Type Here to Get Search Results !

पत्रलेखन | letter writing | पत्रलेखन नमुना | Letter writing pattern

 पत्रलेखन | letter writing | पत्रलेखन नमुना | Letter writing pattern

आज आपण ssc परीक्षेत विचारला जाणारा महत्वपूर्ण प्रश्न पत्रलेखनletter writing  या विषयी माहिती पाहणार आहोत.

लहानपणा पासून सर्वांनी पत्र हा शब्द खूप जवळ चा आहे . कारण पत्र म्हणाले की आपल्याला 'आई माझे पत्र हरवले .. हे गीत आठवते. आधुनिक युगात पत्र हरवले आहे . त्याला कारण ही तसे आहे आज  आपण  मोबाईल चा उपयोग करतो आहोत त्यामुळे आपल्याला एखादी आनंदाची बातमी सांगायची असेल तर आपण लगेच फोन चा उपयोग करून आनंद वार्ता सांगतो आपला वेळ वाचतो असे वाटते . पण पत्रामधून जी आपुलकी आहे ती मोबाईल संदेश मध्ये नाही .   

पत्रलेखन | letter writing | पत्रलेखन नमुना | Letter writing pattern
पत्रलेखन | letter writing | पत्रलेखन नमुना | Letter writing pattern


पत्रलेखन letter writing (toc)

पत्रलेखन म्हणजे काय ? (What is letter writing?)

आपल्या मनातील कल्पना, भावना , विचार , मते , इच्छा , अपेक्षा वा सूचना योग्य रीतीने अपेक्षित व्यक्ती पर्यंत  पोहोचवण्याचे लिखित स्वरूपातील माध्यम म्हणजे पत्रलेखन होय .

पत्रलेखनाचे प्रकार

पत्रलेखनाचे  दोन प्रकार आहेत 
 १) अनौपचारिक पत्र
 २) औपचारिक पत्र

१)  अनौपचारिक पत्र :

      दैनंदिन जीवनातील आपले विचार भावना आपल्या कुटुंबातील व्यक्तींना किंवा आपल्या मित्र-मैत्रिणींना कळविण्यासाठी आपण जेव्हा पत्र लिहितो .  त्यावेळेस आपण अशा  पत्रांना अनौपचारिक किंवा कौटुंबिक पत्रे असे म्हणतो.

२) अनौपचारिक पत्र कसे लिहावे.व कोणती काळजी घ्यावी (How to write an informal letter and what to look for)

अनौपचारिक पत्र लिहिताना कोणती काळजी घ्यावी . 
१) ज्या व्यक्तीला पत्र लिहायचे आहे आहे त्यांचा उल्लेख नात्याप्रमाणे आदरपूर्वक करावा.
२) पत्र्याचा विषयी लिहिण्याची आवश्यकता नाही.
३) प्रभावीपणे भावना व्यक्त केल्या पाहिजेत.
४) पत्रलेखन करताना  नात्यात एक आपुलकी, जिव्हाळा निर्माण होईल असे लेखन करावे.
५) ज्या व्यक्तीला पत्र लिहीत आहे त्या व्यक्तींची विचारपूस करावी.


अनौपचारिक पत्र कसे लिहावे.
अनौपचारिक पत्र लिहिताना खालील नमुना पाहा . व त्या नुसार पत्र लेखन करा.

३) नमुना DOWNLOAD करा.⬇️


२) औपचारिक पत्र (formal letter)

रोजच्या व्यहारात आपल्याला  काही अडचणी सोडवण्यासाठी किंवा काही सुविधा मिळवण्यासाठी आपल्याला शासकीय कार्यालयांत  किंवा खाजगी कंपन्यांच्या कार्यालयांत जावे लागते .आपली कामे व्हावीत म्हणून या कार्यालयांत आपल्याला पत्रे सादर करावी लागतात. या पत्रांना औपचारिक किंवा व्यवसायिक पत्र म्हणतात.

   औपचारिक पत्र कसे लिहावे.


औपचारिक पत्र कसे लिहावे.व कोणती काळजी घ्यावी (How to write an formal letter and what to look for)
  • प्रति ज्या खाली  ज्या व्यक्तिला पत्र लिहायचे आहे त्यांचा पूर्ण  पत्ता लिहिणे.
  • विषय - मोजक्या शब्दांत लिहा.
  • पत्र लेखन मुद्देसूद असावे.
  • पत्र लिहिण्याचे कारण व आशय मोजक्या शब्दांत लिहावा.
  • भाषा आदरयुक्त असावी.

औपचारिक पत्र कोणती ? 

  • मागणी पत्र.
  • तक्रार पत्र .
  • चौकशी पत्र.
  • विनंती पत्र .
  • आभात पत्र.
  • निमंत्रण पत्र.

औपचारिक पत्र कसे लिहावे.How to write an formal letter

औपचारिक पत्र लिहिताना खालील  नमुना पाहा. व त्या नुसार पत्र लेखन करा.

औपचारिक पत्र नमुना Formal letter sample

औपचारिक पत्र  नमुना Download करा.⬇️








Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad