12 जानेवारी राष्ट्रीय युवा दिवस| स्वामी विवेकानंद जयंती | 12 jan Rashtriya Yuva | Rashtriya yuva Divas bhashan
Rashtriya yuva Divas bhashan(toc)
“राष्ट्रीय युवा दिवस”
प्रत्येक देश हा युवकांनी समृद्ध बनतो. नवयुवा शक्ती ही जर योग्य व चांगल्या मार्गाने किंवा दिशेने प्रवाहित झाली तर आपला देश नेहमी प्रगतीपथावर निरंतर अग्रेसर होत असतो. या संकल्पनेची आठवण आणि प्रत्येक युवक देशाच्या प्रती अभिमानाने देश सेवा करण्यास नेहमी प्रवृत्त व्हावा यासाठी भारतात दर वर्षी १२ जानेवारी या दिवशी म्हणजेच स्वामी विवेकानंद यांच्या जन्मदिन “राष्ट्रीय युवा दिवस” म्हणून साजरा केला जातो .
संपूर्ण भारतातील व परदेशातील नव तरुण वर्ग हा त्यांनी दाखवलेल्या समाज उभारणीच्या आणि राष्ट्रहिताच्या कार्यासाठी सदैव प्रेरित झाला होता. म्हणून त्यांचे एक वाक्य जे नेहमी सर्वांना बळ देते ते म्हणजे
“ ज्या दिवशी तुम्हाला एकही समस्या आली नाही तेव्हा तुम्ही समजू शकतात की तुम्ही चुकीच्या मार्गावर चालत आहात ” - स्वामी विवेकानंद
Rashtriya yuva Din Divas राष्ट्रीय युवा दिन |
स्वामी विवेकानंद परिचय
नाव (खरे नाव)- नरेंद्र विश्वनाथ दत्त.
जन्म - दिनांक १२ जानेवारी १८६३ रोजी झाला.
आईचे नाव - भुवनेश्वरी देवी
वडीलांचे नाव - विश्वनाथ दत्त
गुरू - रामकृष्ण परमहंसाना
राष्ट्रीय युवक दिनाचे महत्त्व Rashtriya yuva Divas
देशाची युवा शक्ती एका महापुरुषाकडे पाहून स्वतःचा आदर्श ठरवेल तर तसे व्यक्तीतत्व स्वामी विवेकानंदांव्यतिरिक्त दुसरा कोणी नसेल.
भारतीतील धर्म, योग, ध्यान, अध्यात्म, आणि मानवी विकास यांचा प्रसार करायचा असेल तर त्यासाठी नव तरुण मुलांनी पुढे आले पाहिजेत त्यांनी स्वामी विवेकानंद यांचे विचार अंगिकारले पाहिजेत.
स्वामी विवेकानंद यांचा आदर्श समोर ठेऊन अंधश्रद्धा न पाळता, व्यसन तसेच क्षणिक सुखाच्या आहारी न जाता भारतीय युवक देशसेवेसाठी झटला पाहिजे अशी भावना हा दिवस साजरा करण्यामागची आहे.