Type Here to Get Search Results !

वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण २०२१-२२ करिता पात्र शिक्षकांची प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी | Registration for training of eligible teachers for Senior pay and Selected Class Training 2021-22


वरिष्ठ वेतन श्रेणी  व निवडश्रेणी प्रशिक्षण २०२१-२२ करिता पात्र शिक्षकांची प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी | Registration for training of eligible teachers for Senior pay grade and Selected Class Training 2021-22  





वरिष्ठ  वेतन श्रेणी  व निवडश्रेणी प्रशिक्षणाचे नियोजन

 वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणाचे नियोजन व संनियंत्रणाची जबाबदारी SCRT, Maharashtra, Pune (राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद) यांचेकडे सोपविण्यात आलेली आहे. सदर वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नोंदणीकरिता परिषदेमार्फत पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे. या पोर्टल मार्फत शिक्षक वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण घेण्यात येणार आहे.

 प्रशिक्षण  करिता शिक्षक Online नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी कशी करावी व त्याविषयीची संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण याविषयीची माहिती देणारे पत्रक SCRT, Maharashtra, Pune (राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद) यांचेकडून  आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण २०२१-२२ करिता पात्र शिक्षकांची प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी

 प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी साठी शेवट ची  दिनांक ०५/०१/२०२२ 

शासन निर्णय 

शासन निर्णय प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नोंदणीकरिता वाढीव मुदत खालील संकेतस्थळा वर मिळेल .

https://training.scertmaha.ac.in/

बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग निर्णय ⬇️

https://us.docworkspace.com/d/sIIe8w_oa_MOljgY


वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण २०२१-२२ करिता पात्र शिक्षकांची प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी 

 सदर प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नोंदणीकरिता परिषदेमार्फत पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे. सदरील पोर्टलवर प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय या चार गटातील पात्र शिक्षक/ मुख्याध्यापक/प्राध्यापक/प्राचार्य यांनी नोंदणी करावयाची आहे. यासंदर्भातील सूचना पुढीलप्रमाणे आहेत.


१.  नोंदणी करणेसाठी परिषदेच्या https://training.scertmaha.ac.in

या  स्थळास भेट द्यावी.


२. दि. ३१ डिसेंबर २०२१ रोजी १२ वर्षे सेवा पूर्ण होणारे किंवा त्यापूर्वीच १२ वर्षे सेवा पूर्ण झालेले शिक्षक वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणीस पात्र ठरतील.


३. दि. ३१ डिसेंबर २०२१ रोजी २४ वर्षे सेवा पूर्ण होणारे किंवा त्यापूर्वीच २४ वर्षे सेवा पूर्ण झालेले शिक्षक निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी पात्र ठरतील.

४. वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण नोदणी दिनांक २३ नोव्हेंबर, २०२१ ते ०५ डिसेंबर, २०२२ पर्यंत सुरू राहील. 

 सदरचे प्रशिक्षण हे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. यावावत नोंदणीनंतर पुढील सूचना संबंधितांना ई-मेलद्वारे देण्यात येतील.


६. प्रस्तुत वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणासाठी पुढीलप्रमाणे ०४ गट करण्यात आलेले आहेत- गट क्र. १ प्राथमिक गट, गट क्र. २ माध्यमिक गट, गट क्र. ३- उच्च माध्यमिक गट, गट क्र. ४ अध्यापक विद्यालय गट.


७. वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणासाठी नोंदणी करतेवेळी शिक्षकाने स्वतःचा शालार्थ ID, शाळेचा UDISE क्रमांक इत्यादी माहिती सोबत ठेवावी.


८. नोंदणी करत असताना नोंदणीसाठीचा आवश्यक OTP आपल्या मोबाईल क्रमांकावर तात्काळ येणार असल्याने आपला वापरात असणारा मोबाईल सोबत ठेवावा.

Registration for training of eligible teachers for Senior pay grade  and Selected Class Training 2021-22  

९. प्रशिक्षणार्थी यांच्याकडे स्वतःचा वापरात असणारा ई-मेल आय. डी. असणे आवश्यक आहे. सदरच्या प्रशिक्षणाचे पुढील सर्व पत्रव्यवहार व सूचना या नोंदणी करत असताना नोंदविलेल्या ई-मेल आय. डी. वर पाठविण्यात येतील.

१०.वरिष्ठ व निवडश्रेणी या प्रशिक्षणासाठी जिल्हा नोडल अधिकारी म्हणून संबंधित जिल्ह्याचे प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था हे असतील तर मुंबई शहर व उपनगर या जिल्ह्यांसाठी उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई हे जिल्हा नोडल अधिकारी असतील.


११. वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण शुल्क भरणा करणेसाठी प्रशिक्षणार्थी यांचेकडे स्वतःच्या बँक खात्याचा सर्व तपशील इंटरनेट बँकिंग/ क्रेडीट / डेबिट कार्ड / UPI payment ने सदर प्रशिक्षण शुल्क ज्या बँक खात्यावरून भरणार आहे त्याचा आवश्यक तपशील सोबत ठेवावा. उदा. युझर आयडी, इ.

प्रशिक्षण शुल्क

प्रशिक्षण शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक आहे. प्रशिक्षणासाठी आवश्यक सर्व माहिती अचूक पद्धतीने भरली आहे याची खातरजमा झाल्यानंतरच प्रशिक्षण शुल्क ऑनलाइन अदा करावे. एकदा जमा केलेले शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

शुल्क ₹२०००प्रती प्रशिक्षणार्थी

शिक्षकांसाठी नोंदणी

वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण २०२१-२२ करिता पात्र शिक्षकांची प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी सुरू करण्यासाठी खालील बटणावर प्रेस करा .

वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षण नोंदणी

 निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणी


वरिष्ठश्रेणी-व-निवडश्रेणी-प्रशिक्षण-नाव नोंदणी करिता महत्वाचा मार्गदर्शन व्हिडीओ खाली दिले ते पाहावे.

https://youtu.be/muiLjkAzXkA


पात्रता निकष काय असणार ? 

१. १२ वर्षाची अर्हताकारी सेवा. या कामासाठी नियुक्त केलेल्या समितीला उमेदवारांचे कामकाज समाधानकारक वाटणे.

२. सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे अथवा त्याने/तिने विभागाने

अ)  विभागाने विहित केलेले किमान तीन आठवड्याचे विहित केलेले किमान दहा दिवसांचे किंवा घड्याळी ५० तासांचे ऑनलाईन सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे.

ब) शासन विहित करील असे सेवांतर्गत प्रशिक्षण त्याने तिने पूर्ण केले असले पाहिजे अथवा त्याने/तिने विभागाने विहित केलेले किमान दहा दिवसांचे सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे गरजेचे.

प्रशिक्षणाची उद्दिष्ट्ये

1. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० बाबत जाणीव जागृती करणे.

2. मानवी हक्क सजगता, बहुसांस्कृतिकत्व व घटनात्मक मूल्यांची बांधिलकी जपण्यासाठी सबळ करणे.

३. एकविसाव्या शतकातील कौशल्य छात्राध्यापक/ विद्यार्थी यांमध्ये रुजविण्यासाठी सक्षम करणे.

४. शिक्षक शिक्षण प्रक्रियेमध्ये सुधार करण्यासाठी आवश्यक ज्ञान, कौशल्य, वृत्ती बदल आत्मसात होण्यासाठी सक्षम करणे.

५ .जागतिकीकरण, आधुनिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्रात करावयाचे बदल व त्याचा शैक्षणिक गुणवत्तेवर होणारा परिणाम.

६. नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून स्व विकास, छात्राध्यापक विकास, संस्था विकास होण्यासाठी त्याचा उपयोग करण्यास आत्मनिर्भर करणे. शारीरिक व मानसिक स्वास्थ संवर्धनाचे मार्ग समजून घेऊन त्यानुसार कृती करण्यास सक्षम करणे. 







Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad