प्रश्न .५ . आ १. मध्ये एकूण पाच गुणांसाठी जाहिरातलेखन Advertising Writing हे कृती दोन प्रकारे विचारले जाते .प्रश्न ५.आ २.मध्ये बातमी लेखन News Reporting विचारले जाते
लेखन कौशल्य (toc)
जाहिरात लेखन Advertising Writing
१) जाहिरात लेखनासाठी विषय दिला जातो.
महत्त्वाची व ठळक वैशिष्ट्ये देऊन आकर्षक मजकुरातील जाहिरात तयार करणे सजावट अथवा चित्रे काढणे आवश्यक नाही आकर्षक जाहिरात 50 ते 60 शब्दात तयार करणे.
पुढील बातमी वाचा आणि कागदी पिशव्यांची जाहिरात तयार करा
प्लास्टिक पिशव्यांवर महापालिकेची बंदी प्लास्टिक पिशव्या देणाऱ्या विक्रेत्यांवर आणि प्लास्टिक पिशव्या बाळगणाऱ्या ग्राहकांवर कडक कारवाईचा इशारा.
जाहिरात खालील प्रमाणे तयार करा.⬇️
विविध प्रकारच्या, विविध आकाराच्या
कागदी पिशव्या आमच्याकडे मिळतील.
विविध प्रसंगासाठी डिझायनर कागदी पिशव्या देखील
आमच्याकडे मिळतील.
ऑर्डर प्रमाणे कागदी पिशव्या बनवून देतो.
फक्त एकच फोन करा आणि हव्यात अशा पिशव्या घरपोच मिळवा.
आपला नंबर कळवा व व्हाट्सअप ॲप वर सॅम्पल पाहा
संपर्क : पिशवी वाले - ७८७६०*****
२) या कृती मध्ये एक जाहिरात दिली जाते .
त्यातील मजकूराच्या आधारे जाहिराती खालील दोन गुणांच्या किंवा एका गुणांच्या अशा एकूण पाच गुणांसाठी कृती दिल्या जातील.
पुढील जाहिरात वाचा व त्या खालील कृती सोडवा
वाळके शक्ति व्यायाम शाळा
प्रो. विशाल वाळके यांची व्यायाम शाळा.
योगासने व व्यायाम हीच आरोग्याची गुरुकिल्ली !
वेळ सकाळी : ५ ते १०.
सायंकाळी : ५ ते ९ .
आमची वैशिष्ट्ये
- वातानुकूलित प्रशस्त जागा.
- सोयीस्कर वेळ .
- आधुनिक सामग्री .
- तज्ञ प्रशिक्षक .
संपर्क पत्ता: वाळके शक्ती व्यायामशाळा प्राजक्ता
हिल टॉप रोड कराड 14
बातमी लेखन News Reporting
बातमी लेखन करताना खालील मुद्यांचा विचार करावा
- घटनेचे अचूक विश्लेषण करा .
- वस्तुनिष्ठ व तटस्थ भूमिका घेणे .
- अचूक व योग्य तपशील देणे .
- अपमानकारक भाषा टाळणे.
- सोपी सुटसुटीत वाक्यरचना असावी .
- बातमी भूतकाळात लिहावी.
- शीर्षक बातमीचा मथळा बातमीचा गाभा असतो .
- उपशीर्षक उपमतळा.
- दिनांक , स्थळ , वेळ व संबंधित व्यक्तींचा अचूक उल्लेख करावा .