इयत्ता 10 वी तोंडी परीक्षा नमुना प्रश्नपत्रिका अंतर्गत मूल्यमापन 2022 विषय मराठी, हिंदी, इंग्रजी भाषा
Std 10th Oral Exam Sample Question Paper Internal Evaluation 2022 Marathi, Hindi, English Language Subject
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे अंतर्गत मूल्यमापन एकूण गुण २०
इयत्ता :१० वी
विषय- मराठी ,हिंदी ,इंग्रजी ( भाषा)
अ) श्रवण कौशल्य ०५ गुण आ) भाषण कौशल्य ०५ गुण
इ) स्वाध्याय १० गुण तोंडी परीक्षेकरिता खालीलपैकी कोणतीही दोन कौशल्ये निवडणे अपेक्षित आहे.
अंतर्गत मूल्यमापन 2022 विषय मराठी, हिंदी, इंग्रजी भाषा (toc)
अ) श्रवण कौशल्य
विद्यार्थी संख्या आणि उपलब्ध वेळ यानुसार विद्यार्थ्यांचे गट करावे. खाली दिलेल्या चार पर्यायापैकी कोणताही एक पर्याय श्रवण कौशल्यासाठी निवडावा.
१) परिच्छेद -
परिच्छेद ऐकून त्यांवर आधारित विचारलेल्या वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे लिहिणे, (किमान ०५ प्रश्न ) ( बरोबर उत्तरास ०१ गुण )
महत्वपूर्ण सूचना
१) निवडलेला परिच्छेद पाठ्यपुस्तकातील असणे आवश्यक आहे. (या परिच्छेद ची शब्दमर्यादा १०० ते १२० शब्द असावी.)
२) निवडलेला परिच्छेद कमीतकमी ०५ वस्तुनिष्ठ प्रश्न विचारावेत.
३) परिच्छेद स्पष्टपणे वाचून दाखवावा.
४) प्रस्तुत परिच्छेदावर किमान ०५ वस्तुनिष्ठ प्रश्न तयार करावेत.
५) प्रश्नांची उत्तरे - उत्तरपत्रिकेत लिहा.
६) तपासलेल्या उत्तरपत्रिका व गुणपत्रक शालेय स्तरावर जपून ठेवणे.
२) ५ वाक्ये किंवा १० शब्द ऐकून लिहिणे.
योग्य वाक्यास प्रत्येकी ०१ गुण, योग्य १० शब्द लिहिल्यास प्रत्येकी १/२ गुण)
वाक्यासंदर्भात महत्वपूर्ण सूचना
१) पाठ्यपुस्तकातील कोणतीही ०५ वाक्ये निवडणे.
२) चार ते पाच शब्दांचे वाक्य असावे.
३) वाक्य सोप, मध्यम व कठिण याप्रकारे निवडावे.
४) सुस्पष्टपणे वाचून दाखवणे.
५) प्रत्येक वाक्य शिक्षकांनी वाचून झाल्यावर विद्यार्थ्यांनी ते ऐकून उत्तरपत्रिकेच्या पुरवणीवर बिनचूक लिहिणे अपेक्षित आहे.
शब्दांसंदर्भात महत्वपूर्ण सूचना -
१) शालेय पाठ्यपुस्तकातील १० शब्दांची निवड करावी.
२) सोपे मध्यम, व कठीण याप्रकारे शब्दांची निवड करणे.
३) शिक्षकांनी एकेक शब्द किमान दोन वेळा सुस्पष्टपणे वाचून दाखवावा.
४) एकेक शब्द शिक्षकांनी वाचलेला विद्यार्थ्यांनी तो एकून उत्तरपत्रिकेच्या पुरवणीवर बिनचूक लिहिणे अपेक्षित आहे.
३) कविता ऐकून त्यावर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे लिहिणे
(किमान ०५ प्रश्न) (योग्य उत्तरास प्रत्येकी ०१ गुण)
महत्वपूर्ण सूचना
१) शालेय पाठ्यपुस्तकातील कविता निवडावी.
२) कवितेवर ०५ वस्तुनिष्ठ प्रश्न तयार करावेत.
३) प्रश्न फलकावर लिहावेत.
४) प्रस्तुत कविता स्पष्टपणे वाचन करणे.
५) फळ्यावर लिहिलेल्या पाच प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र उत्तरपत्रिकेच्या पुरवणीवर लिहिणे अपेक्षित आहे.
६) प्रत्येक गटासाठी वेगळी कविता निवडावी.
७) प्रत्येक प्रश्नाला एक गुण याप्रमाणे योग्य उत्तरास गुणदान करावे. एकूण गुण पांचपैकी द्यावेत.
८)निवडलेल्या कविता, त्यांवर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्न, विद्यार्थ्यांच्या तपासलेल्या उत्तरपत्रिका व गुणपत्रक शालेय स्तरावर जपून ठेवावे.
४) ऑडिओ क्लीप ऐकून त्यांवर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे लिहिणे.
( किमान ०५ प्रश्न) (योग्य उत्तरास प्रत्येकी ०१ गुण)
महत्वपूर्ण सूचना
१) शालेय पाठ्यपुस्तकातील पाठ्यांशावर आधारित ऑडिओ क्लीप ऐकवावी.
२) ऑडिओ क्लीप स्वतः तयार करावी.
३) प्रत्येक गटासाठी स्वतंत्र ऑडिओ क्लीप असावी.
४)०५ वस्तुनिष्ठ प्रश्न तयार करावेत.
५) हे प्रश्न ऑडिओ क्लीप ऐकवण्यापूर्वी फळयावर लिहावेत.
६) प्रत्येक प्रश्नाला एक गुण याप्रमाणेयोग्य उत्तरास गुणदान करावे.
७) एकूण गुण पाचपैकी द्यावेत,
८) ऑडिओ क्लीप, त्यावर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्न, विद्यार्थ्यांच्या तपासलेल्या उत्तरपत्रिका व गुणपत्रक शालेय स्तरावर जपून ठेवावे.
आ) भाषण कौशल्य (खाली दिलेल्या पैकी कोणतेही एक)
'भाषण' हे एक महत्वाचे भाषिक कौशल्य आहे. मुलांनी ऐकलेला, वाचलेला अनुभवलेला प्रसंग आपल्या भाषेद्वारे व्यक्त करणे किंवा स्वतःचे विचार, मत योग्य भाषेत प्रकट करणे, या कौशल्यात अभिप्रेत आहे.
1) वाचन केलेल्या एका पुस्तकाविषयीचे स्वमत प्रकट करणे.
सूचना
१) कोणतीही दहा पुस्तके निवडावीत.
२) पुस्तकांची यादी सर्व मुलांना वर्षाच्या सुरूवातीस दयावी. ही पुस्तके विदयार्थ्यांना शालेय वाचनालयात सहज उपलब्ध होतील, याची व्यवस्था करावी.
३) विदयार्थ्यांनी या व्यतिरिक्त स्वतःहून वेगळे पुस्तके निवडले तरी त्याचे स्वागत करावे.
४) मुलांनी वाचलेल्या पुस्तकाविषयी स्वतःचे मत किमान ०५
मिनिटात व्यक्त करवे.
५) स्वमत प्रकटीकरणात खालील मुद्दे असावेत
पुस्तकाचे नाव, लेखक, पुस्तकात मांडलेला विचार, लेखनशैली, - पुस्तक आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण
६) तक्त्यानुसार योग्य गुणदान करणे अपेक्षित आहे.
७) यासंबंधीची सविस्तर नोंद वही जपून ठेवणे आवश्यक आहे.
2) दिलेल्या विषयांवर विचार प्रकट करणे.
महत्वपूर्ण सूचना
१) मुलांच्या भावविश्वाशी निगडीत असे दहा विषय ठेवावेत.
२) या विषयांवर शिक्षकांनी मुलांना मार्गदर्शन करावे.
३ ) मुलांना विषय निवडीचे स्वातंत्र्य असावे.
3) शालेय पाठयपुस्तकातील पाठ किंवा कविता यांवर ८ ते १० वाक्यांमध्ये आपले विचार प्रकट करणे.
सूचना -
१) शिक्षकांनी प्रथम मार्गदर्शन करावे.
२) विचार प्रकट करतांना विदयार्थ्यांनी खालील मुद्दे विचारात घ्यावेत.
३) पाठ अथवा कवितेचे नाव, लेखक अथवा कवी, पाठाची / कवितेची मध्यवर्ती कल्पना, विचार, पाठ / कविता आवडणे वा न आवडणे यामागील विचार .
४) प्रत्येक विदयार्थ्यांचे संबंधित पाठ / कवितेवरील विचार स्वतंत्रपणे ऐकून मूल्यमापन करावे.
५) तक्त्यानुसार योग्य गुणदान करणे .
६) विषयानुसार मांडणी, भाषाशैली, सभाधीटपणा, आकर्षक सुरूवात योग्य शेवट या मुद्र्यांचा विचार गुणदानासाठी करणे गरजेचे आहे.
इ) स्वाध्याय १० गुण
सूचना - १) प्रत्येक विदयार्थ्याने संपूर्ण वर्षात दोन स्वाध्याय पूर्ण करणे अपेक्षित आहे..
२) प्रत्येक स्वाध्यायास ०५ गुण.
३) दोन पैकी एक स्वाध्याय गदय अथवा पदय घटकावर आधारित असावा. स्वाध्यायात आकलन, स्वमत, अभिव्यक्ती इत्यादी प्रकारांच्या कृती असणे अपेक्षित आहे.