महत्त्वपूर्ण प्रश्न विषय - मराठी संपूर्ण कविता गद्य |Ssc Important Question 2021 22 Subject Marathi All Poem
महत्वपूर्ण प्रश्न कविता (toc)
कविता
एस. एस. सी. परीक्षेत या कवितेवर आकलन कृती चे खालील प्रकारे प्रश्न विचारले जातात.
कविता - संतवाणी
१) माता धावून जाते - जेव्हा बाळ आगीत पडते.
२) परमेश्वराचे दास - संत नामदेव
३)मेघाला विनवणी करणारा - चातक
अंकीला मी दास तुझा
महत्त्वपूर्ण प्रश्न .
१) कवितेचे कवी - संत नामदेव,
(२) कवितेचा विषय -
देवरूपी मातेने बाळाचा म्हणजेच आपला सांभाळ मायेने करावा, अशी विनवणी करणारा हा अभंग आहे.
(३) कवितेतील पुढील दोन ओळींचा सरळ अर्थ
'सर्वेचि झेंपावें पक्षिणी पिलीं पडतांचि धरणीं ।।
भुकेलें वत्सरावें। धेनु हुंबरत धांवे ।।
सरळ अर्थ पिल्लू झाडावरून खाली पडताच त्याला वाचवण्यासाठी पक्षिणी जिवाच्या आकांताने खाली झेप घेते. भुकेले वासरू पाहून गाय हंबरत त्याच्याकडे धावते. यातून पशु-पक्ष्यांच्या हृदयातील ममता दर्शवली आहे.
(४) कवितेतून मिळणारा संदेश -
भगवंत आई प्रमाणे आपला सांभाळ करील, असा दृढ विश्वास संत नामदेव या अभंगातून व्यक्त करतात.
(५) कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे -
देवा ने ही आईप्रमाणे आपल्यावर मायेची नित्य पखरण करावी, हा विचारच -मनाला भावला. म्हणूनच मला हा अभंग खूप आवडला.
(६) प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ (चार शब्द)
(i) धेनू = गाय (ii) धरणी घरती
(ii) काज = काम
(iv) अग्नी = आग.
योगी सर्वकाळ सुखदाता
१) योगी पुरुषाचे चार वैशिष्ट्ये
➡️ सर्वांसाठी मृदू असतात .
सर्वकाळ सुखदाता देणारे.
स्वानंद तृप्ती देतात.
सर्व इंद्रियांना शांत करतात
२) चंद्र किरण घेऊन जगणारा पक्षी - चकोर
३) पिलांना सुरक्षितता देणारे - पक्षिणीचे पंख.
४) चिरकाल टिकणारा आनंद - स्वानंद तृप्ती
५) व्यक्तीला सदैव सुख देणारा - योगी
६) योगी पुरुष पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे
➡️ पाण्याने माणसाच्या पोटाची भूक भागते परंतु योगी पुरुषाच्या श्रवण कीर्तनाने माणसांचे मन सदैव तृप्त राहते.
पाण्याची गोडी फक्त जीभे पुरती मर्यादित आहे परंतु योगी पुरुषांच्या आत्मज्ञानाची गोडी सर्व इंद्रियांना शांत करते.
दोन दिवस
१) प्रस्तुत कवितेचे कवी - नारायण सुर्वे.
२) प्रस्तुत कवितेचा विषय -
→ कामगाराच्या आयुष्यातील परिस्थितीचे वर्णन.
(३) प्रस्तुत कवितेतील दोन ओळींचा सरळ अर्थ
शेकडो वेळा चंद्र आला; तारे फुलले, रात्र धुंद झाली; भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली.
अनेक वेळा चंद्र उगवला. चांदणे पडले. तारे चमचमले, काही रात्री आनंदमय गेल्या. बाकीचे सर्व आयुष्य 'भाकरीचा चंद्र शोधण्यात म्हणजे भूक शमवण्यात व उदरनिर्वाह करण्यात नासून गेले.
४) कवितेतून मिळणारा संदेश जीवन -
जीवन सकारात्मक जगण्याची ऊर्जा ही कविता देते, तसेच मानवी निर्धार व आशावाद हे तत्त्व मनावर बिंबवले जाते.
(५) कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणे -
कामगारविश्वाचे दाहक चित्रण केल्यामुळे कविता मनाला भिडते.
(६) प्रस्तुत कवितेतील दिलेल्या शब्दांचे अर्थ लिहिणे .
(i) जिंदगी (ii) गहाण (iii) दारिद्र्य (iv) रात्र.
उत्तरे : (1) जिंदगी = आयुष्य (ii) गहाण = तारण (iii) दारिद्र्य = दैन्य (iv) रात्र = रजनी.
२) कवीचे सर्वस्व असलेली गोष्ट - हात
३) दोन दिवस यात गेले - दोन दिवस दुःखात , वाट पाहण्यात .
४) कलम केलेले हात - या हातांनी कष्ट उपसले .कधी अभिमानाने उंचावले.
कविता : स्वप्न करू साकार
१) प्रस्तुत कवितेचे कवी / कवयित्री : किशोर पाठक
२) प्रस्तुत कवितेचा विषय : देशाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न या कवितेत रेखाटले आहे
३) प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश : कर्तव्याची जाणीव करून देणारा संदेश मिळतो
४) प्रस्तुत कविता आवडण्याचे व न आवडण्याचे कारण :
कारण या कवितेमध्ये कृषी संस्कृती श्रमप्रतिष्ठा एकात्मतेचे सामर्थ्य या मूल्यांचा पुरस्कार केला आहे नवीन पिढीसाठी नवी स्वप्ने साकार करण्याचा विचार मांडणारी ही कविता मला आवडते.
५)प्रस्तुत कवितेतील खालील ओळींचा अर्थ लिहा :
या देशाच्या मातीवर अमुचा रे अधिकार नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न करू साकार
अर्थ: पहिल्या ओळी मध्ये भारतीयांचा मा ती वरचा अधिकार सांगितला आहे तर दुसऱ्या ओळीमध्ये नव्या पिढीचे व नव्या युगाचे स्वप्न साकार करणे या कर्तव्याची जाणीव करून दिली आहे.
६) कवितेतील पुढील चार शब्दांचे अर्थ लिहा :
अ) तन : शरीर ब) हस्त : हात क) धन : दौलत ड)विभव : वैभव
कविता : हिरवंगार झाडासारखं
१) प्रस्तुत कवितेचे कवी / कवयित्री : जॉर्ज लोपीस
२) प्रस्तुत कवितेचा विषय : या माणसाने आपले आयुष्य झाडासारखे जगावे.
३) प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश : झाडाचे महत्व झाडाचे सहनशीलता परोपकारी वृत्ती संकटात ठाम उभी राहण्याची जिद्द या गुणांची माहिती या कवितेतून अधोरेखित झाली आहे.
४) प्रस्तुत कविता आवडण्याचे व न आवडण्याचे कारण :
झाडाची परोपकारी वृत्ती दानशूरता आनंद वृत्ती हे गुण मानवाने आत्मसात करावेत असे ही कविता सांगते म्हणून ही कविता आवडते.
५) प्रस्तुत कवितेतील खालील ओळींचा अर्थ लिहा :
( १) झाड बसते ध्यानस्थ ऋषीसारखं मौन व्रत धारण करून तपश्चर्या करत :
अर्थ : एखादा ऋषी-मुनी जसा मोर घेऊन ध्यानस्थ पणे तपश्चर्या करीत बसतो त्याप्रमाणे झाडी अबोल होऊन ध्यानस्थ बसते.
६) कवितेतील पुढील चार शब्दांचे अर्थ लिहा .
अ) दव :दही वराचे थेंब ब) बाहू : हात
क) कवेत : कुशीत ड) वस्त्र : कपडे
कविता : रंग मजेचे रंग उद्याचे
१) प्रस्तुत कवितेचे कवी / कवयित्री : अंजली कुलकर्णी
२) प्रस्तुत कवितेचा विषय : या कवितेमधून संगणक युगाची निसर्गाची दौलत जोपासायला हवी हे सांगितले आहे.
३) प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश : मानवाने पर्यावरणाची जोपासना केली पाहिजे. निसर्गाची रममाण होऊन जगण्यातच खरा आनंद आहे हा मौलिक संदेश ही कविता देते.
४) प्रस्तुत कविता आवडण्याचे व न आवडण्याचे कारण :
पर्यावरणाची होणारी हानी थांबून पर्यावरणाचे रक्षण आपण केले पाहिजे तरच निसर्गाच्या विविध मनोहारी आविष्कारात जगण्याचा मनस्वी आनंद आपणास मिळू शकेल.
५) प्रस्तुत कवितेतील खालील ओळींचा अर्थ लिहा :
( १) फुलफुलांचे दाट ताटवे,जिथे पोचते दृष्टी रंग मजेचे, रंग उद्याचे, जपून ठेवू सृष्टी :
अर्थ : निसर्गामध्ये जिथे आपली नजर जाईल तिथपर्यंत वेगवेगळ्या फुलांचे गर्द गुच्छ ड हाळीला लगडलेले पाहायला मिळतील
६) कवितेतील पुढील चार शब्दांचे अर्थ लिहा :
अ) वृष्टी : वर्षाव ब) अनोखी : वेगळी
क) तुष्टी :समाधान ड) : दाट : गर्द
कविता : औक्षण
१) प्रस्तुत कवितेचे कवी / कवयित्री : इंदिरा संत
२) प्रस्तुत कवितेचा विषय : देशाचे रक्षण करणाऱ्या सीमेवरील जवान विषयी कृतज्ञता व्यक्त करणारी ही कविता
३) प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश : जवानांचे शौर्य गाथे पुढे नतमस्तक होण्याची शिकवण हि कविता सहज पणे देते.
४) प्रस्तुत कविता आवडण्याचे व न आवडण्याचे कारण :
कारण - सैनिक देशाची रक्षा करतो अशा सर्व सैनिकांचे भले व्हावे यासाठी त्यांचे औक्षण केले जाते .त्याला चिरंजीवी त्वाचा आशीर्वाद दिला जातो हा विचार माझ्या मनाला आवडतो म्हणून ही कविता मला आवडते.
५) कवितेतील पुढील चार शब्दांचे अर्थ लिहा :
अ) द्रव्य - पैसा ब) सामर्थ्य - बळ क) जिद्द - हिम्मत
ड) राखण - रक्षण