी प्रवेश शुल्क रु. १०/- वरुन रु.२०/ करण्यास तसेच परीक्षा शुल्क रु. ५०/- वरुन रु.६०/- करण्यास मान्यता देण्यात आली होती व मागासवर्गीय व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्रवेश शुल्क रु.१०/- वरुन रु.२०/- करण्यास मान्यता देण्यात आली होती.
शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आवेदनपत्रे भरणे, प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची छपाई, उत्तरपत्रिकाचे स्कॅनिंग, निकाल जाहीर करणे. गुणवत्ता याद्या तयार करणे इत्यादी कामकाजासाठी संगणकीय प्रणालीचा वापर करण्यात येतो.सद्यस्थितीत वाढलेल्या महागाई मुळे प्रचलित दरामध्ये सुधारणा करुन नवीन दर निश्चित करण्याबाबत शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. यानुसार प्रवर्गनिहाय प्रवेश शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये वाढ करण्यात आली आहे.
परीक्षा प्रवेश शुल्क
इयत्ता ५ वी इयत्ता ८ वी या परीक्षेच्या प्रवेश शुल्कं व परिक्षा शुल्कामध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यास शासन मान्यता दिली आहे .
सुधारीत शुल्क - इयत्ता - ५ वी .
शिष्यवृत्ती परीक्षा फी - प्रवेश शुल्क -
बिगर मागास विद्यार्थ्यांसाठी 50 रु
मागास व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 50 रु
सुधारीत शुल्क - इयत्ता - ८ वी .
शिष्यवृत्ती परीक्षा फी - प्रवेश शुल्क -
बिगर मागास विद्यार्थ्यांसाठी १५० रु
मागास व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ७५ रु
शिष्यवृत्ती परीक्षा सराव पेपर साठी येथे क्लीक करा.⬇️
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा सराव पेपर PDF 2022
शासन निर्णय