Type Here to Get Search Results !

उपयोजित लेखन निबंध लेखन | upyojit lekhanNibandh Lekhan

 

SSC EXAM 2022 Hall Ticket 


कक्षा दहावी मार्च परीक्षा Hall Ticket download कर ने के लिए और देखने के लिए निम्न blue कलर के  जो अक्षर हैं उनके upar क्लिक कर के अपना Hall Ticket देखीये .⬇️


 दहावी मार्च परीक्षा 2022 Hall Ticket

उपयोजित लेखन निबंध लेखन | upyojit lekhanNibandh Lekhan

निबंध लेखन (toc)

१. निबंधलेखन


विदयार्थी मित्रांनो, तुमच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्रमांक ५ हा निबंधलेखन असतो. दिलेल्या चार विषयांपैकी एका विषयावर तुम्हाला २५० ते ३०० शब्द निबंध लिहायचा असतो. निबंध लेखनासाठी १० गुण असतात. याची अधिक माहिती घेऊया.

● प्रास्ताविक भाषा विषयाच्या अभ्यासात निबंधलेखन हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. निबंधलेखन ही आनंददायी प्रक्रिया आहे. निबंधलेखनातून आपले व्यक्तिमत्त्व प्रतिबिंबित होते. आपले विचार, शब्दसंपत्ती, निरीक्षणक्षमता, लेखनशैली, प्रवाहिता इत्यादी गोष्टींचे दर्शन घडते. परीक्षेला विचारले जाणारे निबंधाचे विषय पाहिले असता असे लक्षात येते की, ते सर्व आपल्या अनुभवविश्वातले असतात. दैनंदिन जीवनाशी निगडित आणि पाठयपुस्तकातील पाठयविषयांशी संबंधित असतात.

 एखादा विषय निबंधलेखनाला दिला की, त्याच्याबद्दलचे अनेक विचार आपल्या मनात गर्दी करतात. पण हे सुचणारे विचार खूप विस्कळीत असतात. ते आपण एकत्रित करतो. फुलारी ज्याप्रमाणे बागेत मिळतील ती फुले प्रथम गोळा करतो. नंतर त्यातील चांगली, सुंदर आणि सुवासिक फुले तो निवडून काढतो. शेवटी ही निवडलेली फुले दोऱ्याने आकर्षक रितीने गुंफून त्यांचा एक सुंदर हार बनवितो. 

निबंधलेखनाचे काम काहीसे अशाच प्रकारचे आहे. एखाद्या विषयावर निबंध लिहिताना लेखकाला जी जी विचारपुष्पे सुचतात ती त्याने प्रथम जमा करावीत. नंतर त्यातील सुयोग्य व आकर्षक विचार निवडून काढावेत. शेवटी सुंदर शब्दांनी हे निवडलेले विचार एकत्र आणि सुसंगत रीतीने गुंफावेत . 

निबंध लेखनाची तयारी कशी कराल ?


०१. निबंध लेखनासाठी दिलेला विषय शक्यतो विद्यार्थ्याच्या भावविश्वाशी निगडीत असतो. मात्र माहिती वेळेवर आठवत नाही. त्यासाठी विद्यार्थ्यांनी विविध विषयांचे मुद्दे लिहून ठेवावेत. त्यांचे स्मरण करावे. मुद्यांची गुंफण करावी.

०२. निबंधलेखनाचे कौशल्य प्राप्त करण्याचा एक प्रमुख स्रोत म्हणजे वाचन. वृत्तपत्रे, साप्ताहिके, मासिके, पाठ्यपुस्तकेतर पुस्तके यांचे नियमित वाचन हवे नवे जग, नवे जीवन, नव्या घटना यांची माहिती यामुळे होते. त्यांची टीपणे निबंधलेखनात कामी येतात. मात्र अलीकडे विद्यार्थी वाचनात कमी पडतात.

०३. माहिती मिळविण्यासाठी मुद्दाम वेळ काढावा लागतो असे नाही. कान व डोळे उघडे ठेवून वावरत असलो की पुष्कळ माहिती आपोआप जमते. आपल्या भोवताली जागृतपणे लक्ष ठेवा कितीतरी विषयांच्या निबंधाची तयारी आपोआप होऊन जाईल. जसे प्रवास, समारंभ वा खेळविषयक - निबंध.

०४. भोवतालची माणसे, त्यांचे स्वभाव, त्यांच्या लकबी, भोवतालचा निसर्ग यांचे निरीक्षण आवश्यक आहे. त्याचा उपयोग निबंधलेखनात होतो.

.०५. पाठयपुस्तकातून चांगल्या कल्पना, विचार, वर्णन, सुभाषिते, चिंतन यांची टीपणे काढून ती कोणत्या निबंधविषयाला वापरता येतील हे नोंदवून ठेवायला हवे. याबाबतीत मात्र विद्यार्थी कमी पडतात. यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्याना पोत्साहित करावे.

०६. श्रेष्ठ लेखकांच्या चांगल्या वाक्यांचे जसेच्या तसे अनुकरण करण्यास काहीच हरकत नाही.

०७. उपयुक्त वाक्प्रचार व म्हणी, काव्यपंक्ती, उदाहरणे दाखले यांचा संग्रह विद्यार्थ्यांनी करावा. त्यांचा वापर निबंधलेखनात योग्य परिणाम साधण्यासाठी करायला हवा.

निबंधाचे पंचप्राण निबंधाचे पंचप्राण पुढीलप्रमाणे :


०१. विचार.

एखाद्या विषयासंबंधी आठवण्याचा प्रयत्न करायचा. आपल्या अनुभवातून शोधाशोध करायची व त्याची नीट मांडणी करायची. यालाच निबंधाचा विचार असे म्हणतात.

०२. आकर्षक सुरूवात व शेवट -

आकर्षक सुरूवात करता आली तर निबंधलेखन अर्धे यशस्वी झाले असे समजावे. ते तुमच्या वाचनावर, अनुभवावर व निरीक्षणावर अवलंबून असते. निबंधलेखनाच सुरूवात एखादी काव्यपंक्ती, एखादा प्रसंग, सुविचार, उदाहरण किंवा अनुभव कथन करून करावी. ज्यामुळे त्यात आकर्षकता येते, प्रभाव पडतो. निबंधाचा शेवट अतिशय परिणामकारक असावा. विषयानुरूप शेवटीही एखादी काव्यपंक्ती, सुविचार व बोधवाक्य वापरता येऊ शकते. मात्र विषयांतर होणार

नाही हे पाहणे आवश्यक ठरते.

०३. मुद्द्यांची मांडणी व विस्तार -

विषयानुरूप मुद्दे ठरवावेत. त्यांचा क्रम लावावा. ते एकत्र गुंफावेत. त्यात सुसूत्रता असावी. विषयमांडणीत ४ ते ५ परिच्छेद असावेत. प्रत्येक मुद्दा मोजक्या शब्दांत स्पष्ट व्हावा. सुसूत्रता व प्रवाहिता हे विस्तारात महत्त्वाचे ठरतात.

०४. भाषाशैली

तुमची भाषा, तुमच्या तोंडी सहजपणे येणारे शब्द, वाक्यरचना, तुमच्या स्वतःच्या कल्पना वगैरेंनी तुमची शैली बनत असते. साधेपणा, स्पष्टता हे मायेचे सौंदर्य आहे. आटोपशीर, सुटसुटीत सोपी बाक्ये, नेमका अर्थ व्यक्त करणारे शब्द हे तुमची शैली दर्शवितात. यासाठी तुमच्याकडे शब्दसंपत्ती हवी. विविध प्रकारच्या वाक्यरचनांचा अभ्यास हवा. तुमच्या खास वेगळ्या लेखनशैलीमुळे तुमच्या निबंधाला जिवंतपणा येतो.

०५. निबंधाचे अलंकार -

माणूस सुंदर दिसण्यासाठी सोन्याचांदीचे दागिने चांगले कपडे वापरतो, नटतो. त्याचप्रमाणे भाषेलाही तिच्या अलंकाराने नटवले पाहिजे. तर निबंध सुंदर होईल. नवे नवे शब्द, अर्थपूर्ण सामासिक शब्द, विविध तऱ्हेच्या वाक्यरचना, म्हणी,

वाक्प्रचार, सुभाषिते आणि अलंकार हे निबंधाचे दागिने आहेत. स्पर्श, नाव,

रस, रंग व रूप यांनी भाषेचे सौदर्य वाढते.

निबंधाचे प्रकार -


निबंधाच्या प्रकारापैकी इयत्ता १० वी मध्ये आपल्याला खालील चार प्रकारचे

निबंध अभ्यासायचे आहेत -

०१. वर्णनात्मक निबंध

०२. चरित्रात्मक निबंध

०३. कल्पनात्मक निबंध आत्मकथनात्मक निबंध

०४. वर्णनात्मक निबंध


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad