Type Here to Get Search Results !

राष्ट्रीय विज्ञान दिन | 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन | चंद्रशेखर वेंकट रामन (सी व्ही रामन ) माहिती | National Science Day | February 28 National Science Day | Chandrasekhar Venkat Raman (CV Raman) Information

राष्ट्रीय विज्ञान दिन | 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन | National Science Day |  February 28 National Science Day


 28 फेब्रुवारी हा दिवस भारताच्या वैज्ञानिक घडामोडी मध्ये महत्त्वाचा मानला जातो कारण याच तारखेला त्यांचा शोध निबंध नेचर  या मासिकेला प्रसिध्दी साठी पाठवला.महान वैज्ञानिक सर सीव्ही रमन यांना नोबेल पुरस्कर मिळाला होता.  सर सीव्ही रमन यांनी आपल्या प्रसिद्ध अशा रमन इफेक्टचा शोध लावला होता. या कारणास्तव  आजचा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन National Science Day | February 28 National Science Day म्हणून साजरा केला जातो. 





येत्या २८ फेब्रुवारी रोजी 'राष्ट्रीय विज्ञान दिना'ला २५ वर्षे पूर्ण होत आहेत. २८ फेब्रुवारी १९२८ रोजी नोबेल पारितोषिक विजेते - भारतरत्न सर सी. व्ही. रामन यांनी 'रामन इफेक्ट' हा वैशिष्ट्यपूर्ण शोधनिबंध जगासमोर सादर केला होता. त्या दिवसाचे औचित्य साधून हा दिवस 'राष्ट्रीय विज्ञान दिन' म्हणून साजरा केला जातो. यंदाच्या रौप्यमहोत्सवी विज्ञानदिनाच्या निमित्ताने अधोरेखित केलेले 'रामन इफेक्ट' ह्या संशोधनाचे आणि रामन यांच्या व्यक्तित्त्वाचे पैलू..

या दिवशी विज्ञान विषयक अनेक बाबींवर चर्चा चिंतन उपक्रम राबवून सी व्ही रामन यांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम केला जातो.

चंद्रशेखर वेंकट रामन (सी व्ही रामन ) (toc)

चंद्रशेखर वेंकट रामन (सी व्ही रामन )  माहिती   Chandrasekhar Venkat Raman (C.V .Raman) Information

जीवन परिचय थोडक्यात 

पूर्ण नाव -  चंद्रशेखर वेंकट रामन .

जन्म - ०७ नोव्हेंबर १८८८

जन्म ठिकाण - तिरुचिरापल्ली ,तामिळनाडू 

आईचे नाव - पार्वती

वडिलांचे नाव - चंद्रशेखर अय्यर .

पत्नीचे नाव - लोकासुंदरी.

अपत्ये - चंद्रशेखर आणि राधाकृष्णन

मृत्यू - २१ नोव्हेंबर १९७० 

शिक्षण व कार्य 

माध्यमिक शिक्षण - सेंट अलॉयसीयसच्या अँग्लो इंडीयन हायस्कूल.

पदवी - प्रेसिडेन्सी कॉलेज मधून भौतिकशास्त्र या विषयात पदवी  मद्रास विद्यापीठातून. M. A. पदवी.

पदवीधर असताना १९०६ साली  पहिला  संशोधन पेपर प्रकाशित केला.

कार्य - 

कलकत्ता - येथे १९१७ -१९३३ कलकत्ता विद्यापीठ  मध्ये भौतिकशास्त्रचे प्राध्यापक म्हणून  काम केले.

लंडनच्या रॉयल सोसायटीमध्ये 'भारतीय तंतूवाद्ये' हा शोधनिबंध सादर केला. पुढे १९३५मध्ये 'भारतीय चर्मवाद्ये' विशेष करून तबल्याच्या नादनिमिर्ती, तबल्याची पुडी, शाई, तरंगलांबी इत्यादींवर संशोधन केले.

त्यांनी आपल्या पहिल्या युरोप दौऱ्यामध्ये भूमध्य समुद्र पाहून निळ्या रंगाचे वर्णन करण्याची कल्पना व प्रेरणा मिळाली.

१९२६ मध्ये इंडियन जर्नल ऑफ फिजिक्स ची स्थापना .

“२८ फेब्रुवारी १९२८ रोजी प्रकाश विखुरल्याची एक अभिनव घटना त्यांनी शोधून काढली . त्यास आपण ” सुधारित विखुरणे ” असे म्हणतो.किंवा रामन इफेक्ट म्हणून जगभर ओळखले जाते.”


 

   विज्ञान दिन का साजरा केला जातो ?  राष्ट्रीय विज्ञान दिन National Science Day

विज्ञान दिन का साजरा केला जातो ?

  • राष्ट्रीय विज्ञान दिनाचे मुख्य ध्येय म्हणजे देशातील विज्ञान क्षेत्रातील प्रगती अविरत कायम ठेवणे.  
  • समाजात विज्ञानाविषयी जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो.

रामन इफेक्ट 

February 28 National Science Day

रामन इफेक्ट म्हणजे ?
  • एका प्रकारचे प्रकाशाचे विकरणच. प्रकाशाचे विकिरण हा एक दृश्य परिणाम आहे .
  • प्रकाशाचे किरण सरळ जेव्हा आपल्या डोळ्यात शिरतात तेव्हाच आपल्याला प्रकाशाची जाणीव होते .
  • स्फटिकांच्या अणूरचने संबंधी आढळणाऱ्या रचना सार्धम्याशीअपवादात्मक असा अभ्यास सी. व्ही. रमण यांनी केला.१९२२ सी व्ही रामन यांना असे दिसून आले की प्रकाशामध्ये मूळ प्रकाशा इतक्या  तरंगलांबीच्या किरण बरोबर इतरही प्रकाश किरणांचे अस्तित्व असते.
  • या नवीन किरणांचा जास्त अचूक अभ्यास करण्यासाठी पाऱ्याच्या विद्युतदीपाघटापासून  मिळणारी तरंगलांबी चा अभ्यास केला.
  • त्या अभ्यासक्रम अभ्यासावरून त्यांना नवीन निष्कर्ष मिळाले व संशोधनाला  अजून बळकटी आली.
  • प्रकाशामध्ये कण स्वरूपाची साधर्म्य सांगणारे काही गुणधर्म असतात त्याच्या प्रकाश कणिकांमधील  ऊर्जा ही या प्रकाशाच्या कंपनसंख्येच्या समप्रमाणात असते.
  • या शोधामुळे आश्चर्यकारक अशा लपलेल्या वर्ण रेषा मूळ प्रकाशाच्या वर्ण रिशी बरोबरच ओढून बाहेर काढल्या जातात आणि त्या दृश्यमान होतात.
  •  या संशोधनामुळे विकिरणाच्या अंविक प्रक्रियेसंबंधी चे रचने संबंधीचे माहिती भंडार संपूर्ण जगापुढे खुले झाले. 
  • अणू प्रमाणेच रेणूंची ही रामन वर्णपट काढता येतात.
  • रेणूंची रचना तसेच अतिनील पट्ट्यातील रेषांच्या ही अभ्यास करता येऊ लागला
  •  द्रव्य व वायुरूप पदार्थांमध्ये होणाऱ्या विकरण यांचा अभ्यास सहज पणे करता येऊ लागला.
  •  रासायनिक रेणूंची रचना समजण्यासाठी रामन परिणामाचा खूप उपयोग झाला.

सन्मान व पुरस्कार 

१९३० मध्ये भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार .
१९४१ मध्ये  फ्रॅंकलिन पदक.
१९५४ मध्ये भारतरत्न पुरस्कार.
१९५७ मध्ये लेनिन शांतता पुरस्कार.
१९९८ मध्ये अमेरिकन केमिकल सोसायटी आणि इंडियन इंडियन असोसिएशन फॉर द कल्टव्हेशन ऑफ सायन्स यांनी सी व्ही रामन यांच्या अविष्कारावर आंतरराष्ट्रीय इतिहासिक केमिकल लैंडमार्क म्हणून शिक्कामोर्तब केला.

हे  नक्की वाचा ⬇️





















Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad