14 जानेवारी नामांतर दिन| डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ January 14 Naming Day | Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University
नामांतर दिन -- एक ऐतिहासिक आंदोलन
नामांतराचे आंदोलन म्हणजे आंबेडकरवाद्यांच्या अस्मिता,शौर्य,लढववृत्ती आणि बाणेदारपणाचा इतिहास आहे.
या यशस्वी आंदोलनाच्या फलश्रुतीबद्दल एका आंबेडकरी भीमशाहिराने आपल्या गीतात म्हंटले आहे ,
' सोन्या-मोत्याची ती अक्षर-बाबासाहेब आंबेडकर,हृदयाचा घेती ठाव !
काय खुलुनी दिसतंय राव,या कमानीवरती नावं !!
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९५० मध्ये मिलिंद महाविद्यालयाची स्थापना करून शैक्षणिकदृष्टया मागासलेल्या मराठवाड्यात उच्चशिक्षणाची सर्वप्रथम सुरुवात केली.मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी,हा त्या मागील बाबासाहेबांचा उदात्त हेतू होता.आणि हा हेतू साध्य होऊन मराठवाड्यात बाबासाहेबांनी ज्ञानगंगा आणून,लाखो विद्यार्थ्यांना शिक्षित करून त्यांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे शैक्षणिक क्षेत्रातील अतुल्य योगदान लक्षात घेवून त्यांच्या कार्यप्रति कृतज्ञता म्हणून महाराष्ट्र विधानसभेत २७ जुलै १९७८ रोजी मराठवाडा विद्यापीठाचे ' डॉ.बाबासाहे आंबेडकर विद्यापीठ ' असे नामांतर करण्याचा ठरावं पारित करण्यात आला.
नामांतराला प्रखर विरोध
सामाजिक परिवर्तनाची ही एक नवीन सुरुवात होती.परंतु सवर्णांनी या नामांतराला प्रखर विरोध केला . यातून संपूर्ण मराठवाड्यात नामांतराचे समर्थक दलित आणि नामांतर विरोधक सवर्ण असा संघर्ष निर्माण झाला.नामांतराच्या समर्थनार्थ आंबेडकरवादी जनता रस्त्यावर उतरली. दलित पँथरचा या आंदोलनातील आक्रमक सहभाग ऐतिहासिक ठरला.नामांतराच्या आंदोलनातून अनेक आंबेडकरी नेत्यांचा उदय झाला.दलितां सोबत पुरोगामी विचाराच्या सर्वजातीय कार्यकर्त्या, नेत्यांच्या सहभागातून या आंदोलनास व्यापकता आली.महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन तर प्रखर आंदोलने झालीच या शिवाय आग्रा,दिल्ली,बंगलोर,हैद्राबाद येथे ही नामांतरासाठी आंदोलने झाली,मोर्चे निघाले.
नामांतरासाठी बलिदान देणारे शूर वीर
पोचिराम कांबळे , गौतम वाघमारे,जनार्धन मवाडे,गोविंद भुरेवार,दिलीप रामटेके,चंदर कांबळे,नारायण गायकवाड,शरद पाटोळे, रोशन बोरकर,प्रतिभा तायडे,सुहानी बनसोडे यांच्यासारख्या लढवय्या असंख्य आंबेडकरवाद्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले.सरसेनानी जोगेंद्र कवाडे यांनी नागपूर येथून काढलेला लॉंगमार्च मधील जनतेचा आक्रमक उत्स्फूर्त प्रतिसाद या आंदोलनातील मैलाचा दगड ठरला.सर्व आंबेडकरी जनता, नेते,कार्यकर्ते यांच्या सातत्यपूर्ण आंदोलनातून १४ जानेवारी १९९४ रोजी मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर झाले आणि ' डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ' असे नाव दिमाखात विद्यापीठाच्या कमानीवरती झळकले.
how to download covid vaccine certificate
appointment for precaution dose.
आंबेडकरवाद्यानी सातत्यपूर्ण एकजुटीय संघर्षातून हा विजय साकारला होता.नामांतर लढ्याची निष्पत्ती म्हणून या लढ्यात शहीद झालेल्या पोचीराम कांबळे यांच्या मरणोत्तर आनंदाला व्यक्त करताना भीमशाहिर,गीतकार प्रभाकर पोखरीकर म्हणतात,
"थडग्यातुन उठून पोचिराम नाचला !
आई,सांग त्या साऱ्यांना जयभीम पोहचला !!”
शहीद शूरवीर यांना विनम्र अभिवादन
नामांतराचे आंदोलन म्हणजे आंबेडकरवाद्यांच्या अस्मिता,शौर्य,लढववृत्ती आणि बाणेदारपणाचा इतिहास आहे.
या यशस्वी आंदोलनाच्या फलश्रुतीबद्दल एका आंबेडकरी भीमशाहिराने आपल्या गीतात म्हंटले आहे ,
' सोन्या-मोत्याची ती अक्षर-बाबासाहेब आंबेडकर,हृदयाचा घेती ठाव !
काय खुलुनी दिसतंय राव,या कमानीवरती नावं !!
आंबेडकरवाद्यानी सातत्यपूर्ण एकजुटीय संघर्षातून हा विजय साकारला होता.नामांतर लढ्याची निष्पत्ती म्हणून या लढ्यात शहीद झालेल्या माझ्या शूरवीर बांधावा ना कोटी कोटी प्रणाम