राजमाता जिजाऊ भाषण | 12 जानेवारी राजमाता जिजाऊ जन्म दिवस | Rajmata Jijau speech | January 12 is Queen Mother Jijau's birthday
राजमाता जिजाऊ भाषण(toc)
राजमाता जिजाऊ
राजमाता जिजाऊ यांचा विषय या व्यासपीठाला मिळणं हे आपल्या सर्वांचं सौभाग्य आहे आणि मी स्वतःला भाग्यवान समजते की आजच्या या भाषण स्पर्धेमुळे मला राजमाता जिजाऊ यांचाबद्दल बोलण्याची संधी मिळतेय. मित्रहो, राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल कुणाला काही माहीत नाही, असे कधीच होऊ शकत नाही.
ज्यांनी आपल्या स्वराज्याचे स्वप्न बघितले आणि फक्त बघितलेच नाही तर ते सत्यात देखील उतरविले, त्या म्हणजे आपल्या माँसाहेब जिजाऊ. भारतीय पुराणांमध्ये आदिशक्तीचा उल्लेख हा केलेला दिसतो. या आदिशक्तीचे दर्शन सर्व जगाला राजमाता जिजाऊंच्या रूपाने घडले.
महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलेली पहार काढून ज्या माऊलीने गुलामगिरीच्या छाताडावर प्रहार केला, त्या राष्ट्रमाता, विश्वमाता, राजमाता माँसाहेब जिजाऊ
यांना मानाचा मुजरा ॥
राजमाता जिजाऊ यांचा जन्म
आई राजमाता जिजाऊ यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील. त्यांचे वडील लखुजीराव जाधव हे देवगिरी येथील यादव घराण्याचे वंशज होते. १२ जानेवारी इ.स. १५९८ मध्ये म्हाळसाबाई उर्फ गिरीजाबाई यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला.
स्वराज्याचा जिने
घडविला विधाता
धन्य ती स्वराज्य
जननी जिजामाता ॥
राजमाता जिजाऊ |
छत्रपती शिवाजी महाराज जन्म
19 फेब्रुवारी 1630 ला शिवनेरी गडावर सुर्यास्ताच्या समयाला जिजामाता यांना पुत्ररत्न प्राप्त झाले .छत्रपती शिवाजी महाराज...
छत्रपती शिवराय लहानाचे मोठे आपल्या आईच्या छत्रछायेखाली झाले. त्याची संपुर्ण जवाबदारी त्यांनी स्वतः उचलली. त्यांच्यावर अतिशय उत्तम संस्कार करून त्यांना घडवलं. शिवाजी महाराजांना कर्तृत्ववान योध्यांच्या गोष्टी सांगणे, राम कृष्णाच्या, बलाढ्य आणि पराक्रमी भिम अर्जुनाच्या गोष्टी सांगुन
त्यांच्यावर संस्कार करीत होत्या व शस्त्रविद्येत त्यांना निपुण करतांना बारकाईने लक्ष ठेवत होत्या.
जिजाऊ तुम्ही नसता तर,
नसते झाले शिवराय नी शंभू छावा...!
जिजाऊ तुम्ही नसता तर,
नसता मिळाला स्वराज्य ठेवा...!
जिजाऊ तुम्ही नसता तर,
नसते लढले मावळे...!
जिजाऊ तुम्ही नसता तर,
नसते दिसले विजयाचे सोहळे...!
संस्कार -
राजमाता जिजाऊ यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांचा वर संस्कार
शिवाजी महाराजांवर संस्कार करत असतांना त्यांनी त्यांना कर्तव्याबरोबरच राजनिती देखील शिकवली. न्याय करतांना समान न्याय करावा आणि अपराध करणाऱ्याला कठोरात कठोर शासन करतांना देखील तयार असावे हे संस्कार जिजामातेने महाराजांवर बिंबवले. मोठया मोहिमांवर जेव्हा शिवराय जात तेव्हां राज्यकारभारावर जिजामाता स्वतः लक्ष ठेवत.
"इतिहासा!
तू वळूनी पाहती पाठीमागे जरा,
झुकवूनी मस्तक करशील
त्यांना मानाचा मुजरा
" जय जिजाऊ || जय शिवराय ||