Type Here to Get Search Results !

जागतिक महिला दिन | जागतिक महिला दिन 2022 | International Women's Day 2022| International Women's Day Theme 2022 | जागतिक महिला दिन थीम2022 | जागतिक महिला दिन भाषण 2022 | International World Women's Day Speech 2022

जागतिक महिला दिन |जागतिक महिला दिन 2022 | International Women's Day 2022| International Women's Day Theme 2022 | जागतिक महिला दिन थीम2022  | जागतिक महिला दिन भाषण 2022 | International  World Women's Day Speech 2022  

स्त्रियांनी (महिला ) स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ प्रत्येक वर्षी 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन   ( जागतिक महिला दिन 2022  International Women's Day 2022 ) म्हणून साजरा केला जातो.

स्त्रियांना विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मतदानाचा हक्क नाकारला जातो. पुरुषप्रधान व्यवस्थेतील स्त्री-पुरुष विषमतेचे हे एक ढळढळीत उदाहरण होते व त्या साठी  स्त्रियांनी आपल्या परीने संघर्ष  करीत  त्याला विरोध केला.

जागतिक महिला दिन (toc)

जागतिक महिला दिन इतिहास 

संपूर्ण अमेरिका व युरोप मध्ये महिलांना मतदानाचा अधिकार नाकारला होता . दक्षिणेकडील देशांना काळया मतदाता यांपासून आणि उत्तर व पूर्वेकडील देशांना तेथील बहुसंख्य देशांतरित मतदानापासून वाचवण्याकरता स्त्रियांना मतदानाच्या हक्क मिळायलाच हवा अशा प्रकारच्या अहवान केले गेले.
कृष्णवर्णीय लोकांनी व देशातील कामगार स्त्रियांनी   मर्यादित हक्काला विरोध केला. क्रांतिकारी मार्क्सवाद्यांनी केलेल्या सार्वत्रिक प्रौढ मतदानाच्या हक्कांच्या मागणीला पाठिंबा दिला.
१९०७ साली स्टुटगार्ड येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद झाली.
या परिषदेत क्लारा झेटकीन या कम्युनिस्ट कार्यकर्तीने सार्वत्रिक मतदानाचा हक्क मिळण्यासाठी संघर्ष करणे हे समाजवादी स्त्रियांचे कर्तव्य आहे तशी सर्वात मोठी घोषणा केली.
८ मार्च १९०८ रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्रियांनी कामगारांनी रूटगर्स या चौकामध्ये जमा होऊन प्रचंड असे ऐतिहासिक निदर्शन केले. 
अमेरिकन कामगार स्त्रियांच्या या व्यापक कृतीने क्लारा झेटकिन अतिशय प्रभावित झाली. १९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्नीय समाजवादी महिला परिषदेत, ८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, ८ मार्च हा `जागतिक महिला-दिन' म्हणून स्वीकारावा असा जो ठराव क्लाराने मांडला, तो पास झाला. यानंतर युरोप, अमेरिका वगैरे देशात सार्वत्रिक मतदानाच्या हक्कासाठी मोहिमा उघडल्या गेल्या. 
जागतिक महिला दिन भाषण

या  निदर्शना मध्ये कोण कोणत्या मागण्या केल्या ?

या आंदोलनामध्ये सर्व स्त्रियांनी ज्या ठिकाणी महिला काम करतात त्या ठिकाणी कामाचे तास दहा असावे तसेच कामाच्या जागी सुरक्षितता मागण्या बरोबरच लिंग, वर्ण , मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमी निरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणीही केली.
जागतिक महिला दिन 


 


जागतिक महिला दिन कधी सुरू झाला ?

१९०८ साली  याची पहिली ठिणगी पडली व जागतिक महिला दिनाची सुरुवातएका कामगार आंदोलनातून झाली . त्या वर्षी एकूण १५ ( पंधरा हजार स्त्रिया) हजार स्त्रियांनी न्यूयॉर्क या शहरात आंदोलन करून कामाचे तास कमी करावे , वेतन मिळावे व मतदानाचा अधिकार मिळावा या साठी हे आंदोलन केले. 
८ मार्च १९०८ रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्रियांनी कामगारांनी रूटगर्स या चौकामध्ये जमा होऊन प्रचंड असे ऐतिहासिक निदर्शन केले. अमेरिकन कामगार स्त्रियांच्या या व्यापक कृतीने क्लारा झेटकिन अतिशय प्रभावित झाली. १९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्नीय समाजवादी महिला परिषदेत, ८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, ८ मार्च हा `जागतिक महिला-दिन' म्हणून स्वीकारावा असा जो ठराव क्लाराने मांडला, तो पास झाला. 

१९१७साली युद्धदरम्यान रशियातील महिलांनी ब्रेड आणि पीस ( भाकरी आणि शांतता ) अशी मागणी केली महिलांनी केलेल्या काम बंद आंदोलनाने सम्राट निकोलस ला पद सोडायला भाग पाडले व त्यानंतर आलेल्या हंगामी सरकारने महिलांना मतदानाचा अधिकार दिला

रशिया मध्ये जुलियन कॅलेंडर वापरतात ज्या दिवशी महिलांनी काम बंद आंदोलन पुकारले त्यादिवशी दिनांक होती 23 फेब्रुवारी. ग्रेगरियन कॅलेंडर नुसार तो दिवस 8 मार्च होता आणि त्यामुळेच आंतरराष्ट्रीय महिला दिन 8 मार्च रोजी साजरा करण्यात येते

International Women's Day Theme 2022 जागतिक महिला दिन थीम 2022  

या वर्षी महिला दिनासाठी एक खास थीम वर साजरा केला जाणार आहे ती थीम म्हणजे
  Gender equality today for a sustainable tomorrow ”
या थीम चा अर्थ मराठी असे आहे की समाज्यामध्ये  पुरुषाच्या खंद्याला खंदा लावून चालणारी स्त्री. समाजात अजून काही ठिकाणी लिंग भेदभाव करून त्यांना समाजातील समान संधी पासून दूर ठेवले जाते.
 “Break The Bias पूर्वग्रह खंडित करा.”
हाच पूर्वग्रह व लिंगभेद मुळापासून मोडून काढण्यासाठी या वर्षी हा महिला दिन साजरा केला जाणार आहे.

भारतात महिला दिन कधी सुरू झाला ?

भारतामध्ये मुंबई येथे पहिला पहिला दिवस ८ मार्च १९४३ रोजी साजरा करण्यात आला. ८ मार्च  १९७१ ला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला . युनोने १९७५ हे वर्ष जागतिक महिला वर्ष म्हणून जाहीर केले.

जगभरात कसा साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय महिला दिन

चीन - कार्यालयांमध्ये महिलांना  अर्ध्या दिवसाची रजा दिली जाते.
अमेरिका - अमेरिकेत  संपूर्ण मार्च महिना “ Womens History Month ” वुमन्स हिस्ट्री महिना म्हणून साजरा  करतात .
रशिया व इतर देशांमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनाला विशेष कार्यक्रमाचे आयोजन करतात.


महिला दिनी जांभळ्या रंगाचे महत्व

जांभळ्या रंगाचे महत्व केवळ तो एक सुंदर रंग आहे म्हणून नव्हे तर त्याला इतिहास देखील आहे लिंग समानता म्हणजे Gender Equality (जेंडर इक्वलिटी) चे प्रतीक म्हणून या रंगाकडे पाहिले जाते.

हे नक्की वाचा ⬇️











Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad