Type Here to Get Search Results !

स्वामी विवेकानंद जयंती भाषण मराठी | Swami Vivekananda Jayanti Speech | 12 जानेवारी स्वामी विवेकानंद जन्म दिवस | January 12 is Swami Vivekananda's birthday

 स्वामी विवेकानंद जयंती भाषण | Swami Vivekananda Jayanti Speech | 12 जानेवारी स्वामी विवेकानंद जन्म दिवस | January 12 is Swami Vivekananda's birthday  

मनुष्य जीवनात जेवढे उन्नत होता येऊ शकेल तेवढे होण्याचा प्रयत्न तेवढे उन्नत होण्याचा प्रयत्न करणारे, हिंदू धर्माची निष्ठा शेवटपर्यंत पाळणारे, हिंदू धर्माचा प्रचार पूर्ण विश्वात करणारे असे हे स्वामी विवेकानंद . स्वामी विवेकानंद जयंती भाषण | Swami Vivekananda Jayanti Speech | 12 जानेवारी स्वामी विवेकानंद जन्म दिवस | January 12 is Swami Vivekananda's birthday  या  विषयी माहिती पाहणार आहोत.

स्वामी विवेकानंद (toc)

स्वामी विवेकानंद जयंती भाषण  Swami Vivekananda Jayanti Speech 

स्वामी विवेकानंद जीवन परिचय 

नाव (खरे नाव)- नरेंद्र विश्वनाथ दत्त.

जन्म - दिनांक  १२ जानेवारी १८६३ रोजी झाला.

आईचे नाव - भुवनेश्वरी देवी

वडीलांचे नाव - विश्वनाथ दत्त 

गुरू - रामकृष्ण परमहंसाना

12 जानेवारी स्वामी विवेकानंद जन्म दिवस 

January 12 is Swami Vivekananda's birthday  

यांचा जन्म १२ जानेवारी १८६३ रोजी झाला. स्वामी विवेकांनद यांचा खरं नाव होतं नरेंद्र विश्वनाथ दत्त. लहानपणापासून विवेकानंदांना सद्सद्विवेकबुद्धी आणि अध्यात्माचे संस्कार मिळाले होते.


प्रत्येक गोष्टीला सहजासहजी न मानता त्याच्यावर सारासार विचार करून, बुद्धीला पटेल असेच कर्म स्वामी विवेकानंदांना अभिप्रेत होते. रामकृष्ण परमहंस यांचे परमशिष्य होते. सत्याच्या शोधात असताना विवेकानंदांना अनेक प्रश्न पडायचे. या सर्व प्रश्नांचे उत्तर स्वतःमध्ये शोधण्याचा सल्ला रामकृष्ण परमहंस यांनी विवेकानंदांना दिला. यानंतर खरी त्यांची अध्यात्मक प्रगती झाली.


स्वामी विवेकानंद  कार्य 

रामकृष्ण परमहंस परमोच्च शिखरावर असले तरी त्यांना ज्ञात असलेले सत्य आणि हिंदूधर्म जगापर्यंत पोहोचवायचा होता, याचे खरे काम विवेकानंदांनी केले. ” रामकृष्ण मिशन ” स्थापन करून पूर्ण भारतात आणि विश्वात सत्याचा व धर्माचा प्रचार केला. योग आणि वेदांचा प्रचार खऱ्या अर्थाने पूर्ण जगात खूपच कमी वेळेत स्वामी विवेकानंदांनी केला. हिंदूधर्म म्हणजे नुसते पारंपारिक ग्रंथ नसून अखिल मानव जातीने अनुभवलेले अध्यात्मातील परमोच्च शिखर आहे असे विवेकानंदांचे म्हणणे होते.

विवेकानंदांचे वक्तृत्वावर बऱ्यापैकी प्रभुत्व होते त्यांची भाषणे ऐकणे म्हणजे एक अपूर्व अनुभव असे. शिकागो मध्ये आयोजित केलेल्या जागतिक धर्म परिषद परिषदेत हिंदू धर्माची नव्याने व्याख्या देऊन स्वतःची व भारताचे पूर्ण जगावर छाप उमटवली. हिंदू धर्माचा प्रचार करण्यासाठी स्वामी विवेकानंदांनी कोलकाता येथे बेलूर मठाची स्थापना केली.

1893 मध्ये स्वामी विवेकानंदजी संयुक्त अमेरिकेत झालेल्या इंटरफेईथ परिषदेत उपस्थित होते. वर्ल्ड कॉन्फरन्समधील भाषणात स्वामी विवेकानंदजी यांनी  भाषणाच्या सुरूवातीला 'मेरे भाई और बहिनों असे संबोधून सर्व उपस्थितांची मने जिंकली. त्या सभेत स्वामी विवेकानंदांनी हिंदू धर्माच्या महानतेबद्दल सर्वांना शास्वती पटवून दिली. आयुष्यभर हे महान कार्य करण्यातही त्यांनी व्यतीत केले.

नव युवक यांना मार्गदर्शन “ राष्ट्रीय युवा दिवस ” 

देशाची युवा शक्ती एका महापुरुषाकडे पाहून स्वतःचा आदर्श ठरवते मंग असे व्यक्तिमत्त्व जर कोणाचे होते  तर ते फक्त  स्वामी विवेकानद होते . त्या व्यतिरिक्त दुसरा कोणी नसेल असे मला वाटते.

स्वामी विवेकांनद यांचे भारतासाठी व विश्वासाठी अतुल्य योगदान सर्वांनाच श्रुत आहे. त्यांचा तरुणांवरील प्रभाव दांडगा होता. त्यांचा जन्मदिवस हा भारतामध्ये ” राष्ट्रीय युवा दिवस ” म्हणून साजरा केला जातो. भारतीय संस्कृती जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचवण्यात स्वामी विवेकानंद यांचा मोलाचा सहभाग आहे. त्यांना भारताचे राष्ट्रभक्त संत म्हणून ओळखले जायचे. त्यांची धर्मावरची पकड एवढी मजबूत होती की जीवन जगण्यातच त्यांनी धर्म दाखवून दिला.

संयुक्त राष्ट्र संघाने १९८४ या वर्षाला “आंतरराष्ट्रीय युवा वर्ष” घोषित केले त्यानुसार मग त्याचे महत्त्व जाणून भारत सरकारने त्याच वर्षीपासून १२ जानेवारी या दिवशी राष्ट्रीय युवक दिवस साजरा करण्यात येईल, अशी घोषणा केली.

तरुणांना विशेष मार्गदर्शन ते करत असत. भारतातील व परदेशातील तरुण वर्ग हा त्यांनी दाखवलेल्या समाज उभारणीच्या आणि राष्ट्रहिताच्या कार्यासाठी प्रेरित झाला होता. त्यांच्या अध्यात्मिक आणि जीवन सत्कर्मी लावण्याच्या कार्यावर सर्व भारतीय विश्वास ठेवून होते.


स्वामी विवेकानंद  यांचे शैक्षणिक विचार

🔰मानवी जीवनात विकासासाठी शिक्षणाचे महत्त्व, शिक्षणाचे तत्त्वज्ञान राष्ट्रनिर्मितीसाठी किती महत्त्वपूर्ण आहे, हे सुद्धा पटवून दिले आहे.

🔰 शिक्षण म्हणजे मनुष्याच्या ठिकाणी जे पूर्णत्व आधीचेच विद्यमान आहे, त्याचे प्रकटीकरण अशी पायाभूत संकल्पना स्पष्ट करून त्यांनी शिक्षणाचे महत्त्व विशद केले आहे.

🔰संपूर्ण शिक्षणाचे ध्येय माणूस निर्माण करणे होय. ज्ञानप्राप्तीच्या काही मूलभूत आणि महत्त्वपूर्ण तत्त्वांची मिमांसा स्वामी विवेकानंद यांनी केली आहे.

🔰मनुष्याचा विकास हेच शिक्षणाचे ध्येय असते अर्थात यामध्ये श्रद्धा आणि विश्वासाचे स्थान महत्त्वपूर्ण असतेच असते.

🌼 मनुष्याचे शील आणि चरित्र्य निर्माण हे शिक्षणाचे महत्त्वाचे तत्त्व होय.

 🌺 मनुष्याच्या प्रवृत्ती आणि संस्कार मनुष्याच्या चारित्र्य निर्मितीसाठी अत्यावश्यक असतात.

✍️ शिष्याच्या बाबतीत पावित्र्य, ज्ञानोपार्जनाची खरी तृष्णा व चिकाटी हे गुण आवश्यक आहेत.

'स्त्री-शिक्षणाविषयी स्वामी विवेकानंद यांचे विचार '

'स्त्री-शिक्षणाचे महत्त्व विशद करताना स्वामींनी हे स्पष्ट केले आहे की स्त्रियांचे जीवन विषादमय असेल, तर कोणत्याही कुटुंबांची वा देशाची उन्नती होण्याची आशाच नको, स्त्री जाती पुढील अनेक गंभीर प्रश्न शिक्षणाने सहज सुटू शकतील.


स्वामी विवेकानंद यांचे अनमोल विचार 

✍️ तुम्ही जसा विचार करतात तसे बनतात, स्वतःला कमकुवत समजणार तर कमकुवत आणि सामर्थ्यवान समजाल तर सामर्थ्यवान व्हाल.

✍️ जे काही आपल्याला कमकुवत करते शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक ते विष त्यागून द्या.

✍️ सामर्थ्य जीवन आहे, दुर्बलता म्हणजे मृत्यू. विस्तार जीवन आहे, आकुंचन म्हणजे मृत्यू. प्रेम जीवन आहे, द्वेष म्हणजे मृत्यू.

✍️ ज्या दिवशी तुम्हाला एकही समस्या आली नाही तेव्हा तुम्ही समजू शकतात की तुम्ही चुकीच्या मार्गावर चालत आहात.

✍️ एका वेळी एकच काम करा, आणि ते काम करीत असताना आपले संपूर्ण लक्ष त्यात केंद्रित असू द्या.

स्वामी विवेकानंद आपले कार्य करत असताना अविश्रांत परिश्रम घेतले. त्यांना चहाविषयी प्रचंड प्रेम होते. त्यांनी आपल्या आश्रमामध्ये चहा सुरूच ठेवला होता. वयाच्या ३९ व्या वर्षी त्यांना अनेक व्याधी आणि आजारांनी ग्रासले व अखेर ते ४ जुलै १९०२ रोजी अनंतात विलीन झाले. असा हा युगपुरुष, कर्मयोगी, धर्मयोगी, प्रखर हिंदुत्ववादी स्वामी विवेकानंद या महान व्यक्तीला त्रिवार अभिवादन !

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad