Type Here to Get Search Results !

छत्रपती शिवाजी महाराज भाषण मराठी | Chhatrapati Shivaji Maharaj Speech in marathi |छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी माहिती | Information about Chhatrapati Shivaji Maharaj 2022

छत्रपती शिवाजी महाराज भाषण मराठी|  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी माहिती  Chhatrapati Shivaji Maharaj Speech in marathi |  Information about Chhatrapati Shivaji Maharaj 2022 

दिनांक - १९ फेब्रुवारी २०२२ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात ,देशात व जगात साजऱ्या होणाऱ्या जयंतीनिमित्त आपण छत्रपती शिवाजी महाराज  भाषण  मराठी (Chhatrapati Shivaji Maharaj Speech in मराठी2)
व  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी माहिती
 ( Shivaji Maharaj Marathi Speech  Information about Chhatrapati Shivaji Maharaj)  पाहणार आहोत .
छत्रपती शिवाजी महाराज परिचय 
नाव  छ.शिवाजीराजे शहाजीराजे भोसले
वडिलांचे नाव  शहाजीराजे भोसले
आईचे नाव  राजमाता जिजाऊ(जिजाबाई)
जन्म  १९ फेब्रुवारी १६३०
पत्नी चे नाव  सईबाई ,सोयराबाई ,पुतळाबाई ,काशीबाई
मुली अंबिकाबाई, कमळाबाई, दिपाबाई ,राणू बाई
मुलगे छत्रपती संभाजी महाराज भोसले ,छत्रपती राजाराम राजे भोसले
चलन   शिवराई
राज्याभिषेक ६ जून इ. स.१६७४ 
मृत्यू   ३ एप्रिल  १६८०

छत्रपती शिवाजी महाराज Chhatrapati Shivaji Maharaj(toc)

छत्रपती शिवाजी महाराज  भाषण मराठी  Chhatrapati Shivaji Maharaj Speech |  Shivaji Maharaj Marathi Speech |

भाषण  

आदरणीय व्यासपीठ, गुरूजणवर्ग आणि
माझ्या  मित्र- मैत्रिणींनो  आज आपण  एका महान व्यक्तीबद्दल बोलणार आहोत याचा संपूर्ण देशाला व जगाला अभिमान आहे ते म्हणजे  शूर वीर पराक्रम छत्रपती शिवाजी महाराज .
'' कोट्यावधी देवांची अब्जावधी मंदिर असताना
पण  एकही मंदिर नसताना
जे अब्जावधींचा हृदयावर 
आधिराज्य करतात 
त्यांना छत्रपती शिवाजी महाराज  म्हणतात ".

छत्रपती शिवाजी महाराज जन्म व बालपण Information about Chhatrapati Shivaji Maharaj 2022

“पुत्र जिजाऊंना झाला , 
पुत्र शहाजी राजांना झाला

        पुत्र महाराष्ट्राला झाला आणि

         मुघलांचा कर्दनकाळ झाला ..

         माझा “शिवबा” जन्माला आला.”

महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर  फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ म्हणजेच १९फेब्रुवारी १६३० साली  शिवनेरी किल्ल्यावर  राजमाता जिजाऊ व शहाजीराजे भोसले यांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला .
छत्रपती शिवाजी महाराज भाषण



 छत्रपती शिवाजी महाराजांचे यांचे नाव शिवराय नाव का ठेवले ?

शिवनेरी किल्ल्यावर शिवाई देवीचे मंदिर आहे या देवीच्या नावावरूनच राजमाता जिजाऊ यांनी राजांचे नाव शिवाजी ठेवले होते त्यांना आपण शिवराय, शिवबा व शिवाजी राजे या नावाने ओळखतो.

शिवगर्जना 

आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम

महाराsssss ज

गडपती

गजअश्वपती

भूपती

प्रजापती

सुवर्णरत्नश्रीपती

अष्टवधानजागृत

अष्टप्रधानवेष्टित

न्यायालंकारमंडित

शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत

राजनितिधुरंधर

प्रौढप्रतापपुरंदर

क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधिश्वर

महाराजाधिराज

राजाशिवछत्रपती महाराजांचा विजय असो.

बालपण व संस्कार

शिवबांवर आई जिजाऊंनी लहानपणा पासून उत्तम संस्कार करून एक आदर्श व्यक्तिमत्व घडविले.शिवाजी महाराज अवघे १४ वर्षांचे असताना शहाजी राजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागीर सुपूर्त केली आणि वयाच्या पंधराव्या वर्षी शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली.

शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची जाणीव करून देण्यासाठी जिजाबाईंनी त्यांना राजनीतीही शिकविली, शूर वीरांच्या व रामायण महाभारतातील गोष्टी सांगून त्यांच्यावर उत्तम संस्कार केले अशा या संस्कारांमुळे शिवाजीराजे घडले. 

स्वराज्यनिर्मीती

  अवघ्या १४ व्या वर्षी  स्वराज्यनिर्मीती निर्माण करण्याचे धाडसी स्वप्न पाहिले आणि त्या दृष्टीने आपली विजयी घोडदौड सुरू ठेवून प्रत्यक्षात उतरविले. स्वराज्यनिर्मीतीच्या या कार्यात त्यांना अनेक अडथळे आले पण ते किंचितही कधी डगमगले नाही त्यांनी स्वराज्य निर्मितीचे आपले कार्य अविरत सुरू ठेवले.
 तानाजी, सूर्याजी, बाजीप्रभू, जिवा महाला असे जीवाला जीव देणारे मावळे जमविले. स्वराज्यनिर्मीतीची प्रतिज्ञा, स्वराज्याचे तोरण, गड आला पण सिंह गेला, प्रतापगडाचा पराक्रम, आग्र्याहून सुटका, शाहिस्तेखानाची फजिती असे अनेक प्रसंग त्यांच्या अजोड कार्याची महती पटवून देतात.

राजमुद्रा

शिवाजी महाराज जेव्हा पुण्याचा कारभार पाहत होते तेव्हा त्यांनी राजमुद्रा तयार केली.त्या राज्यमुद्रे वर  संस्कृत भाषेत खालील प्रमाणे लिहिले होते .

प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनौः
             शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ”
 राजमुद्रे वर   संस्कृत मध्ये लिहिलेल्या ओळींचा  अर्थ
ती राजमुद्रा मराठीत असे सांगते की  
“  जोपर्यंत  प्रतिपदेचा चंद्र वाढत जातो, आणि साया विश्वात वंदनीय होतो, तशीच शहाजीचा पुत्र शिवाजीची ही मुद्रा व तिचा लौकिक वाढत जाईल.”

छत्रपती शिवाजी महाराज भाषण  चारोळ्या शायरी 

“विजेसारखी तलवार चालवून गेला, 
कुलदैवत श्री राजा शिवछत्रपती तुम्ही.”
निधडया छातीने हिंदुस्थान हालवून गेला, 
वाघनख्याने अफजलखानाचा कोथळा फाडून गेला, 
मूठभर मावळयांना घेऊन हजारो सैतानांना नडून गेला
 स्वर्गात गेल्यावर देवांनी 
ज्याला झुकून मुजरा केला 
असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला.”

“ शिवरायांचे आठवावे रूप
 शिवरायांचा आठवावा प्रताप 
शिवरायांचा आठवावा साक्षेप 
भूमंडळी ... हिंदवी स्वराज्याचे 
संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा.”

“ झंझाविला भगव्याचा समान तुम्ही, 
जागविले मरगळलेले मर्द मावळे तुम्ही,
 घडविले श्री चे स्वराज्य तुम्ही, 
ऐसे श्रीमंत योगी अखंड महाराष्ट्राचे 

शिवराज्याभिषेक

६ जून इ. स.१६७४ रोजी शिवाजी राजे यांचा रायगडावर राज्याभिषेक करण्यात आला त्या दिवसापासून शिवाजीराजांनी शिवराज्याभिषेक शक सुरू केला आणि शिवराई हे चलन सुरू केले नवीन कालगणना सुरू होऊन नवा शक सुरु झाला. फारसी संस्कृत बनवला गेला आर सी च्या जागी संस्कृत शब्द वापरणे यासाठी हुकूम जारी केले सुमारे साडेतीनशे  वर्षे जुलमी शासन गुलामगिरीत पडलेल्या अन्यायाने ग्रासलेल्या अत्याचाराने त्रासलेल्या गोरगरीब रयतेला लोक कल्याणकारी न्यायप्रिय असा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रूपाने मिळाला.

छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू


छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यु ३ एप्रिल  १६८० रोजी प्रकृती खालावत गेल्याने रायगड किल्ल्यावर हनुमान जन्मोत्सव च्या दिवशी वयाच्या 50 व्या वर्षी झाला त्यांच्यासह त्यांच्या चौथ्या पत्नी महाराणी पुतळाबाई सती झाल्या उत्तम शासक उत्तम राजे मनाठा साम्राज्याचे संस्थापक हिंदवी स्वराज्याचे स्वप्न बघणारे एक शक्तिशाली निष्ठावान पराक्रमी आपल्या जाज्वल्य पराक्रमाने इतिहास घडवणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव कायम प्रत्येक भारतीयांच्या मनात सुवर्ण अक्षरांनी कोरले आहे.
“विजेसारखी तलवार चालवून गेला, 
निधडया छातीने हिंदुस्थान हालवून गेला, 
वाघनख्याने अफजलखानाचा कोथळा फाडून गेला, 
मूठभर मावळयांना घेऊन हजारो सैतानांना नडून गेला
 स्वर्गात गेल्यावर देवांनी 
ज्याला झुकून मुजरा केला 
असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला.”


  व्हिडिओ - छत्रपती शिवाजी महाराज भाषण 


 

F.A.Q

१) छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कुठे झाला ?
उत्तर - छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला.

२) छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म दिनांक काय आहे ?
उत्तर -  छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म  दिनांक १९ फेेब्रवारी १६३० आहे.

३) छत्रपती शिवाजी महाराज यांनी कोणता किल्ला सर्वप्रथम जिंकला ?
उत्तर - छत्रपती शिवाजी महाराज यांनी  सर्वप्रथम तोरणगड (किल्ला) जिंकला.
४) छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला ?
उत्तर - छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक रायगड किल्या वर  झाला.









Post a Comment

2 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad