Type Here to Get Search Results !

मराठी भाषा गौरव दिन | मराठी भाषा दिन भाषण | मराठी राजभाषा दिन

मराठी भाषा गौरव दिन |  मराठी भाषा दिन भाषण | मराठी राजभाषा दिन 

मराठी भाषा दिन  मराठी राजभाषा दिन  मराठी भाषा गौरव दिन (toc)

मराठी भाषा दिन भाषण

माझ्या मराठी मातीचा
लावा ललाटास टिळा,
हिच्या संगाने जागल्या,
दऱ्याखोऱ्यातील शिळा
            कुसुमाग्रज
श्री. विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कवी कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन देण्यासाठी मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो.२७ फेब्रुवारी हा दिवस म्हणजे कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. या दिवशी मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो.
कवी कुसुमाग्रज यांनी महाराष्टाची साहित्य संस्कृती ,मराठी भाषा यासाठी अनमोल योगदान दिले आहे.
मराठी भाषा गौरव दिन  | मराठी भाषा दिन भाषण |







कवी कुसुमाग्रज - जीवन  परिचय 

कवी कुसुमाग्रज यांचा जीवन परिचय थोडक्यात पाहाणार आहोत.
पूर्ण नाव : विष्णू वामन शिरवाडकर.
जन्म : २७/०२/१९१२
कार्यक्षेत्र : कवी , लेखक ,नाटककार ,कथाकार ,समीक्षक
प्रसिद्ध साहित्यकृती - नटसम्राट
मृत्यू : १०/०३/१९९९ 

कुसुमाग्रज हे नाव वि. वा . शिरवाडकर यांना कसे मिळाले.

कुसुमाग्रज यांचे मूळ नाव रंगनाथ शिरवाडकर असे होते.त्यांचे काका वामन शिरवाडकर यांनी यांनी त्यांना दत्तक घेतले होते त्यांचे नाव विष्णू वामन शिरवाडकर असे होते. कुसुमाग्रज यांचे वडील हे वकील होते .वकील हा व्यवसाय करण्यासाठी ते पिंपळगाव बसवंत या तालुक्याच्या गावी आले या ठिकाणी त्यांचे बालपण गेले आले .कुसुमाग्रजांना सहा भाऊ व एक लहान बहीण होती. लहान बहिणीचे नाव कुसुम होते व ती सर्वांची लाडकी होती .एकुलती एक बहीण व सर्वांची लाडकी म्हणून कुसुम चे अग्रज म्हणून कुसुमाग्रज असे नाव त्यांनी धारण केले तेव्हापासून शिरवाडकर कवी कुसुमाग्रज या टोपण नावाने ओळखले जाऊ लागले.

भाषण व निबंध 

“ संत ज्ञानेश्वर , संत नामदेव , आद्य कवी मुकुंदराज !
मराठी काव्याला यांनी चढविला साज!!
सह्याद्रीच्या दर्‍याखोर्‍यातून नभा पर्यंत मराठी आवाजच गाजतो!
“ आचार्य अत्रे कुसुमाग्रज गडकरी अन करंदीकर !
फु .ल .देशपांडे बहिणाबाई व ग दि माडगूळकर !!
इत्यादींनी फुलविला मराठी साहित्याचा मळा !
माय मराठीच्या माथी लागलाय यशाचा टिळा !!”


सन्माननीय व्यासपीठ व व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजनवर्ग व येथे उपस्थित सर्व मराठी भाषा मित्र व मैत्रिणी .

आज दिनांक : २७ फेब्रुवारी हा दिवस आपण मराठी राजभाषा दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करीत आहोत. हा दिवस महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी, लाडके साहित्यकार, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते थोर लेखक, नाटककार वि.वि. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस ! कुसुमाग्रजांनी अनेक सरस कथा, कांदबऱ्या, निबंध, लघुकथा, नाटक, कविता इ. यांचे कुशल लेखन केले. त्यांची विशाखा ही कांदबरी भारतीय साहित्या तील उत्कृष्ट कार्य व आधुनिक मराठी काव्याच कायमचे भूषण ठरले आहे. नटसम्राट सारखे अजरामर नाटक कुसुमाग्रजांच्या प्रतिभेची ओळख पटवून देते.

मराठी ही सर्वांगसुंदर भाषा आहे. मराठी ही भारतातील अधिकृत २२ भाषांपैकी एक भाषा आहे. भारतात सर्वात जास्त बोलली जाणारी मराठी ही तिसरी भाषा आहे. महाराष्ट्र तसेच गोवा या २ राज्यांची मराठी ही अधिकृत राज भाषा आहे.
मराठीची साहित्यसंपदा विपुल आहे. तिला थोर परंपरा लाभली आहे.

मराठी भाषा अनेक संताच्या कीर्तनांनी, भारुंडानी, ओव्यांनी, भजनांनी सजली आहे. ती अनेक मराठी साहित्यिकांच्या प्रतिभासंपन्न अशा लेखनींनी समृध्द, संपन्न झाली आहे. थोर संत ज्ञानेश्वर माउली मराठीची थोरवी गाताना म्हणतात की,
“माझा मराठीची बोलू कौतुके, परि अमृतातेही पैजासी जिंके, ऐसी अक्षरे रसिके  मेळवीन ।”
मराठी भाषा अमृतालाही पैजेने जिंकणारी आहे.
तिचा गोडवा अमृतापेक्षाही अधिक आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेचे व संस्कृतीचे रक्षण केले. त्यांनी मराठी भाषेसाठी पहिला राजकोश तयार केला.
भाषा दिन किंवा मराठी राजभाषा गौरव दिन हा सर्व शाळा, कॉलेजमध्ये तसेच सरकारी कार्यालयात अनेक उपक्रमाद्वारे साजरा केला जातो. अनेक ठिकाणी मराठी नाटक, कविता, स्नेहसमेलनाचे आयोजन केले वकृत्व, निबंध, जाते. सध्या इंटरनेटच्या युगात गुगलसारख्या नामवंत कंपनीने मराठीचे महत्व ओळखले आहे. आपण सर्वांनीही मराठीचा अभिमान सदैव बाळगावा. मराठी भाषा टिकवण्यासाठी, समृद्ध करण्यासाठी जरूर प्रयत्न करावेत.

मराठी भाषेला  नका म्हणू हीन दीन कारण  “स्वर्गलोकाहून थोर, मला हिचे महिमान, रत्नजडित अभंग, ओवी अमृताची सखी चारी वर्णातूनी फिरे, सरस्वतीची पालखी ”

“ सर्वांना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ”

मराठी भाषा गौरव दिन व मराठी राजभाषा दिन चारोळ्या

“ संत ज्ञानेश्वर , संत नामदेव , आद्य कवी मुकुंदराज !
मराठी काव्याला यांनी चढविला साज!!
सह्याद्रीच्या दर्‍याखोर्‍यातून नभा पर्यंत मराठी आवाजच गाजतो!

“ आचार्य अत्रे कुसुमाग्रज गडकरी अन करंदीकर !
फु .ल .देशपांडे बहिणाबाई व ग दि माडगूळकर !!
इत्यादींनी फुलविला मराठी साहित्याचा मळा !
माय मराठीच्या माथी लागलाय यशाचा टिळा !!”

मराठी भाषा गौरव दिन व मराठी राजभाषा दिन कविता

“ मराठी राजभाषा आमची, महाराष्ट्राची शान !
भजन,कीर्तन ऐकताना, हरपते  भान !!
काना, मात्रा, वेलांटीचे ,मिळाले वाण ।
साहित्य अन् इतिहास,
मराठीचा महान !!
मराठी मायबोली आमची,
बोल रसाळ !
भाषा सहज सुंदर,
प्रेमळ लडिवाळ !
मराठी भाषेचा आम्हां,
  सदा गर्व !
मराठी भाषा दिन
साजरा करू सर्व ! !”


मराठी भाषा संवर्धन 

मायबोली मराठी आपल्या सर्वांची लाडकी भाषा त्यांचे संवर्धन करणे हे  आपले प्रथम कर्तव्य आहे.
 मराठी भाषा जपली पाहिजे ,मराठी भाषा टिकली पाहिजे म्हणजे नक्की काय ? 
  •  तर यासाठी आपल्याला मराठी  शाळा यांची संख्या वाढवली पाहिजे.
  •  इतर माध्यमांसाठी प्रथम भाषा ही मराठी ठेवली पाहिजे.
  • मराठी भाषा ही प्रत्येक ठिकाणी सक्तीची केली पाहिजे कारण आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी ची भाषा आपल्याला येणे गरजेचे आहे.
  • मराठी बोलणे किंवा पोशाख घालने म्हणजे मराठी जपणे नाही यासाठी ती भाषा वारंवार बोलली पाहिजे तर ती भाषा आपल्याला अवगत होईल .
  • महाराष्ट्राला लाभलेला इतिहास परंपरा मराठी संस्कृती व संत साहित्य या गोष्टी या सर्वान पर्यंत पोहोचल्या पाहिजेत व त्या जपल्या ही पाहिजेत.
  •  मराठी साहित्याच्या परंपरा व त्यांचा वारसा पुढच्या पिढीकडे सोपवली पाहिजे तर आणि तरच आपल्या भाषेच्या आपण संवर्धन करू शकतो. 
नुसता मराठीचा आव आणून काही होणार नाही तर भाषेला आत्मसात करणे गरजेचे आहे .

मराठी राजभाषा दिन

  १ मे महाराष्ट्राचा स्थापना दिवस आहे.  १ मे १९६० रोजी मराठी भाषकांचे महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. तो दिवस ‘मराठी राजभाषा दिन’ साजरा करणे अपेक्षित होते. काही काळ तो होता ही. 
 १ मे महाराष्ट्राचा स्थापना दिवस. तो कामगार दिनही असल्याने ‘मराठी राजभाषा दिन’ विस्मृतीत गेला. 
  • सामान्य प्रशासन विभागाने १० एप्रिल १९९७ रोजी खास शासन निर्णय करून ‘मराठी राजभाषा दिन’ ची आठवण करून दिली. त्यात सुरवातीस म्हटले आहे, की 
  • दिनांक १ मे १९६० रोजी महाराष्ट्राची स्थापना झाली. त्या दिवसापासून मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे. 
  • म्हणून १ मे हा दिवस ‘राजभाषा मराठी दिन’ म्हणून करावा असा निर्णय शासनाने घेतला आहे. म्हणून २८ एप्रिल ते ३० एप्रिल १९९७ या तीन दिवशी विविध उपक्रम आयोजित करून १ मे रोजी समारंभपूर्वक सांगता सोहळा करावा’. 
  • १ मे दिवशी ‘मराठी राजभाषा दिवस करण्याचा हा निर्णय. मराठीच्या 'या' बोलीभाषा माहिती आहेत का? 

मराठी भाषा गौरव दिन 

 कवी कुसुमाग्रज यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांचे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान स्मरून त्यांना अभिवादन म्हणून काही प्रस्ताव पुढे आले. 
२१ जानेवारी २०१३ रोजी शासन निर्णयानुसार कुसुमाग्रजांचा २७ फ्रेबुवारी हा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून करण्याचे घोषित करण्यात आले. तसा निर्णय मराठी भाषा विभागाच्या वतीनेही तो दिवस समारंभपूर्वक करण्याचे परीपत्रक काढले गेले. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण २०१० मध्ये ‘कवी कुसुमाग्रजांचा जन्मदिन २७ फेब्रुवारी हा ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून करण्याचे नमूद केले आहे. 

राजभाषा दिन आणि मराठी भाषा गौरव दिन हे दोन्ही दिवस वेगळे आहेत .


जागतिक मातृभाषा दिन

२१ फेब्रुवारी हा दिवस जागतिक मातृभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. 
 युनेस्को जागतिक पातळीवरील संस्थेने आपल्या मातृभाषेचे प्रेम व्यक्त करण्यासाठी २१ फेब्रुवारी हा दिवस साजरा केला जातो.













Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad