Type Here to Get Search Results !

UNION BUDGET 2022-23 | केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23

 UNION BUDGET 2022-23 | केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 

आज 2022 - 2023 चा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला त्यांनी सादर केलेला हा चौथा अर्थसंकल्प 2019 मध्ये त्यांनी पहिला अर्थसंकल्प सादर केला होता. 2022 2023 च्या अर्थसंकल्पामध्ये विकासाला चालना देण्यात आली आहे असे त्या म्हणाले आहेत.

UNION BUDGET 2022-23  केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 (toc)

UNION BUDGET 2022-23 केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 जाणून घेऊया .

एल .आय .सी .LIC 

  • सरकार लवकरच एल .आय .सी .LIC चा IPO जारी करणार आहे.

नॅशनल पेन्शन सिस्टीम NPS

  • अर्थमंत्र्यांनी असे सांगितले की, राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या NPS (नॅशनल पेन्शन सिस्टीम) मध्ये केलेल्या योगदानावरील कर कपात 10 टक्क्यांवरून 14 टक्के करण्याचा सरकारचा प्रस्ताव दिला.
  •  अनेक सेवानिवृत्त धारकांना त्याचा मोठा लाभ मिळणार आहे. 

LPG एलपीजी

  •   सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
  •  सरकारी तेल कंपन्यांनी अर्थसंकल्पापूर्वी एलपीजीच्या किमतीत कपात करण्याची घोषणा केली आहे .
  •  व्यावसायिक एलपीजी सिलिंडर स्वस्त झाले. 
  • एलपीजी सिलेंडरची किंमत 91.50 रुपयांनी कमी झाली आहे.

सरकारी  पगारदारांच्या पदरी निराशाच !

  • आयकर मर्यादा आहेत त्याच ठेवण्याची घोषणा  केली आणि पगारदारांच्या पदरी निराशाच आली आहे.
  • महागाईचा दर गेल्या सहा वर्षांमध्ये कमीतकमी 3.43 टक्के तर जास्तीतजास्त 6.18 टक्के राहीला आहे.

शिक्षण 

  •   डिजिटल विद्यापीठ स्थापन :
  • देशातील विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील साधे आणि दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सरकार डिजिटल विद्यापीठ स्थापन करणार असल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली. 
  •  विद्यापीठ ISTE दर्जाचे असेल.
  • डिजिटल शिक्षणावर विशेष लक्ष
  • प्रधानमंत्री ई-विद्या योजनेंतर्गत वन चॅनल वन क्लास योजना १२ वरून २०० टीव्ही चॅनेल करण्यात येणार आहे. 
  •  पहिली ते बारावीपर्यंतच्या वर्गांसाठी दर्जेदार शिक्षणाची व्यवस्था केली जाणार आहे.

 इलेक्ट्रिक वाहन 

  •  सरकार लवकरच बॅटरी स्वॅपिंग धोरण आणेल. 
  •  इलेक्ट्रिक वाहनांमध्ये (EVs) बॅटरी चार्जिंगची समस्या दूर होईल. 
  • बॅटरी स्वॅपिंग म्हणजे काय ?

तुमच्या कारमध्ये पेट्रोल, डिझेल किंवा सीएनजी भरण्यासाठी फिलिंग स्टेशन किंवा इंधन स्टेशनवर जाता, त्याचप्रमाणे सरकारच्या बॅटरी स्वॅपिंग पॉलिसीनंतर तुम्हाला कंपन्यांच्या स्वॅपिंग स्टेशनवर जावे लागेल. 

  • तेथे तुम्हाला तुमची जुनी डिस्चार्ज केलेली बॅटरी द्यावी लागेल.
  • ज्याच्या बदल्यात तुम्हाला पूर्ण चार्ज केलेली दुसरी बॅटरी मिळेल.

 आरोग्य 

  • नॅशनल डिजिटल हेल्थ इकोसिस्टमसाठी खुले व्यासपीठ सुरू केले जाणार आहे. 
  •  आरोग्य पुरवठादार आणि आरोग्य सुविधांसाठी डिजिटल नोंदणीचा ​​समावेश असणार आहेत. 
  • प्लॅटफॉर्मला एक युनिक हेल्थ आयडी आणि आरोग्य सुविधांचा सार्वत्रिक प्रवेश मिळेल.

 P M  पीएम आवास योजना 

  • या  योजनेंतर्गत 80 लाख नवीन घरे बांधली जातील. 
  • या साठी 48 हजार कोटी रुपयांचा निधी ठेवण्यात आला आहे.

 शेती व शेतकरी यांच्या साठी 

  •  जलसिंचन वाढवण्याचा प्रयत्न, सौर उर्जेचा वापर, पेयजलासाठी 1400 कोटी रुपयांची तरतूद .
  • वन स्टेशन - वन प्रोडक्ट या योजनेतून या देशांमध्ये बाजारपेठेला चालना दिली जाणार.
  • कृषीच्या स्टार्टअप योजना
  • या योजने साठी नाबार्ड योजनेअंतर्गत तरुणांना थेट कर्जपुरवठा करण्याची घोषणा केली आहे .
  • शेतकऱ्यांचा शेतमाल हा कमी खर्चात आणि वेगाने बाजारपेठेत कसा पोहोचवायचा या साठी रेल्वे जाळे निर्माण केले जाणार आहे.
  • ऑरगॅनिक शेती

UNION BUDGET 2022-23 | केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 संपूर्ण व्हिडिओ 









Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad